उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#fr #उपवासाची कचोरी
उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाणे.
फराळ किंवा फलाहार करणे. परंतु प्रत्यक्षात मात्र उपवास म्हंटले की अनेक पदार्थांची रेलचेलच असते. मराठीत एक म्हण आहे," एकादशी अन् दुप्पट खाशी.".खरंच अगदी असच होतं नेहमी उपवासाच्याबाबतीत.उपवास येताच काय करू न काय नको असं होतं. आणि मग तिखट, गोड सर्वच पदार्थांची यादी लांबते.....मीही आज उपवासाचा सर्वांच्याच आवडीचा एक पदार्थ आणला आहे, उपवासाची कचोरी.खूपच चवदार असा हा पदार्थ, बघूया त्याची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-४० मि.
३-४ लोकांसाठी
  1. वरच्या पारीसाठी
  2. 4मोठे बटाटे
  3. 1 वाटीसाबुदाण्याचे पीठ
  4. मीठ
  5. थोडे तेल
  6. सारण
  7. 1नारळाचा खव
  8. 4-5हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  9. 2 चमचेसाखर
  10. 1/2 वाटीआवडीचे ड्रायफ्रूट्स्
  11. चिमुटभरमीठ
  12. 1/4 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर (चालत असल्यास)
  13. चतकोर लिंबू
  14. तळण्यासाठी तेल
  15. चटणीसाठी साहित्य
  16. 1 वाटीओले खोबरे किसून
  17. 3/4 वाटीतळून शेंगदाणे
  18. 4हिरव्या मिरच्या
  19. 1 चमचासाखर
  20. २-४ चमचे दही
  21. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

३०-४० मि.
  1. 1

    प्रथम बटाटे कुकरमध्ये वाफलून घेणे. थंड होईपर्यंत नारळ खोवून घेणे.आता बटाटे सोलून किसून घेणे. साबुदाण्याचे पीठ घालावे. चवीपुरते मीठ घालावे व एकत्र मळावे. शेवटी तेलाचा हात लावून एकसारखे करावे.

  2. 2

    आता सारण तयार करावे. नारळाचा खव एका मोठ्या बाऊलमध्ये घ्यावा. त्यामध्ये साखर, ड्रायफ्रूट्स्, कोथिंबीर, मीठ व चतकोर लिंबू पिळावे.

  3. 3

    आता पीठाचे व सारणाचे समान भाग करावेत. पीठाची एक गोळी घेवून मोदकाप्रमाणे पारी करून त्यामध्ये सारण भरावे व तोंड बंद करावे.हाताने फिरवून गोल आकार द्यावा.

  4. 4

    सर्व करून झाल्यावर मध्यम आचेवर तळून घ्यावेत.

  5. 5

    चटणीचे सर्व साहित्य एकत्र मिक्सरच्या भांड्यात घेवून आवश्यकतेनुसार पाणी घालून वाटून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Namita Patil
Namita Patil @namitapatil
रोजी

Similar Recipes