मसालेभात खास लग्नातील.. (masale bhaat recipe in marathi)

मसालेभात खास लग्नातील.. (masale bhaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ धुऊन, किंचित पाणी ठेवून दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवावे. तोपर्यंत कोबी स्वच्छ करून त्याचे तुरे काढून घ्यावे. हिरवे वाटाणे पाण्यात साखर आणि मीठ टाकून वाफवून घ्यावे.
- 2
उकडलेला बटाटा सोलून त्याचे मोठे तुकडे करावे. कांदा टोमॅटो चिरून घ्यावे. हिरवी मिरची चिरुन घ्यावे. खडा मसाला काढून ठेवावा.
- 3
आता गॅसवर एका कढईत तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यात शहाजिरे, काळी मिरी, तेजपान, कलमी, लवंग, वेलची टाकावी. किंचीत परतून घेतल्यावर,त्यात कांदा आणि हिरवी मिरची टाकावी. त्याचप्रमाणे आले लसूण पेस्ट टाकावी. परतून घ्यावे. आता त्यात तिखट आणि हळद टाकावी व मिक्स करून घ्यावे.
- 4
आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी टाकाव्या आणि मिक्स करावे. एक ते दोन मिनीट परतून घेतल्यावर त्यात टोमॅटो टाकावा.
- 5
टोमॅटो टाकून परतून घेतल्यावर त्यात, भिजलेला तांदूळ वाटीने मोजून घ्यावा आणि टाकावा.जेवढ्या वाट्या भिजलेला तांदूळ राहील, त्याच्या दुप्पट पाणी टाकावयाचे आहे. म्हणून कोरडा तांदूळ मोजण्या ऐवजी भिजवलेला तांदूळ मोजावा. परतून घ्यावा. तांदूळ परतून घेईपर्यंत त्यात टाकावयाचे पाणी गरम करून घ्यावे. आणि गरम पाणी त्यात टाकावे.
- 6
पाणी टाकल्यानंतर त्यात कोबीचे तुरे टाकावे. चवीनुसार मीठ आणि मसाला टाकावा. मिक्स करून घ्यावे आणि अगदी मंद आचेवर झाकण ठेवून दहा ते बारा मिनिट शिजवून घ्यावे.
- 7
साधारणता दहा मिनिटांनी झाकण उघडून बघावे. तांदूळ यासोबतच कोबी ही शिजलेला दिसेल. तांदूळ शिजल्याची खात्री केल्यानंतर त्यात पूर्वीच वाफवून घेतलेले हिरवे वाटाणे टाकावे आणि मिक्स करून घ्यावे. तसेच चिरलेली कोथिंबीर टाकावी.
- 8
लग्नात ज्याप्रमाणे मसालेभात करतात त्याच चवीचा मसालेभात तयार आहे... सर्व्ह करताना मसालेभातवर कोथंबीर, खोबऱ्याचा कीस आणि तुपाचा गोळा टाकून सर्व्ह करावे. चविष्ट मसाले भात खाताना कढी आवश्यकच..😋 तेव्हा मसाले भात करताना सोबत कढी करण्याचे विसरू नये. 😀
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसालेभात.. (masale bhaat recipe in marathi)
#लंच#मसालेभातकधी कंटाळा आला स्वयंपाक करायला किंवा घरातील सदस्याना जास्त भूक नसली, अशा वेळेस जर तुम्ही कुठल्याही गृहिणीला विचारले.. मग आज काय बेत... श्वास न घेता एका शब्दात उत्तर दिले जाते....मसाले भात आणखीन काय... 😊कुठली छोटी मोठी पार्टी असली आणि जास्त तामझाम नको असेल अशा वेळेस मसालेभात आणि कढी ठरलेला मेनू. एवढेच काय महाप्रसादामध्ये देखील मसाले भाताचा पहिला नंबर...करायला सोपा लवकर होणारा मसालेभात सर्वांना घेऊन चालतो. महाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान असलेला मसाले भात, एखाद्या व्हेज बिर्याणी ला लाजवेल इतकी चव आणि रंग या मसालेभातला असते. लांबसडक बासमती तांदूळ असो किंवा कोकणातील आंबेमोहोर तांदूळ असो किंवा कुठलाही सुगंधित तांदूळ मसाले भातासाठी चालतो. विविध भाज्या ज्या शिजल्यानंतरही आपला रंग आणि आकार शाबूत ठेवू शकतात अशा भाज्या... जशा की, तोंडली, फरसबी, गाजर, वटाणे, बटाटा, फ्लॉवर आणि याउपरही मसाले भाताचा खरा नायक असतो, तो यात पडणाऱ्या मसाला... म्हणजेच गोडा मसाल्याची...असा हा मसालेभात अडचणीच्या वेळेस गृहिणीच्या मदतीला धावून येणारा, त्याहीपेक्षा सगळ्या आनंदाच्या प्रसंगी जेवणात अग्रस्थानी असलेला,आणि त्याचा जोडीदार म्हणजेच आंबट-गोड चवीची कढी..अस्सा मसाले भाताचा घास घेऊन वर कढीचा मारलेला भुरका.. ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा.... 💃 💕 Vasudha Gudhe -
मसालेभात (महाप्रसाद) (masale bhat recipe in marathi)
#KS6#जत्रेतील जेवणमहाप्रसाद किंवा भंडारा म्हणून महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मसालेभात करतात. सोबत बुंदा आणि कढी असते. Priya Lekurwale -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक प्लॅनर#शुक्रवार मसालेभात महाराष्ट्रीयन घरांमध्ये केली जाणारी रेसिपी आहे R.s. Ashwini -
मसालेभात (masale bhaat recipe in marathi)
#GR भाताचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे मसालेभात.काही कार्यक्रम असले की मसाले भाताचा बेत ठरलेला असतोच. Sujata Gengaje -
महाराष्ट्रीयन चमचमीत मसालेभात (masale bhaat recipe in marathi)
#लंच# शुक्रवार - मसालेभातसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील पाचवी रेसिपी.मसाले भाताशिवाय पंगतीचे जेवण अपूर्णच असतं. गोडा मसाला, साजूक तूप , ओलं खोबरं ,मठ्ठा,जिलबी याचं अप्रतिम आणि चमचमीत combination म्हणजे मसाले भात...😋😋त्यातही भर म्हणून तूपात तळलेले काजूगर म्हणजे नखशिखांत नटलेलया सौंदर्यवंतीच्या भाळावरील चंद्रकोरच जणू!!😊चला तर,पाहूयात चमचमीत मसालेभाताची रेसिपी. Deepti Padiyar -
तुरीच्या दाण्यांचा मसालेभात (torichya danancha masala bhaat recipe in marathi)
#लंच #खास महाराष्ट्रीयन पदार्थ! लग्नामध्ये मसालेभात आवश्यकच! आता त्यातही अनेक प्रकार... Varsha Ingole Bele -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#GR मसाले भात नाव ऐकताच आठवण येते ती लग्नामध्यील पंक्तीची...... काजू भाज्या वापरुन केलेला चविष्ट भात आणि वरून घातलेली कोथिंबीर खोबरे आणि तूप घालून अहाहा काय सुंदर सुवास असतो या भाताला... आणि चव तर काय अप्रतिम.... मी आज हा मसालेभात लग्नामध्यील पंक्तीमध्ये असतो तसा करायचा प्रयत्न केला आहे पहा तुम्हाला कशी वाटते रेसिपी.... Rajashri Deodhar -
महाराष्ट्रीयन मसालेभात (masale bhat recipe in marathi)
#श्रावणस्पेशल#कुकस्नॅपचॅलेंज#shrमहाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान असणारा, रंगीबेरंगी मसाले भात ...😋😋गोडा मसाला,साजूक तूप ,ओले खोबरे यांचे चमचमीत काॅम्बीनेशन असलेला हा चमचमीत मसाले भात आणिआज मी @cook_20602564 preeti Salvi यांची मसालेभात कुकस्नॅप केला खूप छान झाला आहे मसाले भात..👌👌😋😋माझ्या मुलीने तर गरमागरम फस्त केला..😊सोबतीला जिलबी आणि मठ्ठा तर हवाच!! 😊 Deepti Padiyar -
मसाले भात.. (masale bhaat recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर #शुक्रवार मसाले भात-एक खमंग महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती.. फार पूर्वीपासूनच लग्नकार्यातील जेवणावळी घरातील सर्व सण ,समारंभ, यामध्ये मसाले भाताचे नाव मोठ आग्रहाने घेतले जायचे.. म्हणजे जेवणात पहिल्या वरण-भातानंतर मसाले भात हा हवाच.. शास्त्र होते ते.. परंतु आता लग्नाच्या जेवणावळीत मसालेभात हरवत चालला आहे. घरामध्ये सणांना केला जातो.. तो पण कधीतरी.. विविध मसाले, आवडीच्या भाज्या ,भरपूर साजूक तूप ,लिंबू ,खोबरं ,कोथिंबीर असा सगळा जामानिमा करून मसालेभाताला राजबिंड रूप दिलं जातं.. मसालेभातात मुक्त काजूची उधळण त्याला आणखीनच राजेशाही बनवते. दोन वर्षापूर्वी एका रेसिपी ग्रुपच्या अंगत-पंगत साठी माझ्या घरी आम्ही दहा जणी एकमेकांना आधी कधीही न बघितलेल्या यासाठी जमलो होतो. प्रत्येकीने चवदार चविष्ट पदार्थ करून आणले होते मी मसालेभात मठ्ठा व इतर पदार्थ केले होतेखूप मजा आली होती त्या दिवशी हसत-खेळत आमची अंगतपंगत पार पडली. पण हे तिथे थांबले नाही .आमच्या दहा जणींची मैत्री मात्र मसालेभात सारखीच स्वादिष्ट व रुचकर झाली .मसालेभातातील वेगवेगळ्या मसाल्यांचा प्रमाणेच आम्ही वेगवेगळ्या स्वभाव गुणधर्माचे आहोत. म्हणूनच आमचा "मैत्रीचा मसालेभात" दिवसेंदिवस खमंग होतोय.चला तर . Bhagyashree Lele -
झण झणीत - मसालेभात (masale bhaat recipe in marathi)
#लंच#मसालेभातआज मी बासमती तंदुळ वापरून मसाले भात केला आहे एक वेगळीच टेस्ट नेहमी पेक्षा. (नेहमी आपण रोजच्या वापरातला तांदूळ वापरतो.)थंडी चा सीझन मध्ये येणाऱ्या भाज्या वापरून केलेला मसाले भात, म्हणजे मेजवानी..... Sampada Shrungarpure -
हराभरा मसालेभात (harbhara masale bhaat recipe in marathi)
#GR#मसालेभातथंडी हा भरपूर भाज्या मिळण्याचा सिझन या सिझन मध्ये हरभरा, पावटा,वाटाणे, वाल,वांगी, गाजर मुबलक मिळतात याचा फायदा म्हणजे भरपूर विविध पदार्थांची रेलचेल जेवणात दिसून येते. मसाले भात हे त्यातील एक. Supriya Devkar -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
दुपारचे जेवण आटोपून वामकुशी घेत होते. अचानक दारावरची बेल वाजली...समोर बघते तर काय साक्षात बहिणाबाई अवतरल्या....(चौधरी नाही )माझी लहान बहीण लाॅकडाऊनमुळे बऱ्याच दिवसांपासून तिचं येण्याचं प्रयोजन जरा लांबतच गेलं पण लाॅकडाऊनचं वातावरण जरा शिथिल झालं आणि आम्हा बहिणींचा भेटण्याचा योग घडून आला....मग काय इकडच्या- तिकडच्या गप्पांना जणू उधाणंच आलं....बघता बघता वेळ कसा भुरकन उडून गेला आणि संध्याकाळच्या जेवणाचं काय ?परत हा प्रश्न डोळ्यांपुढे आ वासून उभा राहिला....मग काय बहिणीच्या सांगण्यानुसार तिला आणि माझ्या मुलींनाही प्रचंड आवडणारा 'मसाले भाताचा' बेत आखला आणि हो तेवढ्या गप्पांमध्ये पण फोटो काढायला मात्र मी अजिबात विसरली नाही बर का....कारण माझी रेसिपी इतकी छान कि ती तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली.......तो हो जाये मसालेभात....!!! Seema Mate -
गावरान तोंडली मसालेभात (gavran tondli masalebhaat recipe in marathi)
#GRकुणीही पाहुणा येणार म्हंटले की गावाकडचा खाशा बेत तो म्हणजे मसालेभात. म्हणतात ना दोन कोसावर जशी भाषा बदलते तशी पदार्थ बनवण्याची रीत, पद्धत ही बदलत जाते..जरी तोच पदार्थ असेल तरीही.याच मसालेभाताचा एक प्रकार तोंडली मसालेभात. गरमागरम तोंडली मसालेभात तूप, लिंबू, पापड,मठ्ठा मस्त फक्कड बेत. चला पाहूया रेसिपी. Shital Muranjan -
"मैत्रीचा मसालेभात" (masala bhaat recipe in marathi)
#लंच#शुक्रवार_मसालेभात" मैत्रीचा मसालेभात "मैत्रीचा मसालेभात नाव ऐकून जरा वेगळं वाटलं असेल ना..!! पण त्याच नाव अस का बरं ते सांगते. माझी आणि भाग्यश्री ताईची ओळख बरोबर 2 वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात झाली होती, आणि दुसऱ्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ताईच्या घरी जाणं झालं,तेव्हा तिच्या हातची मसालेभाताची आणि त्या सोबत इतर पदार्थांची मेजवानी चाखायला मिळाली, तेव्हाच खरतरं ताई ने ही रेसिपी मला दिली, जी आजही मी वरचेवर नेहमी बनवत असते... ताई ची आणि आमची निखळ मैत्री आणि ताईसारख्या अस्सल सुगरणीच्या हातची चव त्या मुळे याला मी " मैत्रीचा मसालेभात " असं म्हणते. चला तर मग एकदम सोपी आणि मस्त अशी ही रेसिपी बघूया. Shital Siddhesh Raut -
पारंपरिक मसालेभात (masale bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#चंद्रकोरचंद्रकोर आपल्या पारंपरिकतेचे प्रतीक आहे. सण समारंभ असो किंवा कोणताही कार्यक्रम असला की आपल्या महाराष्ट्रात मसालेभात हा असतोच. मी आज सोप्या पद्धतीने मसालेभात कसा करायचा याची रेसिपी सांगितली आहे. आज या मसालेभातमध्ये फक्त मटार वापरले आहेत पण तुम्ही मटारसोबत तोंडली किंवा बटाटा आणि फ्लॉवर पण वापरू शकता. Manali Jambhulkar -
महाराष्ट्रीयन मसाले भात. (maharastrian masale bhaat recipe in marathi)
#लंच साप्ताहिक लंच प्लॅनर ची पाचवी रेसिपी.. महाराष्ट्रातले लग्न म्हंटले की मसाले भात हमखास पाहायला मिळतो...असा हा स्वादिष्ट मसाले भात रेसिपी पाहा.. Megha Jamadade -
मैत्रीचा मसालेभात (masale bhaat recipe in marathi)
#cooksnap # Shital Siddhesh Raut # धन्यवाद शितल, तुझ्या या चवदार रेसिपी बद्दल ....खरच या पद्धतीने मी पहिल्यांदाच मसालेभात केलेला आहे, आणि तयार झालेला मसालेभात, घरच्या सर्वांना खूपच आवडला..😋 पुन्हा एकदा धन्यवाद. Varsha Ingole Bele -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#Gr#मसालेभातमसाले भात बघता ,आणि विचार करता फक्त लग्नाच्या पंक्ती ,समारंभ आठवतात मला आठवते लहानपणी फक्त लग्नसमारंभात मसाले भात खाण्यासाठीच आम्ही आवर्जून जायचो. मसालेभात बरोबर माझी आठवण हि माहेरची आहे मी ज्या कॉलनीत/ गल्लीत वाढली 50 घरांची माझी कॉलनी आहे त्या कॉलनित सगळ्या प्रकारची लोकं राहतात प्रत्येक सणवार, सुख-दुःख तिथे एकमेकांत बरोबर वाटून करतात मसालेभात हा माझ्या सर्वात जास्त आवडीचा माझ्या कॉलनीतले राहुडे काका ते हा मसाले भात खूप जबरदस्त आणि छान बनवतात त्यांना खाऊ घालण्याची खूप आवड आहे आत्ताच मी माहेरी जाऊन आली तेव्हा ही त्यांनी गल्लीत चूल मांडून मोठ्या पातेल्यात मसाले भात तयार केला आणि सगळ्यांना बोलून खाऊ घातला मी ही भरपूर खाल्लात्यांच्या घरी लग्नसमारंभात आवर्जून फक्त मसाले भात साठी जायचं सुख दुःखातही त्यांच्याकडचा मसाले भात खाऊ नही यायचो आणि घरी पण घेऊन यायचो. प्रत्येक पदार्थाचा हा आपला पहिला एक अनुभव खाण्याचा पहिल्यांदा कुठे खाल्ला त्याची आठवण प्रत्येकाला असतेच तशी मसाले भात माझी पहिली आठवण म्हणून मला राहुडे काका समोर येतात आजही माहेरी जाते त्यांना सांगावे लागते कामी आली आहे मसालेभात पाठवा आणि ते आवर्जून पाठवतात.आजही त्यांना आठवण करून मसालेभात तयार करत होती प्रयत्न करत होती तो टेस्ट आणण्याचा तिच सगळे घटक टाकण्याचा प्रयत्नही केला. आता तो भात कसा तयार झाला त्याची पावती तर काकांकडून मिळणार पण ते शक्य नाही. अजून एक मसालेभात आमच्या कॉलनीत अश्विन नवरात्र मध्ये भंडारा भरतो पायी जाणाऱ्या यात्रांकरू साठी तिथे मसाले भात ,मठठा ,पुरी भाजी जेवण देतात माहेरी होती तेव्हा रोज खायची.माझ्यामसालेभाताच्यागोड आठवणी आज शब्दात रेसिपी बघूया प्रयत्न केला पारंपारिक पद्धतीने तयार करण्याचा Chetana Bhojak -
कढी गोळे (kadhi gode recipe in marathi)
#GR#गावरान#कढीगोळेगावरान म्हटलं की आपल्याला गावाकडचेपारंपारिक जेवण आठवतं. त्यातलाच हा एक प्रकार कढी गोळे.... गावागावात हा पदार्थ खूपच लोकप्रिय आहे. भाज्याचे दुर्भिक्ष्य असेल तेव्हा कढी गोळे बनवले जातात. करायला खूपच सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे, कढी गोळ्या बरोबर मी चपाती, भात, मेथीची भाजी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्यानी ताट सजवले आहे, तर मग अजून काय पाहिजे,चला कढी गोळे ची रेसिपी बघूया.😋 Vandana Shelar -
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8 #W8मटार चा सीजन म्हटलं की मटार भात आलाच मग तो साधना पांढरा मटार भात असो किंवा मसालेभात असो त्याची चव वेगळीच थंडीच्या सीझनमध्ये मटार गाजर हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि यातच मग तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकतात चला तर मग आपण बनवूयात मटार मसालेभात Supriya Devkar -
महाराष्ट्रीयन मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#cooksnapमहाराष्ट्रीयन मसाले भात आज मी गुढीपाडव्याच्या निमित्त बनवला आहे मेघा जमदाडे ताई यांची मी रेसिपी कूकस्नॅप केली आहे थोडासा बदल करून मसालेभात बनवला आहे, खूपच मस्त लागत आहे घरच्यांनाही खूप आवडला. चला तर मग बघुया सणासुदीला बनवला जाणारा महाराष्ट्रीयन मसाले भात कसा बनवायचा😘🙏 Vandana Shelar -
मसालेभात (masale bhat recipe in marathi)
#mfrमसालेभात एक परिपूर्ण जेवण आहे... एकदम वन पॉट मिल... सगळ्या असलेल्या भाज्या वापरून आपण करू शकतो.. सगळं साहित्य एकवेळ फोडणी करून कूकर मध्ये झटपट तयार होतो... Shital Ingale Pardhe -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#GR # गावरानी रेसिपीज # शेव भाजी...मस्त चमचमीत आणि झणझणीत....पटकन होणारी.... भाज्या उपलब्ध नसल्या, की गृहिणीच्या कामी पडणारी... Varsha Ingole Bele -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुकWeek 4महाराष्ट्रीयन मसाले भात हा एक प्रकारचा पुलाव असून याचे महाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान आहे. याच्याइतका रंगीबेरंगी पुलाव क्वचितच पाहण्यात येतो. आमच्या कोकणात आंबेमोहोर तांदूळ हा मानाचा, विविध भाज्या ज्या शिजल्यानंतरही आपला रंग आणि आकार शाबूत ठेवू शकतात अशा भाज्या जशा कि तोंडली, फरसबी, फ्लॉवर , मटार ,गाजर ,बटाटे आणि याउप्पर मसालेभाताचा खरा नायक असतो तो यात पडणारा मसाला. लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा मसाले भात मला खूप आवडतो. तसाच मसाले भात बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी. ज्यांना कांदा लसूण वर्ज्य आहे त्यांनी हा भात जरुर खावा. एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. स्मिता जाधव -
-
बंगाली खिचडी (khichuri) (bengali khichdi recipe in marathi)
#पूर्व # वेगवेगळ्या भाज्या टाकून, तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी (khichuri) बंगालमध्ये प्रसाद म्हणून दुर्गा पूजेचे वेळी करतात. अशी ही चविष्ट आणि पौष्टिक खिचडी आज बनविली आहे. Varsha Ingole Bele -
वेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#GA4 #week16 बिर्याणी...वेज बिर्याणी, स्वादिष्ट आणि चविष्ट!😋 Varsha Ingole Bele -
वेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#डिनर # ज्यांना चमचमीत आणि तिखट जेवायला आवडते, त्यांच्यासाठी वेज कोल्हापुरी, मस्त मेनू आहे... Varsha Ingole Bele -
मटार खिचडी/मटार भात (matar khichdi recipe in marathi)
#GA4 #Week7 की वर्ड #खिचडी #मटार_खिचडी😋 उन उन खिचडी ..खिचडीवर साजूक तूप वेगळं रहायचं आगळंच सुख... प्रा.विसुभाऊ बापट यांना देखील खिचडीचा आपल्या कवितेत उल्लेख करायचा मोह टाळता आला नाहीये..आबालवृद्धांना आवडणारा ,झटपट होणारा पदार्थ,काय करावा आता स्वयंपाक असा प्रश्र्न गृहिणीला पडला की पहिली आणि शेवटची पसंती खिचडीलाच जाते..आणि आनंदाने वेळ निभावून नेली जाते..हा एकमेव असा पदार्थ आहे की जो सुगरणीं मध्ये तर प्रिय आहेच.पण शिक्षण,नोकरी,कामधंद्यासाठी घरापासून आईच्या हाताच्या जेवणापासून लांब राहणार्या या मंडळींची पहिली पसंती खिचडीच आहे..कारण ही एकच अशी रेसिपी आहे की जी सगळ्यांनाच बनवता येते..काही नाही मिळालं तर खिचडी तरी खाऊ या भावनेनं ते शिकत असावेत.. हीच भावना कोरोनामुळे झालेल्या lockdown चर्या वेळेस होती.म्हणूनडाळतांदळाची बेगमी..प्रत्येक एक प्रांतातील खिचडी वैशिष्ट्य पूर्ण...खास चव असलेली..काही ठिकाणी पिवळी मूगडाळ,हिरव्या सालीची मूगडाळ, तूरडाळ,मसूर डाळीची,मेथीची,मटकीची,डाळिंब्यांची , बाजरीची,नाचणीची,मोड आलेल्या हिरव्या मूगाची खिचडी केली जाते.. non veg मध्ये पण खूप variations.. आपापल्या आवडत्या चवीनुसार त्यात मसाले,भाज्या घातल्या जातात..पण कशीही केली तरी खिचडी हे पूर्णान्नच ठरते..fully loaded with carbs n protein...पोटभरीची आणि तृप्तीचा अहसास देणारी..😋😋खिचडीच्या जोडीला जर तिचे लोणचं,पापड, कुरडई,तूप,मठ्ठा,ताक हे सख्खे जिवलग असतील तर चार चांद लागलेच म्हणून समजा.. अहाहा केवळ स्वर्गसुखच...😍😍 चला तर मग आज आपण माझी रेसिपी असलेली मटार खिचडी अगदी साधी पण अत्यंत चविष्ट चवदार सात्त्विक खिचडी पाहू या.. Bhagyashree Lele -
मसाले भात (masale bhat recipe in marathi)
महाराष्ट्रीयन समारंभात किंवा सणवार लग्न सराईत हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात.खडा मसाला आणि सुवासिक तांदूळ वापरला कि हा साधा सोपा मसाले भात शाही होऊन जातो.गोडा मसाला व सर्व भाज्या घालून हा मसाले भात चविष्ट लागतो.आणि मसाले भात शिजत आला की वरुन तुपाची धार सोडावी त्यावर बारीक कोथिंबीर खोबरं असेल तर क्या बात है, तोंडाला पाणी सुटलं ना, करून बघा असा मसाले भात.. Aadhya masurkar
More Recipes
टिप्पण्या (2)