शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#SWEET रेसिपी-1
मला गोड खायला खूप आवडते. लाडू प्रकार माझे करून झाले. घरात ब्रेड ही आणलेला होता. म्हणून शाही तुकडा ही रेसिपी केली. सगळ्यांना खूप आवडली.

शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)

#SWEET रेसिपी-1
मला गोड खायला खूप आवडते. लाडू प्रकार माझे करून झाले. घरात ब्रेड ही आणलेला होता. म्हणून शाही तुकडा ही रेसिपी केली. सगळ्यांना खूप आवडली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35-40 मिनिटे
4-5 जणांसाठी
  1. 5ब्रेड स्लाईस
  2. 3-4 टेबलस्पूनसाजूक तूप
  3. रबडी साठी साहित्य
  4. 1/2 लीटरदूध
  5. 25 ग्रॅममिल्क पावडर किंवा कंन्डेन मिल्क ही वापरू शकता
  6. 3 टेबलस्पूनसाखर कमी-जास्त करू शकता
  7. 7-8केशर काडया
  8. 1 टेबलस्पूनबदाम,पिस्ता काप
  9. पाकासाठी साहित्य
  10. 1 कपसाखर
  11. 1 कपपाणी
  12. 3-4 थेंबरोझ किंवा केवडा इन्सेस
  13. 2हिरवी वेलची किंवा पावडर

कुकिंग सूचना

35-40 मिनिटे
  1. 1

    गॅसवर पॅनमध्ये दूध घालून उकळत ठेवावे. हे दूध उकळी आल्यावर चमच्याने सतत हलवत राहावे. आटवून निम्मे करावे.

  2. 2

    थोडेसे आटत आले की त्यात 3 टेबलस्पून साखर व केशर काडया घालून हलवत राहावे. एका कपात किंवा वाटीत मिल्क पावडर व थोडे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे.गाठी राहायला नको. हे मिश्रण आटलेल्या दुधात घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे व थोडे दूध आटलेकी गॅस बंद करावा.

  3. 3

    हे मिश्रण आटलेल्या दुधात घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे व थोडे दूध आटलेकी गॅस बंद करावा. वरून बदाम,पिस्ता घालून मिक्स करून घेणे व थंड होण्यासाठी ठेवावे.

  4. 4

    गॅसवर पॅनमध्ये साखर व पाणी घालून पाक करण्यासाठी ठेवावे. 1-2 तारी पाक करायचा नाही. बोटांना चिपकेल इतपत करायचे.वेलची फोडून त्यात घालावी.

  5. 5

    मिश्रण सतत हलवत राहावे. रोझ इन्सेस चे थेंब घालून मिक्स करून घेणे व गॅस बंद करावा.

  6. 6

    गॅसवर तवा तापत ठेवावा. ब्रेड स्लाईस हव्या त्या आकारात सुरीने कापून घेणे. गॅस मंद आचेवर ठेवून तव्याला साजूक तूप लावून घेणे. ब्रेडचे तुकडे त्यावर ठेवून शॅलो फ्राय करून घेणे. दोन्ही बाजूंनी तूप लावावे.तुम्ही तुपात ही तळून घेऊ शकता. पण त्यात तूप निथळून घ्यावे लागते. सर्व तुकडे गुलाबीसर तूप लावून भाजून घ्यावे.

  7. 7

    सव्हिर्स डीश घेणे.शॅलो फ्राय केलेले ब्रेड पाकात व्यवस्थित बुडवून घेणे. ते डिश मध्ये ठेवून घेणे. वरून थंड झालेली रबडी सर्व बाजूंनी घालून घेणे. बदाम,पिस्त्याचे काप घालून सजवावे.

  8. 8

    थोडेसे मुरल्या नंतर खाण्यासाठी तयार शाही तुकडा!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes