इडली चटणी (idli chutney recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#cr
#combo recipe

इडली चटणी (idli chutney recipe in marathi)

#cr
#combo recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
5 सर्व्हिंग्ज
  1. इडली साठी
  2. 2 वाटीतांदूळ
  3. 2 वाटीइडली रवा
  4. 1 वाटीउडीद डाळ
  5. 1 टेबलस्पूनमेथीचे दाणे
  6. गरजेनुसार पाणी
  7. चवीनुसारमीठ
  8. चिमूटभरसोडा
  9. चटणीसाठी
  10. 1 वाटीओलं खोबरं
  11. 1/4 वाटीभाजकी डाळ /फुटाणा डाळ
  12. 1/4 वाटीभाजलेले शेंगदाणे
  13. 8-9लसून पाकळ्या
  14. 3हिरव्या मिरच्या
  15. 1 इंचआल्याचे तुकडे
  16. 7-8पुदिना पाने
  17. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  18. 1 टीस्पूनसाखर
  19. 1 टीस्पूनजीरे
  20. 2 टीस्पूनमोहरी
  21. 1 टीस्पूनहिंग
  22. 1 टीस्पूनहळद
  23. 7-8 कढीपत्त्याची पाने
  24. चवीनुसारमीठ
  25. गरजेनुसार पाणी
  26. स्टफ इडली रोल बनविण्यासाठी
  27. 2 वाटीतयार इडलीचे पीठ
  28. 1 वाटीबटाट्याची तयार पिवळी भाजी

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    प्रथम तांदूळ इडली,रवा,उडीद डाळ,मेथी चे दाणे, स्वच्छ धुऊन सात ते आठ तास भिजत घालने साधारण सकाळी भिजत घालने.

  2. 2

    आता 8-9 तासानंतर भिजवलेले तांदूळ, उडीद डाळ आणि रवा मिक्सरमध्ये वेगवेगळे बारीक वाटून घेणे.आणि छान पाच मिनिटे हे इडली बॅटर मिक्स करून घेणे.आणि झाकून नऊ तास फरमेंट होण्यासाठी ठेवणे. साधारण सकाळी जर भिजत घातलं असेल तर रात्री सर्व मिक्सरमधून बारीक वाटून रात्रभर झाकून फरमेंट होण्यासाठी बाजूला ठेवणे.

  3. 3

    साधारण नऊ तासानंतर पीठ छान फुगून वर आलेले असते मस्त फरमेंट होते आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिमूटभर सोडा ऍड करून छान मिक्स करून घ्या

  4. 4

    आता इडली पात्राला तेल लावून घेऊन तयार केलेले इडलीचे बॅटर पळीने इडली पात्रामध्ये ॲड करा आणि स्टीम करायलास स्टीमर मध्ये दहा मिनिटे ठेवा. दहा मिनिटानंतर गॅस बंद करून पाच मिनिटे थंड होऊ द्या त्यानंतर इडली काढून घ्या अशाप्रकारे सर्व इडल्या तयार करून घ्या.

  5. 5

    आता चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, आले,लसूण, पुदिना चणाडाळ,शेंगदाणे,कोथिंबीर, मिरची, साखर चवीनुसार मीठ ॲड करा मिक्सरमध्ये गरजेनुसार पाणी घालून बारीक चटणी वाटून घ्या.

  6. 6

    आता चटणी ला फोडणी देण्यासाठी एका पॅनमध्ये तेल ऍड करा जीरे,मोहरी,कढीपत्ता, हिंग गरज असल्यास हळद घालून खमंग फोडणी तयार करून घ्या हि फोडणी चटणी मध्ये ऍड करून चटणी छान मिक्स करून घ्या आवडत असल्यास दही ॲड करा मी दही घालत नाही.

  7. 7

    आता स्टफ इडली बनविण्यासाठी 2 ग्लास तेल लावून ग्रीस करून घ्या.आणि तयार बटाट्याच्या भाजीचे रोल तयार करून घ्या.

  8. 8

    आता ग्रीस केलेल्या ग्लासमध्ये थोडेसे इडली बॅटर ऍड करा त्यानंतर तयार केलेल्या बटाट्याचा रोल उभा ठेवा आणि पुन्हा त्यावर ते इडली बॅटर ऍड करा आता हे तयार केलेले ग्लास स्टीम करण्यासाठी स्टीमर मध्ये दहा मिनिटे ठेवा दहा मिनिटानंतर गॅस बंद करा.

  9. 9

    पाच मिनिट थंड होऊ द्या त्यानंतर सुरीच्या साह्याने ग्लास मधून स्टफ इडली काढून घ्या. आणि इडली रोल कट करून घ्या.

  10. 10

    आता या तयार इडल्या चटणी,सांबार बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes