तुरीच्या दाण्यांचा मसालेभात (torichya danancha masala bhaat recipe in marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
तुरीच्या दाण्यांचा मसालेभात (torichya danancha masala bhaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून 15 मिनिट भिजवावे. तुरीचे दाणे धुवून घ्यावे.गाजर चिरून घ्यावे.
- 2
गॅस सुरू करून गॅसवर कुकर ठेवावा. त्यात फोडणीसाठी तूप टाकावे. जीरे मोहरी तेजपाल, मिरची, कढीपत्ता, मिरे, दालचिनी, वेलची, लवंग टाकून परतून घ्यावे. त्यानंतर त्यात, गाजर, आणि खोबरे टाकून परतावे. नंतर त्यात, हळद, धणेपूड, मसाला टाकून एकत्र करावे.
- 3
आता त्यात तुरीचे दाणे टाकावे. चांगले मिक्स केल्यावर त्यात तांदूळ टाकावे. व थोडे परतून घ्यावे.
- 4
3-4 मिनिट परतल्यावर त्यात पाणी टाकावे. कुकर बंद करून, 3 शिट्या काढून घ्याव्यात. थंड झाल्यावर, वरून कोथिंबीर टाकावी.
- 5
गरमागरम मसालेभात तयार आहे. या भातासोबत, कढी आवश्यकच! तेव्हा सर्व्ह करताना मसालेभात आणि कढी....खाणारा खुश....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसालेभात खास लग्नातील.. (masale bhaat recipe in marathi)
#GR #गावरान रेसिपीज # महाराष्ट्रीयन लग्नामध्ये पूर्वी मसालेभाताशिवाय जेवण राहायचे नाही...त्याशिवाय जेवण अपूर्ण..असा हा मसालेभात..आणि मसालेभात म्हटला की कढी किंवा ताक हवेच...तेव्हा जेव्हाही मसालेभात करते मी, तेव्हा हमखास कढी करावीच लागते.... Varsha Ingole Bele -
मसालेभात.. (masale bhaat recipe in marathi)
#लंच#मसालेभातकधी कंटाळा आला स्वयंपाक करायला किंवा घरातील सदस्याना जास्त भूक नसली, अशा वेळेस जर तुम्ही कुठल्याही गृहिणीला विचारले.. मग आज काय बेत... श्वास न घेता एका शब्दात उत्तर दिले जाते....मसाले भात आणखीन काय... 😊कुठली छोटी मोठी पार्टी असली आणि जास्त तामझाम नको असेल अशा वेळेस मसालेभात आणि कढी ठरलेला मेनू. एवढेच काय महाप्रसादामध्ये देखील मसाले भाताचा पहिला नंबर...करायला सोपा लवकर होणारा मसालेभात सर्वांना घेऊन चालतो. महाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान असलेला मसाले भात, एखाद्या व्हेज बिर्याणी ला लाजवेल इतकी चव आणि रंग या मसालेभातला असते. लांबसडक बासमती तांदूळ असो किंवा कोकणातील आंबेमोहोर तांदूळ असो किंवा कुठलाही सुगंधित तांदूळ मसाले भातासाठी चालतो. विविध भाज्या ज्या शिजल्यानंतरही आपला रंग आणि आकार शाबूत ठेवू शकतात अशा भाज्या... जशा की, तोंडली, फरसबी, गाजर, वटाणे, बटाटा, फ्लॉवर आणि याउपरही मसाले भाताचा खरा नायक असतो, तो यात पडणाऱ्या मसाला... म्हणजेच गोडा मसाल्याची...असा हा मसालेभात अडचणीच्या वेळेस गृहिणीच्या मदतीला धावून येणारा, त्याहीपेक्षा सगळ्या आनंदाच्या प्रसंगी जेवणात अग्रस्थानी असलेला,आणि त्याचा जोडीदार म्हणजेच आंबट-गोड चवीची कढी..अस्सा मसाले भाताचा घास घेऊन वर कढीचा मारलेला भुरका.. ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा.... 💃 💕 Vasudha Gudhe -
महाराष्ट्रीयन चमचमीत मसालेभात (masale bhaat recipe in marathi)
#लंच# शुक्रवार - मसालेभातसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील पाचवी रेसिपी.मसाले भाताशिवाय पंगतीचे जेवण अपूर्णच असतं. गोडा मसाला, साजूक तूप , ओलं खोबरं ,मठ्ठा,जिलबी याचं अप्रतिम आणि चमचमीत combination म्हणजे मसाले भात...😋😋त्यातही भर म्हणून तूपात तळलेले काजूगर म्हणजे नखशिखांत नटलेलया सौंदर्यवंतीच्या भाळावरील चंद्रकोरच जणू!!😊चला तर,पाहूयात चमचमीत मसालेभाताची रेसिपी. Deepti Padiyar -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक प्लॅनर#शुक्रवार मसालेभात महाराष्ट्रीयन घरांमध्ये केली जाणारी रेसिपी आहे R.s. Ashwini -
तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे (torichya danayche kadigode recipe in marathi)
#कढीगोळे# महाराष्ट्रीयन, त्यातही वैदर्भीय! हिवाळ्यात ओल्या तुरीच्या शेंगा आल्या की गावाकडील खास मेनू म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे! अगदी आवडीचा पदार्थ... Varsha Ingole Bele -
-
मसालेभात (masale bhaat recipe in marathi)
#GR भाताचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे मसालेभात.काही कार्यक्रम असले की मसाले भाताचा बेत ठरलेला असतोच. Sujata Gengaje -
झण झणीत - मसालेभात (masale bhaat recipe in marathi)
#लंच#मसालेभातआज मी बासमती तंदुळ वापरून मसाले भात केला आहे एक वेगळीच टेस्ट नेहमी पेक्षा. (नेहमी आपण रोजच्या वापरातला तांदूळ वापरतो.)थंडी चा सीझन मध्ये येणाऱ्या भाज्या वापरून केलेला मसाले भात, म्हणजे मेजवानी..... Sampada Shrungarpure -
मैत्रीचा मसालेभात (masale bhaat recipe in marathi)
#cooksnap # Shital Siddhesh Raut # धन्यवाद शितल, तुझ्या या चवदार रेसिपी बद्दल ....खरच या पद्धतीने मी पहिल्यांदाच मसालेभात केलेला आहे, आणि तयार झालेला मसालेभात, घरच्या सर्वांना खूपच आवडला..😋 पुन्हा एकदा धन्यवाद. Varsha Ingole Bele -
"मैत्रीचा मसालेभात" (masala bhaat recipe in marathi)
#लंच#शुक्रवार_मसालेभात" मैत्रीचा मसालेभात "मैत्रीचा मसालेभात नाव ऐकून जरा वेगळं वाटलं असेल ना..!! पण त्याच नाव अस का बरं ते सांगते. माझी आणि भाग्यश्री ताईची ओळख बरोबर 2 वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात झाली होती, आणि दुसऱ्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ताईच्या घरी जाणं झालं,तेव्हा तिच्या हातची मसालेभाताची आणि त्या सोबत इतर पदार्थांची मेजवानी चाखायला मिळाली, तेव्हाच खरतरं ताई ने ही रेसिपी मला दिली, जी आजही मी वरचेवर नेहमी बनवत असते... ताई ची आणि आमची निखळ मैत्री आणि ताईसारख्या अस्सल सुगरणीच्या हातची चव त्या मुळे याला मी " मैत्रीचा मसालेभात " असं म्हणते. चला तर मग एकदम सोपी आणि मस्त अशी ही रेसिपी बघूया. Shital Siddhesh Raut -
खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 #खानदेशी मसाला खिचडी... आता खिचडी ही वेगवेगळ्या प्रकारे केल्या जाते.. अगदी खानदेशात सुध्दा, प्रत्येक घरात वेगळ्या पद्धतीने केलेली असते खिचडी .मी ही अशीच केली आहे खिचडी... फक्त तिखटाचे प्रमाण कमी केले आहे ..😀 Varsha Ingole Bele -
मसाला भात रेसिपी (masala bhaat recipe in marathi)
#लंच-4- आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील मसालेभात ची रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
मसालेभात रेसिपी (masale bhaat recipe in marathi)
#लंच#सप्ताहिक प्लॅनर#मसाले भात रेसिपी Rupali Atre - deshpande -
गावरान तोंडली मसालेभात (gavran tondli masalebhaat recipe in marathi)
#GRकुणीही पाहुणा येणार म्हंटले की गावाकडचा खाशा बेत तो म्हणजे मसालेभात. म्हणतात ना दोन कोसावर जशी भाषा बदलते तशी पदार्थ बनवण्याची रीत, पद्धत ही बदलत जाते..जरी तोच पदार्थ असेल तरीही.याच मसालेभाताचा एक प्रकार तोंडली मसालेभात. गरमागरम तोंडली मसालेभात तूप, लिंबू, पापड,मठ्ठा मस्त फक्कड बेत. चला पाहूया रेसिपी. Shital Muranjan -
मसाले भात.. (masale bhaat recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर #शुक्रवार मसाले भात-एक खमंग महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती.. फार पूर्वीपासूनच लग्नकार्यातील जेवणावळी घरातील सर्व सण ,समारंभ, यामध्ये मसाले भाताचे नाव मोठ आग्रहाने घेतले जायचे.. म्हणजे जेवणात पहिल्या वरण-भातानंतर मसाले भात हा हवाच.. शास्त्र होते ते.. परंतु आता लग्नाच्या जेवणावळीत मसालेभात हरवत चालला आहे. घरामध्ये सणांना केला जातो.. तो पण कधीतरी.. विविध मसाले, आवडीच्या भाज्या ,भरपूर साजूक तूप ,लिंबू ,खोबरं ,कोथिंबीर असा सगळा जामानिमा करून मसालेभाताला राजबिंड रूप दिलं जातं.. मसालेभातात मुक्त काजूची उधळण त्याला आणखीनच राजेशाही बनवते. दोन वर्षापूर्वी एका रेसिपी ग्रुपच्या अंगत-पंगत साठी माझ्या घरी आम्ही दहा जणी एकमेकांना आधी कधीही न बघितलेल्या यासाठी जमलो होतो. प्रत्येकीने चवदार चविष्ट पदार्थ करून आणले होते मी मसालेभात मठ्ठा व इतर पदार्थ केले होतेखूप मजा आली होती त्या दिवशी हसत-खेळत आमची अंगतपंगत पार पडली. पण हे तिथे थांबले नाही .आमच्या दहा जणींची मैत्री मात्र मसालेभात सारखीच स्वादिष्ट व रुचकर झाली .मसालेभातातील वेगवेगळ्या मसाल्यांचा प्रमाणेच आम्ही वेगवेगळ्या स्वभाव गुणधर्माचे आहोत. म्हणूनच आमचा "मैत्रीचा मसालेभात" दिवसेंदिवस खमंग होतोय.चला तर . Bhagyashree Lele -
तोंडले मसाले भात (Tondale masala bhat recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजलग्नाच्या पंगतीत आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात. Sumedha Joshi -
-
नारळीभात (narali bhat recipe in marathi)
#rbr #आज रक्षाबंधन... नारळी पौर्णिमा... त्यामुळे अर्थातच ओल्या नारळाचा वापर करून पदार्थ बनविणे आले. त्यातही हेमा ताईंनी सांगितल्याप्रमाणे बनवायचा होता. म्हणून आज त्यांच्या रेसिपी प्रमाणे केलाय भात... अप्रतिम चवीचा झालाय नारळी भात... खूप खूप धन्यवाद... Varsha Ingole Bele -
-
बीसी बेले भात (bisi bele bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझंआवडते पर्यटन शहर रेसिपी 2बीसी बेले भात ही मूळचा कर्नाटकचा प्रसिद्ध पदार्थ.बीसी म्हणजे गरम,बेले म्हणजे डाळ, भात म्हणजे राईस. तर हा पदार्थ मी तिरुपती दर्शनाला गेलो असताना तिथे ट्राय केला होता. आणि हा मला खूपच आवडला होता.अतिशय रुचकर असा हा पदार्थ आहे. Varsha Pandit -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#KS6जत्रा फूड... इंद्रायणी थडी जत्रा भोसरी-पुणे इथे भरते. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण इथल्या पदार्थांची रेलचेल असते. मावळातील इंद्रायणी तांदळाचा 'मसाले भात'ह्या जत्रेत पहायला मिळतो. म्हणून जत्रेत बनवला जाणारा मसालेभात केला आहे. Manisha Shete - Vispute -
तुरीच्या दाण्यांची आमटी (toorichya danaynchi amti recipe in marathi)
#आमटी# हिवाळ्यात विदर्भातील आवडीचा पदार्थ.. Varsha Ingole Bele -
पुदिना ग्रीन पुलाव (pudina green pulav recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड pulao , अनायासे घरी पुदिना असल्यामुळे, लगेचच हा पुलाव केला . छान चवदार, सुगंधी आणि मोकळा झाला आहे...आपल्या आवडीप्रमाणे त्यात काही वेगळे पदार्थ टाकू शकतो... Varsha Ingole Bele -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुकWeek 4महाराष्ट्रीयन मसाले भात हा एक प्रकारचा पुलाव असून याचे महाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान आहे. याच्याइतका रंगीबेरंगी पुलाव क्वचितच पाहण्यात येतो. आमच्या कोकणात आंबेमोहोर तांदूळ हा मानाचा, विविध भाज्या ज्या शिजल्यानंतरही आपला रंग आणि आकार शाबूत ठेवू शकतात अशा भाज्या जशा कि तोंडली, फरसबी, फ्लॉवर , मटार ,गाजर ,बटाटे आणि याउप्पर मसालेभाताचा खरा नायक असतो तो यात पडणारा मसाला. लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा मसाले भात मला खूप आवडतो. तसाच मसाले भात बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी. ज्यांना कांदा लसूण वर्ज्य आहे त्यांनी हा भात जरुर खावा. एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. स्मिता जाधव -
महाराष्ट्रीयन मसालेभात (masale bhat recipe in marathi)
#श्रावणस्पेशल#कुकस्नॅपचॅलेंज#shrमहाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान असणारा, रंगीबेरंगी मसाले भात ...😋😋गोडा मसाला,साजूक तूप ,ओले खोबरे यांचे चमचमीत काॅम्बीनेशन असलेला हा चमचमीत मसाले भात आणिआज मी @cook_20602564 preeti Salvi यांची मसालेभात कुकस्नॅप केला खूप छान झाला आहे मसाले भात..👌👌😋😋माझ्या मुलीने तर गरमागरम फस्त केला..😊सोबतीला जिलबी आणि मठ्ठा तर हवाच!! 😊 Deepti Padiyar -
सोलेभात अर्थात तुरीचे दाणे घालून केलेला भात..(Toori Danyacha Bhat Recipe In Marathi)
#DR2 हिवाळ्याच्या दिवसात रात्रीच्या जेवणाच्या वेळेस काय करावे हा प्रश्न पडल्यास वन पॉट मील, असा दाणे भात उत्तम पर्याय आहे. यासाठी ओले तुरीचे दाणे टाकून भात केला आहे. चविष्ट असा दाणेदार कढी, ताक किंवा दह्याच्या कोशिंबीर सोबत छान लागतो. Varsha Ingole Bele -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी लंच मध्ये मसाले भात बनवला आहे. पूर्वी लग्नात मसाले भात, मठ्ठा आणि जिलेबी हा बेत असायचाच.. आता लग्न समारंभात वेगळे पदार्थ तयार करतात.. Shama Mangale -
मसाले भात (masala bhaat recipe in marathi)
#लंच #शुक्रवार #महाराष्ट्रातील पारंपरिक मसाले भात पुर्वी नेहमी लग्नसमारंभात केला जायचा हल्ली विसरलेत सर्व. Hema Wane -
चवळी मसालेभात (chavli masale bhaat recipe in marathi)
ओल्या चवळीचा सिझन सुरू झाला आहे आणि मग चवळी भात तर झालाच पाहिजे. आपण वाटाणे भात,पावटा भात,वांगे भात करतो मग चला तर मग बनवूयात चवळी भात Supriya Devkar -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंच-मसाले भात-मटारचा सिझन आहे, बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणून मी आज हा भात केला आहे. Shital Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14315654
टिप्पण्या