चटपटीत चना मसाला (chana masala recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

"चटपटीत चना मसाला"

चटपटीत चना मसाला (chana masala recipe in marathi)

"चटपटीत चना मसाला"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
दोन
  1. 1 कपउकडलेले गावठी चने
  2. 1मोठा कांदा बारीक चिरून
  3. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  4. 4-5कडिपत्ता पाने
  5. मुठभर कोथिंबीर
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. 1 टीस्पूनघरचा मसाला
  8. 1 टीस्पूनधने पावडर
  9. 1 टीस्पूनकिचन किंग मसाला
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1/2 -1/4 टीस्पूनहिंग
  12. 1/4 टीस्पूनआमचूर पावडर, किंवा एक टीस्पून लिंबाचा रस
  13. चवीनुसारमीठ
  14. 2 टेबलस्पूनतेल
  15. 1/4 टीस्पूनजीरे
  16. 1/4 टीस्पूनमोहरी

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    चने सात आठ तास भिजत ठेवा आणि कुकरला लावुन पाच सहा शिट्या काढुन घ्या.. कांदा कोथिंबीर कापून घ्या..टाॅमेटो पण घालू शकता..

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे घालून फुलले की कडिपत्ता, कोथिंबीर, आले लसूण पेस्ट घालून परतून घ्या.कांदा घालून दोन मिनिटे परतून घ्या.आता वरील सर्व सुके मसाले घालून चांगले मिक्स करा.

  3. 3

    मसाले परतून झाल्यावर उकडलेले चणे घालून (चने उकडताना घातलेले पाणी थोडे शिल्लक रहाते त्याच्यासकट चने घालावे) चांगले मिक्स करा.मीठ घाला व मिडीयम गॅसवर पाच मिनिटे शिजू द्या. कोथिंबीर घालून परतून घ्या..

  4. 4

    तयार आहे चटपटीत चना मसाला.चपाती, भाकरी, वरणभाता सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

Similar Recipes