छोले-भटुरे (Chole bhature recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#EB16#W16
विभिन्न प्रांतीय पदार्थ सगळ्यांनाच आवडतात.छोले-भटुरे त्यापैकीच एक.हल्ली स्पाईसी फूडही तरुणाईला जामच आवडते,त्यामुळे एकदम पसंदीदा रेसिपी म्हणजे छोले भटुरे!भरपूर मसाल्यांची रेलचेल असल्याने हे खवैय्ये खूश असतात.उत्तर भारतात छोले भटुरे अतिशय लोकप्रिय...एकतर तिकडे भरपूर थंडी,त्यात छोले प्रोटीन्सनी भरलेले त्यामुळे कधी चनामसाला तर कधी ग्रेव्हीवाले काबुलीछोले!यातही खूप प्रकारे हे छोले बनतात.पिंडी छोले,अम्रितसरी छोले,पंजाबी छोले,अम्रितसरी(अमृतसरी नाही म्हणायचं हं....!)पिंडी छोले अशी विविधता.पिंडी छोले बनवताना कांदा,टोमॅटोची ग्रेव्ही घालत नाहीत,तर अम्रितसरीमध्ये ही ग्रेव्ही पाहिजेच.शिवाय अनारदाना,आमचूर हे खट्टास्वाद के लिए जरुरी।तसंच शिजवताना चायके पत्तीकेसाथ उबालना जरुरी😋.....तरच मस्त लज़िज होणार हे छोले.
कुकपँडचे हे विंटर स्पेशल चँलेंजचे सोळा आठवडे अशा छानछान रेसिपी करण्यात कसे गेले....थंडीला उबदार करत,गरमागरम पदार्थ खाण्याचा आनंद देत गेले आणि आता हळूहळू थंडीची रेशमी दुलई बाजूला करत उन्हाळा कधी आला तेही कळलंच नाही....नाही का?...तेव्हा ही शेवटच्या आठवड्याची मस्त,स्पाईसी छोले-भटुरे रेसिपी माझ्या कुकपँडच्या सर्व मैत्रिणींना समर्पित...🤗😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
2-3व्यक्ती
  1. भटुरे
  2. 2 कपमैदा
  3. 1/4 कपबारीक रवा
  4. 1 टीस्पूनमीठ
  5. 3/4 टीस्पूनसाखर
  6. 2 चिमूटसोडा
  7. 1/2 कपआंबट दही
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. 1/2 कपकिंवा जरुरीनुसार पाणी
  10. छोले बनवण्यासाठी:-
  11. 2 कपछोले
  12. 4 ग्लासपाणी छोले भिजविण्यास
  13. 2तमालपत्रं
  14. 1/4 छोटा चमचाखाण्याचा सोडा
  15. 2 टीस्पूनचहा पावडर
  16. 1 टेबलस्पूनआवळा ज्युस/6-7आवळकाठी
  17. छोले बनवण्यासाठी मसाले:-
  18. 4-5 टेबलस्पूनतेल
  19. 3लवंगा
  20. 5-6मीरे
  21. 2-3दालचिनी काड्या
  22. 2मसाला वेलची
  23. 1/2 टीस्पूनहिंग
  24. 1/2 टीस्पूनहळद
  25. 1 टीस्पूनब्याडगी मिरची तिखट
  26. 2 टेबलस्पूनतयार छोले मसाला
  27. 1 टेबलस्पूनधणेजीरे पावडर
  28. 2 टीस्पूनमीठ
  29. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  30. ग्रेव्हीसाठी : 2 मध्यम कांदे
  31. 1मोठा टोमॅटो
  32. 6-7लसूणपाकळ्या
  33. 1/2 इंचआले
  34. 1मध्यम कांदा स्लाईस गार्निशींगसाठी
  35. 1/2लिंबू
  36. 1/2 कपचिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    भटुरे:-
    मैदा चाळून घ्यावा.बारीक रवा थोडा भिजेल एवढे पाणी घालून 7-8 मिनिटे भिजवावा.मैद्यामध्ये तेल,मीठ,खाण्याचा सोडा,दही,साखर आणि भिजलेला रवा घालून मिश्रण छान चोळून घ्यावे.व लागेल तसे पाणी घालून अगदी घट्ट भिजवावे.चांगले मळावे व ओल्या फडक्यात गोळा झाकून ठेवावा. भटुरे करण्यासाठी पीठ 1-2तास भिजायला पाहिजे,तरच भटुरे तळताना फुगतात आणि चवही येते.

  2. 2

    छोले शिजवणे : -
    छोले 7-8तास भिजवावेत.भिजवताना 2तमालपत्रं घालावीत.स्वाद छान येतो.छोले कुकरमध्ये शिजवण्यापूर्वी 3कप पाण्यात चहापावडर घालून उकळावी व ते पाणी गाळून छोले शिजताना घालावे,तसेच आवळ्याचा ज्युस घातला आहे.याने काळपट रंग व स्वाद फारच सुंदर येतो.थोडासा सोडा घालावा व छोले शिजण्यासाठी 6-7शिट्ट्या कराव्यात. मस्त मऊसूत असे छोले शिजवून घ्यावेत.

  3. 3

    कांद्याचे व टोमॅटोचे उभे काप,आलं,लसूण यांची ग्रेव्हीसाठी प्युरी करुन घ्यावी.

  4. 4

    कुकरचे प्रेशर पडले की छोले शिजलेत हे पहावे.आता कढई गँसवर तापत ठेवून त्यात तेल घालावे.यात लवंग,मीरे,दालचिनी, मसाला वेलची,हिंग घालावे.यावर तयार प्युरी घालावी. तेल सुटेपर्यंत परतावे.यावर हळद,तिखट,छोले मसाला,धणेजीरे पावडर घालावे.परतावे.यावर कुकरमधील शिजलेले छोले यातील पाण्यासह घालावेत. उकळी आली की झाकण ठेवून 5-7मिनिटे गँसवरच ठेवावे.

  5. 5

    भटुऱ्यांची कणीक भिजली आहे.ती छान मळून घ्यावी.फुलक्यांसाठी घेतो एवढा गोळा घेऊन थोडे जाडसर असे भटुरे लाटावे.गँसवर कढईत तेल कडकडीत तापवून घ्यावे.व एकेक भटुरे तळून घ्यावेत.पीठ मुरलेले असल्याने भटुरे छान टम्म फुगतात.

  6. 6

    गरमागरम छोल्यांवर कांद्याच्या स्लाईस, कोथिंबीर, लिंबाची फोड याचे गार्निशींग करुन गरम भटुऱ्यांबरोबर सर्व्ह करावेत.... छोले आणि भटुरे😋😋👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes