झणझणीत हिरव्या वाटणाची साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

#kr खिचडी खूप प्रकारे केली जाते. हा असा प्रकार आहे की आजारपणात, लहान मुलांना पौष्टिकता मिळावी म्हणून त्याला खूप प्राधान्य आहे . डाळींची, तांदळाची, दलियाची खिचडी बनवली जाते. आपण नेहमीच उपवास करतो. उपवास म्हटला की हमखास साबुदाणा खिचडी बनवली जाते . ती नेहमीच्या स्टाईलने करतो. मी येथे,नाविन्यपूर्ण ,झणझणीत, हिरव्या वाटणाची साबुदाणा खिचडी बनवली आहे . अतिशय टेस्टी... पाहता क्षणी तो हिरवागार रंग पाहून मन मोहून जाते.व कधी एकदा टेस्ट करून पाहू असे वाटते. पाहूयात कशी बनवायची ते ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट्स
3 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रॅमसाबुदाणा
  2. 80 ग्रॅमशेंंगदाणे कूट
  3. 4हिरव्या मिरच्या
  4. 3-4 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  5. 7-8कढीपत्ता पाने
  6. 1/2 टीस्पूनलिंबू रस
  7. 1/4 टीस्पूनसाखर
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. 2-3 टेबलस्पूनसाजूक तूप

कुकिंग सूचना

30 मिनिट्स
  1. 1

    प्रथम साबुदाणा घेऊन त्यात भरपूर पाणी टाकून स्वच्छ धुऊन घ्या. साबुदाण्यात पुन्हा भरपूर पाणी टाकून अर्धा तास भिजत ठेवा. म्हणजे त्याचे स्टार्च निघून जाते व खिचडी चिकट होत नाही.नंतर सर्व पाणी काढून ते भिजेल इतपतच पाणी टाका. रात्री भिजवून सकाळपर्यंत साबुदाणे फुगून येतात मोत्या सारखे दिसतात.

  2. 2

    मिक्सर मध्ये मिरच्या, भरपुर कोथिंबीर, कढीपत्ता टाकून त्याचे वाटण तयार करा.

  3. 3

    एका कढईत साजूक तूप टाका ते गरम झाल्यावर जीरे टाका चांगले फुलल्यावर त्यात मिक्सर मधील वाटण टाका. दोन मिनिटे फक्त परतून घ्या.

  4. 4

    नंतर भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचे कूट,मीठ, लिंबू रस, साखर टाकून मिश्रण चांगले परतून घ्या. साधारणपणे पाच ते सात मिनिटे लागतात. अतिशय सुंदर निसर्गाचा हिरवा रंग येतो. (खिचडीवर झाकण कधीही ठेवू नका कारण झाकण ठेवल्यास त्यात स्टार्च तयार होतो व खिचडी चिकट होते.)

  5. 5

    अशा रीतीने हिरवीगार झणझणीत चटपटीत अशी साबुदाणा खिचडी तयार होते. हिरव्या गार रंगामुळे दिसते ही सुंदर व लागते ही टेस्टी... यात भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात. उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर फक्त मिरची टाकूनही केल्यास टेस्टी लागते. चला... टेस्ट करायला..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mangal Shah
Mangal Shah @mangal51
रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

Similar Recipes