चटपटीत काळा चना सॅलड (chatpatit kala chana salad recipe in marathi)

Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232

#SP
#शनिवार
#चटपटीत काळा चना सॅलड

चटपटीत काळा चना सॅलड (chatpatit kala chana salad recipe in marathi)

#SP
#शनिवार
#चटपटीत काळा चना सॅलड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
पाच ते सहा
  1. 1 कपभिजवलेला काळा चना
  2. 1मोठा उकडलेला बटाटा
  3. 1कांदा
  4. टोमॅटो
  5. 1/2 टीस्पूनधने पूड
  6. 1/2 टीस्पूनजीरे पूड
  7. 1 टीस्पूनचाट मसाला
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/2 टीस्पूनकाळे मीठ
  10. चवीनुसारमीठ
  11. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 टेबलस्पूनतेल
  13. 1/2 टीस्पूनजीरे
  14. चिमुटभरहिंग
  15. 1/2 टीस्पूनआल्याची पेस्ट
  16. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  17. गरजेनुसार पाणी
  18. 1 टीस्पूनलिंबाचा रस

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम भिजवलेले काळे चणे कुकरला शिजवून घ्यावे, बटाटा उकडून घ्यावा
    कांदा बारीक चिरून घ्यावा, टोमॅटो बारीक चिरून घ्या, उकडलेला बटाटा बारीक चिरून घ्यावा.

  2. 2

    एका वाटीत धने पूड, जीरे पूड
    चाट मसाला, लाल तिखट, गरम मसाला, काळे मीठ घालू सर्व एकत्र करून घ्यावे व त्यात थोडे पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जीरे घालून तडतडू द्यावे. त्यानंतर त्यामध्ये हिंग घालावा. आल्याची पेस्ट घालून परतून घ्यावे. बनवलेले मसाल्याची पेस्ट घालून, चांगले परतून घ्यावे. मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.

  3. 3

    नंतर त्यात शिजवलेले काळे चणे घालावे. चांगले परतून घेऊन त्यामध्ये उकडलेला बटाटा घालावा, चवीनुसार मीठ घालावे परत एकदा चांगले परतून घ्या. ते आता ते थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यामध्ये कांदा- टोमॅटो घालावा. कोथिंबीर घालावे. लिंबाचा रस घालावा. चांगले एकजीव करून घ्यावे. सर करावे. चटपटीत चना सॅलड.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes