दही वडा (dahi wada recipe in marathi)

Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046

दही वडा (dahi wada recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपउडीद डाळ
  2. 2 कपदही / दही
  3. १ टेबल स्पुनगोड चिंचेची चटणी
  4. १ टेबल स्पुनहिरवी चटणी
  5. 1 टिस्पुनलाल तिखट
  6. १ टि स्पुनगरम मसाला
  7. १ टीस्पूनजिरे पूड
  8. चवीनुसारमीठ
  9. 1 टिस्पूनसाखर
  10. 2 कपपातळ ताक
  11. तळण्यासाठी तेल
  12. ३,४ टेबलस्पूनशेव / भुजिया
  13. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  14. वरून भुरभूरवण्यासाठी
  15. 1/2 टिस्पूनमिरपूड, लाल तिखट, चाट मसाला

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    १/२ कप = १०० ग्रॅम्स उडीद डाळ, स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजवून किंवा कमीत कमी ४ तासांसाठी भिजत घालावी. पाणी काढून टाकावे.अगदी थोडेसेच पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. वाटलेले मिश्रण आपल्याला दाटसरच हवे आहे. इडलीच्या पिठापेक्षाही घट्ट असावे. वाटलेले मिश्रण हाताने किंवा हॅंड मिक्सरने फेटावे ज्यामुळे मिश्रणात हवेचे लहान बुडबुडे तयार होतात आणि वडे हलके व्हायला मदत होते.नंतर त्यात मिठ घालावे.

  2. 2

    वडे मध्यम आचेवर गोल आकारात किंवा मेदूवड्याच्या आकारात तळून घ्यावे. वड्यांचा आकार खुप मोठा ठेवू नये. काहीवेळेस वडे आतून कच्चे राहू शकतात.वडे तळण्यासाठी वडे बुडतील इतके तेल कढईत घालून मध्यम आचेवर गरम होऊ द्यावे.. तेल गरम झाले की आच मंद करून हाताला पाणी लावून गोल गोल छोटे वडे तेलात अलगद सोडावेत. मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस सोनेरी रंगावर वडे तळावेत. मंद आचेवर तळल्यामुळे वडे बाहेरून छान खरपूस भाजले जाऊन कुरकुरीत होतात!

  3. 3

    मला वड्यांची एक बॅच तळायला ७-८ मिनिटे लागली. एका भांड्यात हलके गरम पाणी घेऊन त्यात हे तळलेले वडे ३-४ मिनिटांसाठी बुडवून ठेवावेत जेणेकरून ते पाणी शोषून आतपर्यंत मऊ होतील!३-४ मिनिटांनंतर वडे दोन्ही हातांच्या तळव्यांत अलगद दाबून त्यातले पाणी काढून टाकावे. वडे तुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

  4. 4

    मग हे वडे वाढेपर्यंत ताकात भिजवून ठेवावेत. अशा प्रकारे सारे वडे तळून क्रमाने पाण्यात आणि नंतर ताकात भिजवून ठेवावेत

  5. 5

    दही वडे सर्व करताना, प्रथम टाकत बुडवलेला वडा सर्विंग डिश मध्ये घेऊन त्यावर थंड दही घालावे मग आवडीप्रमाणे लालमिर्ची पूड, जिरे पावडर आणि चाट मसाला भुरभुरावा. आवडीप्रमाणे हिरवी तिखट चटणी आणि चिंचेची गोड चटणी घालून थंड खावयास द्यावे!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes