सोया व्हेज पुलाव (soya veg pulav recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#डिनर भाज्यांमधुन आपल्या शरीराला पौष्टीक जिवनसत्वे मिळतातच पण सोया चंक्स मुळे डाइबीटीज, वेटलॉस, कैन्सर अशा आजारापासुन बचाव होण्यास फायदेशिर ठरतात तसेच प्रोटीन, विटॅमिन, खनिज तत्व भरपुर प्रमाणात मिळतात सोयाबीनच्या सेवनाने शरीराला पौष्टीक गोष्टी मिळतात हृदय विकाराचे प्रमाण कमी होते महिलांना तर खुपच उपयोगी आहे चला तर बघुया हा सोया व्हेज पुलाव कसा बनवायचा ते

सोया व्हेज पुलाव (soya veg pulav recipe in marathi)

#डिनर भाज्यांमधुन आपल्या शरीराला पौष्टीक जिवनसत्वे मिळतातच पण सोया चंक्स मुळे डाइबीटीज, वेटलॉस, कैन्सर अशा आजारापासुन बचाव होण्यास फायदेशिर ठरतात तसेच प्रोटीन, विटॅमिन, खनिज तत्व भरपुर प्रमाणात मिळतात सोयाबीनच्या सेवनाने शरीराला पौष्टीक गोष्टी मिळतात हृदय विकाराचे प्रमाण कमी होते महिलांना तर खुपच उपयोगी आहे चला तर बघुया हा सोया व्हेज पुलाव कसा बनवायचा ते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मिनिटे
२-४ व्यक्तिसाठी
  1. 2कांदे उभे पातळ चिरलेले
  2. चविनुसारमीठ
  3. 1-2 टेबलस्पुनसाजुक तुप व तेल
  4. 1भाजलेला पापड
  5. 1-2कांदा स्लाइज १ लिंबाची फोड
  6. ५० ग्रॅम सोया चंक्स
  7. 7-8काजु
  8. ५० ग्रॅम मिक्स भाज्या ( गाजर, मटार, फ्लावर, फ्रेंच बिन्स
  9. 7-8बदाम
  10. 7-8बेदाणे
  11. 2-3 टेबलस्पुनदही
  12. 1 टेबलस्पुनपावभाजी मसाला
  13. 1 टेबलस्पुनबिर्याणी मसाला
  14. 1 टीस्पूनधनेजिरे पावडर
  15. 1/4 टीस्पूनहळद
  16. १०० ग्रॅम बासमती तांदुळ
  17. 1 टीस्पूनआललसुण पेस्ट
  18. 1 टीस्पूनतिखट
  19. 1-2 टीस्पूनखडे मसाले

कुकिंग सूचना

२०-२५ मिनिटे
  1. 1

    सोया व्हेज पुलावा साठी आवश्यक ते साहित्य प्लेट मध्ये काढुन ठेवा बासमती तांदुळ स्वच्छ धुवुन२० मिनिटे भिजत ठेवा भाज्या व कांदे चिरून ठेवा सोया चंक्स गरम पाण्यात१० मिनिटे भिजवा नंतर त्यातील सर्व पाणी हाताने दाबुन काढुन टाका

  2. 2

    ऐका वाटी मध्ये दही घेऊन त्यात सर्व पावडर मसाले मीठ मिक्स करून फेटुन त्यात सोयाचंक्स व चिरलेल्या भाज्या मिक्स करा तसेच पातेल्यात तेल व साजुक तुप गरम करून काजु, बदाम, बेदाणे परतुन काढुन ठेवा

  3. 3

    नंतर त्याच गरम तेल तुपात जीरे व खडे मसाले परतुन उभे चिरलेले कांदे परता कांदा थोडा गुलाबीसर झाल्यावर आपण दह्यात मॅरिनेट केलेल्या भाज्या सोयाचंक्स टाकुन चांगले परतुन घ्या व स्लो गॅसवर झाकण ठेवुन ५ मिनटे शिजवा

  4. 4

    नंतर अर्धवट शिजलेल्या भाज्यांमध्ये भिजवलेले बासमती तांदुळ मिक्स करा

  5. 5

    मिक्स भाज्या मध्ये तांदुळ मिक्स करून परतुन घ्या व आवश्यतेनुसार मीठ व गरम पाणी मिक्स करा व पुलाव शिजवा

  6. 6

    स्लो गॅसवर पुलाव मधील पाणी आटत आल्यावर झाकण ठेवुन शिजवा आपला सोया व्हेज पुलाव रेडी होईल

  7. 7

    गरम गरम तयार झालेला सोया व्हेज पुलाव प्लेटमध्ये सर्व्ह करा वरून फ्राय केलेले काजु, बदाम, बेदाणे टाकुन तसेच भाजलेला पापड, कांद्याच्या स्लाइज, लिंबाची फोड देऊन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes