"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी" (palak gargat bhaji recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी"

हाटून भाजी असेही म्हणतात..

"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी" (palak gargat bhaji recipe in marathi)

"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी"

हाटून भाजी असेही म्हणतात..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
तीन चार
  1. 1पालक ची जुडी
  2. 7-8 हिरव्या मिरच्या
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. 7-8 लसणाच्या पाकळ्या
  5. 2 टेबलस्पूनबेसन पीठ
  6. चवीनुसारमीठ
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  9. 1 टेबलस्पूनचना डाळ

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    शेंगदाणे व चना डाळ दोन तास भिजत ठेवा.

  2. 2

    भाजी निवडून स्वच्छ धुवून बारीक कापून घ्या

  3. 3

    कढईत भिजवलेले शेंगदाणे,चना डाळ, भाजी घेऊन दोन कप पाणी घालून मिडीयम गॅसवर दहा मिनिटे शिजू द्यावे.

  4. 4

    हिरव्या मिरच्या, लसुण अर्धा टीस्पून जीरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

  5. 5

    शिजलेली भाजी वाटी मध्ये काढून घ्या.. भाजी मध्ये थोडेफार पाणी राहिले असेल तर ते ही घ्या..(फेकू नका)

  6. 6

    गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात जीरे मोहरी घाला ते फुलले की हिंग हळद वाटलेले मिश्रण घालून परतून घ्या.

  7. 7

    शिजवलेली भाजी, शेंगदाणे,चना डाळ हे घालून चांगले मिक्स करावे म्हणजे फोडणीचा स्वाद सगळ्या भाजीला येतो..

  8. 8

    वाटी मध्ये बेसन पीठ घेऊन थोडे पाणी घालून बॅटर बनवा व ते भाजीमध्ये घालून आवश्यकतेनुसार पाणी घालावे (कारण अजून बेसन शिजवायचे आहे) घट्ट, पातळ हवी त्या प्रमाणात पाणी घालावे

  9. 9

    भाजी दहा मिनिटे शिजू द्यावी.भाजी, बेसन एकजीव झाले पाहिजेत.. म्हणजे गरगट (हाटून) भाजी तयार...

  10. 10

    भाकरी,चपाती सोबत सर्व्ह करा.. खुप टेस्टी लागते.. भाकरी सोबत जास्त चांगली लागते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes