फ्लाॅवर फ्राय...बिना कांदा लसूण (flower fry recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#GA4. #Week24. कीवर्ड--Cauliflower
फ्लाॅवर ...नावातच फुल असलेली ही फळभाजी.. .. full range of variety..किती प्रकारच्या रेसिपीज तयार होतात या फ्लाॅवर पासून..अगदी soups पासून ते flower crispies पर्यंत..घेशील किती दो कराने..या उक्तीप्रमाणे..करशील किती दो कराने या सगळ्या varieties..हो पण या फ्लाॅवरचं friend circle मात्र selected च.. 😊टोमॅटो,बटाटा,कांदा,वाटाणा,लसूण,मिरची,आलं, कोथिंबीर बस्स. ..यांच्या गोतावळ्यात तो छान रमतो..जर का ही सगळी टीम मिळून खेळत असली तर ताट रुपी ग्राउंड वरुन चवीचे असे काही चौकार,षटकार मारतात ही मंडळी..की ताटाभोवती च्या स्टेडियम मध्ये बसलेले प्रेक्षक एकदम खुश..😋🥳होऊन या टीमला भरभरुन दाद देतात..तुम्ही पण या टीमला support करत असाल ना..पण आज मात्र मी फ्लाॅवर,बटाटा, टोमॅटो याच खेळाडूंना खेळवलंय..बाकीच्यांना rest दिलीये..😜..कारण नैवेद्यरुपी मॅच असली की काळजीपूर्वक खेळाडू select करावे लागतात..सात्विकता हा criteria पाळावा लागतो म्हणून दुसरं काही नाही..😄..
चला तर मग फ्लाॅवर,बटाटा, टोमॅटो हे त्रिकुट मिळून ही inning कशी खेळतात ते तुम्हीच बघा..😜

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20मिनीटे
4जणांना
  1. 250 ग्रॅमफ्लाॅवर
  2. 2मध्यम बटाटे
  3. 2-3टोमॅटो
  4. 1 टीस्पून लाल तिखट
  5. 1/2 टीस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  6. 1 टीस्पून धने पावडर
  7. मीठ चवीनुसार
  8. 1 टीस्पूनसाखर
  9. 4-5 कढीपत्त्याची पाने
  10. कोथिंबीर
  11. ओलं खोबरं ऑप्शनल

कुकिंग सूचना

15-20मिनीटे
  1. 1

    प्रथम फ्लावर स्वच्छ धुऊन त्याचे तुरे काढून घ्यावेत बटाटा आणि टोमॅटो यांच्या चौकोनी फोडी करून घ्यावेत

  2. 2

    एका कढईमध्ये तेल घाला तेल तापले की जीरे मोहरी हिंग हळद घालून खमंग फोडणी करून घ्या त्यात कोथिंबीर आणि कढीपत्ता घाला एकदा परतून घ्या नंतर यामध्ये बटाट्याच्या फोडी घाला आणि बटाट्याच्या फोडी सोनेरी रंगावर परतून घ्या.

  3. 3

    नंतर यामध्ये टोमॅटोच्या फोडी घालून टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.. आता यामध्ये तिखट,धणे पावडर मीठ,साखर घालून व्यवस्थित मिक्स करा आणि मंद आचेवर एक-दोन वाफा काढा..

  4. 4

    नंतर फ्लॉवरचे तुरे घालून भाजी एकजीव करा. थोडा पाण्याचा हबका मारा आणि कढईवर ताटली ठेवून त्यावर पाणी ठेवा.. आणि वाफेवर भाजी शिजवून घ्या. आपल्याला खूप पाणी भाजी मध्ये घालायचे नाहीये.फक्त अधून मधून भाजी शिजण्यासाठी दोन चार पाण्याचे हबके मारायचेत.
    तयार झाली आपली फ्लॉवर फ्राय भाजी..

  5. 5

    तयार झालेली भाजी एका डिशमध्ये काढून वरुन कोथिंबीर खोबरे घालून गरमागरम पोळी फुलका,भाताबरोबर सर्व्ह करा..

  6. 6
  7. 7
  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Similar Recipes