मुगडाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

#GA4 #week22 चिला हा कीवर्ड ओळखून मी हा पौष्टिक चिला करुन बघितला. मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. पण सतत तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला तर काहीतरी वेगळं म्हणून हा चिला करुन बघितला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनीटं
४ सर्व्हिंगज
  1. 2 कपपिवळी किंवा हिरवी मुगडाळ
  2. 5-6लसूण पाकळ्या
  3. 1/4 कपकोथिंबिर
  4. 2 टीस्पूनजिरेपूड
  5. 2 टीस्पूनमिरेपूड
  6. चवीनुसारमीठ
  7. आवश्यकतेनुसार पाणी
  8. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

२५ मिनीटं
  1. 1

    प्रथम मुगडाळ रात्रभर भिजवून ठेवावी.

  2. 2

    सकाळी भिजवलेली मुगडाळ मिक्सरमधे घेऊन त्यात लसूण, जिरेपूड, मिरेपूड, मीठ आणि कोथिंबिर घालून व्यवस्थित वाटून घ्यावे.

  3. 3

    आता तवा तापवून त्यावर तेल घालावे आणि तयार पिठाचा चिला चमच्याने तव्यावर घालावा.

  4. 4

    दोन्ही बाजूने चिला तव्यावर खरपूस भाजून घ्यावा आणि चटणी किंवा साॅस बरोबर सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes