दही वडा (dahi vada recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#GA4
#Week25
#Dahi wada
थंडी मावळू लागली आणि हळूहळू सूर्य आग ओकू लागेल. उन्हाळ्याला सुरूवात होताच जिवाची लाही लाही होवू लागते. पाणी पिऊनच पोट भरते. भूक कमी आणि तहान जास्त ,असेच काहीसे होते.
ताटभर जेवणही नको वाटते, अशावेळी चटपटीत, तिखट, आंबटगोड असे पदार्थ खावेसे वाटतात. आणि उन्हानं तप्त झालेल्या जिवाला थंडावा देणारा आणि लहानां पासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच प्रथम पसंतीचा हा पदार्थ म्हणजे दहीवडा. एकाच पदार्थातून भरपूर पोषणमूल्ये मिळवून देणाराही.....

दही वडा (dahi vada recipe in marathi)

#GA4
#Week25
#Dahi wada
थंडी मावळू लागली आणि हळूहळू सूर्य आग ओकू लागेल. उन्हाळ्याला सुरूवात होताच जिवाची लाही लाही होवू लागते. पाणी पिऊनच पोट भरते. भूक कमी आणि तहान जास्त ,असेच काहीसे होते.
ताटभर जेवणही नको वाटते, अशावेळी चटपटीत, तिखट, आंबटगोड असे पदार्थ खावेसे वाटतात. आणि उन्हानं तप्त झालेल्या जिवाला थंडावा देणारा आणि लहानां पासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच प्रथम पसंतीचा हा पदार्थ म्हणजे दहीवडा. एकाच पदार्थातून भरपूर पोषणमूल्ये मिळवून देणाराही.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-४० मि.
४-५ लोकांसाठी
  1. 1 वाटीउडीद डाळ
  2. 3/4 लिटरदही
  3. 1 वाटीसाखर
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. हिंग, जीरे , मोहरी, कडीपत्ता फोडणीसाठी
  6. तळण्यासाठी तेल
  7. मीठ चवीपुरते
  8. लाल तिखट व मिरपूड वरून टाकण्यासाठी
  9. हिरवी चटणीसाठी
  10. 1 वाटीकोथिंबीर
  11. 1/2 वाटीपुदिना
  12. 4हिरव्या मिरच्या
  13. 4लसूण पाकळ्या
  14. आल्याचा लहान तुकडा
  15. मीठ व साखर चवीपुरते, पाव चमचा लिंबू रस
  16. गोड चटणीसाठी
  17. 1 वाटीचिंच
  18. 1/2 वाटीखजूर
  19. 1-1/2 वाटी गूळ
  20. 1 चमचालाल तिखट
  21. 1/2 चमचाप्रत्येकी धणे, जिरेपूड
  22. मीठ चवी प्रमाणे

कुकिंग सूचना

३०-४० मि.
  1. 1

    डाळ पाच ते सहा तास भिजत घालावी. वडे करायला घेतानाच डाळ कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घ्यावी. त्यामध्ये मीठ घालावे. १० मि. एकाच दिशेने सतत फेटून घ्यावे. मिश्रण फूगलेले व एकदम हलके दिसेल. त्यामध्ये हिंग, आवडत असल्यास ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे घालावेत. तेल तापवून मध्यम आचेवर वडे तळावेत. एका पातेल्यात हिंग घालून कोमट पाणी घ्यावे. तळलेले वडे त्यामध्ये टाकावेत. दुसरा घाणा तळून होईपर्यंत पहिला पाण्यातच ठेवावा. नंतर ते वडे हलक्या हाताने दाबून बाजूला ठेवावेत.असे सर्व वडे तयार करून घ्यावेत.

  2. 2

    आता दही, साखर व मीठ मिक्सरवर एकत्र करून एका मोठ्या पसरट भांड्यात काढावे. त्यावर हिंग, जीरे, मोहरी, हिरवी मिरची, कडीपत्त्याची फोडणी थंड करून घालावी व हलवावे. आता एक एक वडा अलगद त्यामध्ये ठेवावा.

  3. 3

    हिरवी चटणीसाठी कोथिंबीर, पुदिना,हिरवी मिरची, लसूण,आले, मीठ, साखर, लिंबूरस हे सर्व थोडे पाणी घालून मिक्सरवर बारीक करून घ्यावे.

  4. 4

    गोड चटणीसाठी ३-४ तास चिंच आणि खजूर साफ करून भिजवून त्यामध्ये गूळ,मीठ,लाल तिखट,धणे, जिरेपूड थोडे पाणी घालून घट्टसर वाटून घेणे व गाळून घेणे.

  5. 5

    डिश तयार करताना वडे त्यावर दही घालावे. मिरपूड, लाल तिखट घालावे. हिरवी व गोड चटणी घालावी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. अशी सुंदर सजवलेली डिश पाहून तोंडाला पाणी न सुटणारा माणूसच विरळा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Namita Patil
Namita Patil @namitapatil
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes