इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१तास
५ जणांसाठी
  1. ४०० ग्रॅम उकडा तांदूळ
  2. १२५ ग्रॅम उडीद डाळ
  3. 1/4 टी स्पूनमेथी दाणे
  4. 2 टे. स्पून भाजकी डाळ
  5. 1 टे. स्पून उडीद डाळ
  6. 4सुक्या बेगडी मिरच्या
  7. 3 टे. स्पून शेंगदाण्याचे कूट
  8. 1 वाटीखवलेल खोबर
  9. 1 वाटीताज दही
  10. जरूरी नुसार पाणी
  11. चवीपुरते मीठ व साखर
  12. 2 टे. स्पून तेल
  13. 1 टीस्पूनजीरे
  14. 1 टीस्पूनउडीद डाळ
  15. 10-12कढीपत्त्याची पाने

कुकिंग सूचना

१तास
  1. 1

    तांदूळ व डाळ वेगवेगळी स्वच्छ धुवून पाणी घालून ६ तासासाठी भिजवून ठेवले. त्यांत मेथीदाणे घातले.

  2. 2

    नंतर मिक्सरवर वाटून ८ तासासाठी झाकून ठेवले. इडली चे पीठ फरमेंट झाल्यावर त्यांत चवीनुसार मीठ घालून छान घोटून घेतले.

  3. 3

    नंतर इटलीच्या कुकरमधे पाणी उकळले व ईडलीच्या साच्याला तेल लावून त्यात इडलीच मिश्रण घातले व इडलीच्या कुकरमधे तो साचा ठेऊन १० मिनीटे इडल्या वाफवून घेतल्या.

  4. 4

    चटणी साठी घेतलेली उडीद डाळ खमंग भाजून घेतली व मिक्सरमध्ये उडीद डाळ, भाजकी डाळ, मिरच्या, शेंगदाण्याचा कूट, खोबर चवीनुसार मीठ, साखर घालून छान चटणी वाटून घेतली व त्यांत दही घालून सर्व एकजीव करून घेतले

  5. 5

    नंतर एका फोडणीच्या भांड्यात तेल घालून ते तापल्यावर त्यांत उडदाची डाळ, जीरे, हींग व कढीपत्त्याची पाने घालून फोडणी तयार करून घेतली व चटणी वर घातली.

  6. 6

    नंतर गरमागरम इडली चटणी सर्व्ह केली.

  7. 7

    नं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes