तांदूळ व मिक्स डाळींचे डोसे (tandul mix daliche dosa recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

पोटभरीचा, प्रोटीन्स युक्त असा नाष्टा. कमी वेळात होणारा ही आहे.

तांदूळ व मिक्स डाळींचे डोसे (tandul mix daliche dosa recipe in marathi)

पोटभरीचा, प्रोटीन्स युक्त असा नाष्टा. कमी वेळात होणारा ही आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 मिनिटे
2-3 जणांसाठी
  1. 1/2 कपतांदूळ
  2. 2 टेबलस्पूनहरबरा डाळ
  3. 2 टेबलस्पूनउडीद डाळ
  4. 2 टेबलस्पूनमूग डाळ
  5. 1 टेबलस्पूनतूरडाळ
  6. 2-3हिरव्या मिरच्या. कमी-जास्त करू शकता
  7. 6-7लसूण पाकळ्या
  8. थोडी कोथिंबीर
  9. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  10. 1/2 टीस्पूनधने पावडर
  11. चवीप्रमाणे मीठ
  12. चटणी साहित्य
  13. 1/4 कपओले खोबरे तुकडे
  14. 1 टेबलस्पूनडाळया/डाळवं
  15. 2हिरव्या मिरच्या
  16. थोडी कोथिंबीर
  17. चवीप्रमाणे मीठ व साखर
  18. 1 टेबलस्पूनलिंबाचा रस
  19. 1/4 टीस्पूनजीरे

कुकिंग सूचना

25-30 मिनिटे
  1. 1

    तांदूळ व डाळी स्वच्छ धुवून घेणे व पाणी घालून 1-2 तास भिजत ठेवावे. मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले डाळ, तांदूळ घालून घेणे. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण पाकळ्या घालून व थोडेसे पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यावे.

  2. 2

    वाटलेले मिश्रण एका पातेल्यात काढून घेणे. त्यात धने-जीरे पावडर,मीठ घालून मिक्स करून घेणे.

  3. 3

    गॅसवर तवा तापत ठेवावा.तवा तापला की गॅस मंद आचेवर ठेवून पळीने डोसा घालून घेणे व झाकण ठेवावे. गॅस मध्यम आचेवर करावा. झाकण काढून डोसा वरून शिजला की उलटवून 1 मिनिटे भाजून घेणे किंवा नाही भाजला तरी चालेल. **डोसा घालताना गॅस मंद आचेवर ठेवावा. घालून झाल्यावर मध्यम आचेवर ठेवावा. अशाप्रकारे सर्व डोसे करून घ्यावे.

  4. 4

    मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे तुकडे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, डाळवं, जीरे,मीठ, साखर, लिंबाचा रस व थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. खोबर्याची चटणी तयार!

  5. 5

    गरमागरम डोसे चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes