मोतीचुर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#cooksnap @Bhagyashree Lele@
मी भाग्यश्री ताईंची मोतीचुर लाडू रेसिपी करून पाहिली, इतकी छान झाली की कोणी हे बुंदी न पाडता केलेले मोतीचुर लाडू आहेत ते ओळखलेही नाही. धन्यवाद ताई!

मोतीचुर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)

#cooksnap @Bhagyashree Lele@
मी भाग्यश्री ताईंची मोतीचुर लाडू रेसिपी करून पाहिली, इतकी छान झाली की कोणी हे बुंदी न पाडता केलेले मोतीचुर लाडू आहेत ते ओळखलेही नाही. धन्यवाद ताई!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
५ जण
  1. 1 कपचणाडाळ
  2. 1 कपसाखर
  3. 1/2 कपपाणी
  4. 1 टीस्पूनवेलची पावडर
  5. 2चिमटी खाण्याचा रंग
  6. 3-4 टेबलस्पूनसाजूक तूप
  7. 2 टेबलस्पूनतळलेले काजू
  8. पिस्ते सजावटीसाठी
  9. तळण्यासाठी तेल/तूप

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम दोन ते तीन वेळा चणा डाळ स्वच्छ धुऊन घ्या नंतर त्यामध्ये पाणी घालून चणाडाळ २-3 तास भिजवून झाकून ठेवा. नंतर डाळीमधले पाणी चाळणीत घालून निथळत ठेवा. चणाडाळीमधले पाणी संपूर्णपणे निथळले की मिक्सरमध्ये ही चणा डाळ घालून पल्स मोड वर ठेवून ऑन ऑफ करा. असे एकूण फक्त चार वेळा करा म्हणजे चणाडाळ रवाळ दळली जाईल.

  2. 2

    आता एका पॅनवर थोडे साजूक तूप किंवा तेल घाला.. या रवाळ दळलेल्या चणाडाळीच्या पसरट पातळ टिक्या करा आणि त्या टिक्क्या मंद आचेवर ३ते ४ मिनिटे दोन्ही बाजूने फ्राय करून घ्या.आपल्याला हलकेच भाजायच्या आहेत..crispy, सोनेरी होईपर्यंत भाजायच्या नाहीत.. अशाप्रकारे सगळ्या टिक्क्या फ्राय करून टीशू पेपरवर काढा.

  3. 3

    आता या टिक्क्या थंड झाल्यावर तोडून घ्या आणि परत मिक्सरमध्ये घालून पल्स मोडवर फक्त चार वेळा फिरवा म्हणजे टिक्क्या रवाळ दळल्या जातील आणि मोतीचूर लाडवासारखी बारीक बुंदी तयार होईल..आता एका पसरट भांड्यात साखर व अर्धा कप पाणी घालून एकतारी पाक करून घ्या,त्यात वेलची पूड आणि खायचा रंग घाला आणि..गॅस बंद करा.

  4. 4

    आता चणा डाळीचे दळलेले मिश्रण हळूहळू या पाकात सोडा, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.आता परत गॅस सुरू करा आणि मंद आचेवर लाडवाचे मिश्रण थोडे कोरडे होईपर्यंत म्हणजेच चार ते पाच मिनिटे भाजून घ्या.. नंतर गॅस बंद करुन लाडवाचे मिश्रण झाकून ठेवा म्हणजे लाडवाच्या मिश्रणात पाक चांगला मुरेल.

  5. 5

    आता काजू थोडयाशा तुपात थोडे फ्राय करून काढा. आता पाक पूर्णपणे शोषून घेतला की लाडू वळायला घ्या (जर मिश्रण हाताला चिकटत असेल तर थोडे गरम तूप घालून मिक्स करा व लाडू वळा) लाडू वळताना एकेक काजू लावून लाडू वळा वरून पिस्त्याचे काप लावून सजावट करा.

  6. 6

    हे लाडू अगदी दिसायला बुंदी पाडून केलेल्या मोतीचुर लाडूसारखेच दिसतात व लागतातही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes