आंबा चीक वडी (amba chiki vadi recipe in marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#Happycooking
#trendingrecipe
#100
आजची ही रेसिपी माझी खूप खास रेसिपी आहे आणि कूकपॅड वरील शंभरावी रेसिपी गोड पदार्थाने सेलिब्रेट करत आहे जी मी तुमच्याबरोबर शेअर करते. लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी मध्ये गव्हाच्या चिकाच्या वड्याही सामील आहे. दरवर्षी उन्हाळ्यात माझी आई गव्हाच्या चिकापासून कुरडई आणि ट्रुटी फ्रुटी घालून गव्हाच्या गोड चिकवड्या आमच्यासाठी खास बनवायची. लहानपणी मी आणि माझी लहान भावंडे ती खूपच आवडीने खायचो. त्याची टेस्ट अजून जिभेवर रेंगाळत आहे. मी ही आता दरवर्षी गव्हाच्या चिकापासून कुरडया नाही बनवल्या तरी चिकवड्या बनून माझ्या मुलांना खायला घालते त्यांनाही खूप आवडतात. गव्हाच्या गोड चिकवड्या खूपच healthy and nutritious आहेत. यावर्षी मी यामध्ये थोडेसे व्हेरिएशन करुन आंब्याच्या रसातील गव्हाच्या गोड चीक वड्या बनवल्या आहेत चला तर मग बघुया आंबा चीक वडी कशी बनवायची😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीगव्हाचा चीक
  2. 1 वाटीहापूस आंब्याचा रस
  3. 1 वाटीसाखर
  4. 1/2 वाटीदूध
  5. 1 टीस्पूनवेलची पावडर
  6. 6-7 टेबलस्पूनतूप
  7. तुकडेकाजू बदाम पिस्त्याचे बारीक
  8. ट्रुटी फ्रुटी

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करावे. एका पॅनमध्ये आंब्याचा रस आणि साखर घेऊन ते अर्धे होईपर्यंत आटवून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये दूध घालून गरम करून घ्यायचे

  2. 2

    दूध गरम झाले कि त्यामध्ये गव्हाचा चीक घालावा मिश्रण सतत ढवळून घ्यायचे नाहीतर त्याच्या गुठळ्या तयार होतात. गॅस मिडीयम हीटवर ठेवून हे सर्व मिश्रण सतत ढवळून घ्यायचे.

  3. 3

    गव्हाचे चीक घट्ट होत आला की त्यामध्ये सुकामेवा आणि ट्रुटी फ्रुटी घालून ते नीट मिक्स करून घ्यावे. त्यानंतर मिश्रण पॅनला आणि चमच्याला न चिकटता त्याचा गोळा होईपर्यंत त्यामध्ये सहा ते सात चमचे तूप थोड्या थोड्या वेळाने घालून मिश्रण नीट मिक्स करावे. त्याचा घट्ट गोळा तयार होईपर्यंत मिश्रण शिजवून घ्यायचे

  4. 4

    मिश्रणाचा घट्ट गोळा तयार होतो. तूप लावलेल्या ताटामध्ये मिश्रण थापून घ्यावे त्यावर वरून थोडासा सुकामेवा आणि ट्रुटी फ्रुटी लावून त्याच्या चौकोनी वड्या पाडून घ्याव्यात. खूपच सुंदर चवीच्या आणि दिसायलाही तेवढ्याच अप्रतिम अशा मऊसूत आंबा चीक वड्या तयार होतात त्या थंड झाल्या की खायला घ्याव्यात😋

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes