छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#पंजाब # छोले भटुरे # आता छोले भटुरे हा पदार्थ काही फक्त पंजाबचा राहिला नाही... संपूर्ण भारतात, चमचमीत काही खायचे असले, तर छोले भटुरे आठवतात... तर असे हे मसालेदार, चमचमीत छोले भटुरे मी आज केले आहे. भटुरे मैद्याचे असतात, पण मी आज मैद्यासोबतच कणकेचे पण केलेत. आणि छान झालेत बरं कां... नक्की करून पहा..

छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)

#पंजाब # छोले भटुरे # आता छोले भटुरे हा पदार्थ काही फक्त पंजाबचा राहिला नाही... संपूर्ण भारतात, चमचमीत काही खायचे असले, तर छोले भटुरे आठवतात... तर असे हे मसालेदार, चमचमीत छोले भटुरे मी आज केले आहे. भटुरे मैद्याचे असतात, पण मी आज मैद्यासोबतच कणकेचे पण केलेत. आणि छान झालेत बरं कां... नक्की करून पहा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1-1-1/2 तास
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपमैदा/ कणीक भटुरे साठी
  2. 1/4 कपदही
  3. 2 टेबलस्पूनरवा
  4. 1 टीस्पूनसाखर
  5. चवीनुसारमीठ
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. गरजेनुसार पाणी
  8. तळण्यासाठी तेल
  9. मैदा आणि कणीक यासाठी सारखेच प्रमाण
  10. 1 कपबारीक पांढरे चणे
  11. 4 टेबलस्पूनतेल
  12. 2कांद्याची पेस्ट
  13. 3टोमॅटोची पेस्ट
  14. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  15. 1मोठी वेलची
  16. 1 इंचदालचिनीचा तुकडा
  17. 3लवंग
  18. 2 टेबलस्पूनछोले मसाला
  19. 1 टेबलस्पूनधणे जीरे
  20. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  21. 1 टीस्पूनहळद
  22. 1 टीस्पूनलाल तिखट
  23. चवीनुसारमीठ
  24. 1 टीस्पूनचहा पावडर
  25. गरजेनुसार पाणी
  26. 1 टेबलस्पूनकसुरी मेथी
  27. कोथिंबीर
  28. 1 टेबलस्पूनबटर तडका देण्यासाठी
  29. 3हिरव्या मिरच्या उभ्या कापून
  30. 1 इंचआले बारीक चिरून
  31. 1/2 टीस्पूनहिंग

कुकिंग सूचना

1-1-1/2 तास
  1. 1

    आधी भटुरे साठी पीठ भिजवून घ्यावे. त्यासाठी मैदा गाळून घ्यावा. नंतर त्यात रवा, साखर, मीठ टाकावे.

  2. 2

    त्यानंतर त्यात तेल आणि दही टाकून भिजवून घ्यावे. हा मैद्याचा गोळा केलेला आहे.

  3. 3

    मैद्याचे प्रमाण वापरून मी गव्हाच्या कणकेचे ही भटूरे बनवले आहेत. त्यासाठी त्याच प्रमाणात कणकेचा गोळा ही भिजवून घ्यावा. आणि दोन तास झाकून ठेवावे.

  4. 4

    आता छोले बनवण्याची तयारी बघूया. त्यासाठी रात्रभर बारीक पांढरे चणे भिजवून ठेवावे व सकाळी ते उपसून घ्यावे. आता मसाला तयार करण्यासाठी कांदा, टोमॅटोची वेगवेगळे पेस्ट करून घ्यावी.

  5. 5

    छोले यांमध्ये मसाला टाकण्यासाठी एका वाटीत मसाला तयार करून घ्यावा. त्यासाठी दोन टेबलस्पून छोले मसाला, एक टेबलस्पून धने पूड, एक टी स्पून आमचूर पावडर, एक टी स्पून हळद आणि एक टीस्पून लाल तिखट एका वाटीत घ्यावे. त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून त्याची पेस्ट करून घ्यावी. हीच पेस्ट आपल्याला फोडणीत टाकायची आहे.

  6. 6

    आता गॅसवर एक कुकर ठेवून त्यामध्ये तेल टाकावे. कांद्याची पेस्ट टाकावी.किंचीत परतून घेतल्यावर, मोठी विलायची, लवंग आणि दालचिनी टाकावी. थोडे परतून घ्यावे. त्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट टाकावी. कांदा सोनेरी झाल्यावर त्यात टोमॅटोची पेस्ट टाकावी. लगेच पूर्ण भाजीला लागेल तेवढे मीठ टाकून घ्यावे.

  7. 7

    आता सर्व मिश्रण सतत हलवत राहावे. जोपर्यंत मिश्रण तेल सोडत नाही. मिश्रण तेल सोडायला लागल्यावर,आपण तयार केलेला तिखट हळदीचा मसाला त्यात टाकावा. चांगले मिक्स करून घेऊन, त्यात आता भिजत घातले होते ते चणे टाकावे. अंदाजे पाणी टाकावे. जेणेकरून छोले बुडतील इतपत.

  8. 8

    छोले यांना रंग येण्यासाठी बाजुला एका भांड्यात अर्धा कप पाणी ठेवून त्यात एक टीस्पून चहा टाकावा. चांगले उकळल्यावर हे चहाचे पाणी गाळणीने छोल्यांमध्ये टाकावे.

  9. 9

    आता ते मिक्स करून झाल्यावर त्यात खाण्याचा सोडा टाकावा. व मिक्स करून घ्यावे. आता कुकरला झाकण लावून सात ते आठ शिट्ट्या काढून घ्याव्या.

  10. 10

    कुकर थंड झाल्यावर झाकण काढून घ्यावे. त्यात आपल्याला थोडेसे भाजलेली कसुरी मेथी टाकायची आहे. कसुरी मेथी टाकल्यावर एक उकळी काढून घ्यावी.

  11. 11

    आता त्यात कोथिंबीर टाकावी. आणि या छोल्यांना तडका देण्यासाठी, एका पॅनमध्ये बटर घ्यावे. बटर वितळल्यावर त्यात हिंग टाकावे.

  12. 12

    हिरवी मिरची उभी कापून घ्यावी आणि आल्याचे बारीक तुकडे करून घ्यावे आणि ते त्या पॅनमध्ये टाकावे. ती चांगली झाल्यावर हा तडका छोल्यांमध्ये ओतावा. अशाप्रकारे छोले तयार आहे.

  13. 13

    दोन तासाने मैदा आणि कणकेचा गोळा छान फुललेला दिसेल. आता त्याला थोडेसे हलक्या हाताने मळून घ्यावे आणि त्याचे गोळे तयार करून घ्यावे.

  14. 14

    पोळपाटावर थोडेसे जाडसर पुर्‍या लाटून म्हणजेच भटूरे लाटून गरम तेलात तळून घ्यावेत.

  15. 15

    दोनही बाजू सोनेरी होईपर्यंत तळावे. छान फुगतात. अशाप्रकारे सर्व भटुरे तळून घ्यावे. हे झाले मैद्याचे भटूरे.

  16. 16

    ज्याप्रमाणे मैद्याचे भटूरे तळून घेतले, त्याच प्रमाणे कणके चे भटूरे ही तळून घ्यावीत. हे भटूरे सुद्धा खूप छान फुगतात.

  17. 17

    आता आपले छोले आणि भटुरे दोन्ही तयार आहेत. मस्त गरमागरम छोले-भटूरे, सोबत सलाद सर्व्ह करण्यास तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या (2)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
Thank you Madam.. खूप छान झाली आहे रेसिपी

Similar Recipes