पुरणाचे दिंडे (puranache dinde recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#shravanqueen

# रेसिपी नं२ नाग पंचमीला केला जाणारा पारंपारीक पदार्थ म्हणजे पुरणाचे दिंडे तेच आज मि बनवले आहेत कसे विचारता चला तर पाहुया

पुरणाचे दिंडे (puranache dinde recipe in marathi)

#shravanqueen

# रेसिपी नं२ नाग पंचमीला केला जाणारा पारंपारीक पदार्थ म्हणजे पुरणाचे दिंडे तेच आज मि बनवले आहेत कसे विचारता चला तर पाहुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
२-३
  1. १०० ग्राम चनाडाळ
  2. १०० ग्रामकिसलेला गुळ
  3. १०० ग्राम गव्हाचे पिठ
  4. 1/4 टिस्पुनहळद
  5. 2 टेबलस्पुनकडकडीत तेल
  6. 1 टिस्पुनवेलची जायफळ सुंठ पावडर
  7. 2-3 थेंबकेसर इसेन्स
  8. चविनुसारमिठ
  9. २- ४ टेबलस्पुन साजुक तुप

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    चनाडाळ स्वच्छ करून ३-४ तास भिजवुन ठेवा नंतर त्यात थोड़ी हळद टाकुन चांगली शिजवुन घ्या व डाळीतील सर्व पाणी गाळुन डाळ निथळायला ठेवा

  2. 2

    नंतर कढईत डाळ व गुळ मिक्स करून पुरण शिजवुन घ्या मधेमधे मॅश करा थोडीसाखर वेलची जायफळ सुंठ पावडर मिक्स करा व थंड करायला ठेवा नंतर त्यात केसर इसेन्स टाकुन मिक्स करा थोड मिठ टाकुन मिक्स करा

  3. 3

    बाऊलमध्ये गव्हाचे पिठ घेऊन त्यात मिठ व कडकडीत गरम केलेले तेल टाकुन नंतर पाण्याने पिठ मळुन ठेवा वरून थोड तेल लावा पिठाचे २ भाग करून १ भागात थोडी हळद मिक्स करून मळुन ठेवा दोन्ही गोळे २० मिनटे झाकुन ठेवा

  4. 4

    २० मिनटानंतर प्रत्येक गोळ्याचे लहान गोळे करून तेलावर पुरी ऐेवढ्या आकाराच्या पुर्‍या लाटुन त्यामध्ये पुरणाचा लहान गोळा ठेवुन त्यात थोडे तुप टाकुन समोरील बाजु एकमेकांवर ठेवा नंतर साईड च्या बाजु सुद्धा दुमडा

  5. 5

    पिवळ्या गोळ्याचेही पुरण भरून दिंडे करून घ्या |

  6. 6

    स्टिमरच्या भांड्यात पाणी उकळ्यावर तयार दिंडे प्लेटला तेल लावुन त्यावर रचुन वाफवायला ठेवा १५ मिनटे नंतर ५ मिनटानंतर झाकण काढा आपले दिंडे खाण्यासाठी रेडी

  7. 7

    गरम गरम तयार पुरणाचे दिंडे साजुक तुपा सोबत प्लेट मध्ये सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

Similar Recipes