मैत्रीचा मसालेभात (masale bhaat recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#cooksnap # Shital Siddhesh Raut # धन्यवाद शितल, तुझ्या या चवदार रेसिपी बद्दल ....खरच या पद्धतीने मी पहिल्यांदाच मसालेभात केलेला आहे, आणि तयार झालेला मसालेभात, घरच्या सर्वांना खूपच आवडला..😋 पुन्हा एकदा धन्यवाद.

मैत्रीचा मसालेभात (masale bhaat recipe in marathi)

#cooksnap # Shital Siddhesh Raut # धन्यवाद शितल, तुझ्या या चवदार रेसिपी बद्दल ....खरच या पद्धतीने मी पहिल्यांदाच मसालेभात केलेला आहे, आणि तयार झालेला मसालेभात, घरच्या सर्वांना खूपच आवडला..😋 पुन्हा एकदा धन्यवाद.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-45 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. 2-1/2 कपतांदूळ
  2. 1/2 कपफ्लॉवर चे तुरे
  3. 1 कपगाजर, सिमला मिरची, तोंडली, घेवडा चे तुकडे
  4. 2 टेबलस्पूनशहजिरे, जीरे ,5-6 लवंग, धने, मिरे, 1 इंच दालचिनी पूड
  5. 3 टेबलस्पूनओले खोबरे, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर याची पेस्ट
  6. 1 टीस्पूनगोडा मसाला
  7. 1/2 टीस्पूनसाखर
  8. 1/2 कपसाजूक तूप
  9. 3 टेबलस्पूनदही
  10. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  11. 1-1/2 टीस्पूनहळद
  12. चवीनुसारमीठ
  13. 1 टेबलस्पूनसाखर
  14. 10-12काजू
  15. फोडणी साठी, 2 मिरच्या, 5*6 कढीपत्ता पाने,

कुकिंग सूचना

40-45 मिनिट
  1. 1

    तांदूळ निवडून, धुवून 15-20 मिनिट अगदी कमी पाण्यात भिजत ठेवावे. सर्व भाज्या, चिरून घ्याव्यात.

  2. 2

    कोरडा खडा मसाला भाजून त्याची जाडसर भरड करावी.

  3. 3

    हिरवे वाटण बारीक करून घ्यावे.

  4. 4

    गॅस सुरू करून त्यावर एका मोठ्या भांड्यात तूप टाकावे. जीरे मोहरी टाकून ते तडतडल्यावर त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता टाकावा. हळद टाकून त्यात सर्व चिरलेल्या भाज्या टाकाव्यात.

  5. 5

    काजू टाकावे आणि चांगले परतून घ्यावे. झाकण ठेवून वाफ काढून घ्यावी. त्यानंतर त्यात हिरवे वाटण घालून पुन्हा चांगले मिक्स करावे. त्यानंतर त्यात वाटलेली मसाल्याची भरड टाकून पुन्हा चांगले मिक्स करून त्यावर झाकण ठेवावे., गोडा मसाला आणि तिखट टाकावे.

  6. 6

    2 मिनिटांनी त्यात दही आणि तांदूळ टाकावे आणि चांगले परतून घ्यावे. पुन्हा एकदा झाकण ठेवून,4-5 मिनिट वाफ आणावी. 2 टीस्पून तूप टाकून घ्यावे.

  7. 7

    आता तांदुळाच्या दुप्पट, म्हणजेच 5 कप गरम पाणी टाकून, त्यात चवीनुसार मीठ आणि साखर टाकावी. एक उकळी आल्यावर, मिक्स करून झाकण ठेवावे. 8*10 मिनिट कमी आचेवर शिजवावे. मसालेभात तयार झाल्यावर, वरून कोथिंबीर आणि खोबरं किस टाकावा.

  8. 8

    आपल्या इच्छेनुसार garnish करुन सर्व्ह करावा. सोबत ताक किंवा कढी, आणि वरून तूप, अत्यंत गरजेचे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes