सुक्या मेव्याचे पौष्टिक लाडू (sukya mevyache ladoo recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

# लाडू रेसिपि
#Thanksgiving
#Cooksnap
#Varsha Ingole Bele
मस्त थंडी सुरु झाली आहे. आपल्या तब्बेतीची काळजीही घेतली पाहिजे. म्हणून काहीतरी पौष्टिक झाले पाहिजे. म्हणून मी वर्षा ताईंची पौष्टिक लाडू रेसिपि कूकस्नाप करत आहे. खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही ही पौष्टिक रेसिपी पोस्ट केली. खूपच मस्त झाले आहेत लाडू 😋

सुक्या मेव्याचे पौष्टिक लाडू (sukya mevyache ladoo recipe in marathi)

# लाडू रेसिपि
#Thanksgiving
#Cooksnap
#Varsha Ingole Bele
मस्त थंडी सुरु झाली आहे. आपल्या तब्बेतीची काळजीही घेतली पाहिजे. म्हणून काहीतरी पौष्टिक झाले पाहिजे. म्हणून मी वर्षा ताईंची पौष्टिक लाडू रेसिपि कूकस्नाप करत आहे. खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही ही पौष्टिक रेसिपी पोस्ट केली. खूपच मस्त झाले आहेत लाडू 😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60- 80 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रामबदाम
  2. 200 ग्रामकाजू
  3. 100 ग्रामपिस्ता
  4. 250 ग्रामखजूर
  5. 200 ग्रामसुके खोबरे
  6. 100 ग्रामसाजूक तूप
  7. 50 ग्रामकाळे मनुके
  8. 100 ग्रामअंजीर
  9. 1 टेबलस्पूनवेलदोडा पूड
  10. 1 टीस्पूनजायफळ पूड
  11. 100 ग्रामडिंक
  12. 50 ग्रामखसखस

कुकिंग सूचना

60- 80 मिनिटे
  1. 1

    प्रथम लाडूला लागणारे साहित्य जमा करून घेणे.

  2. 2

    नंतर घेतलेल्या तुपातील थोडे तूप बाजूला ठेवून थोडे तूप कढई मध्ये घालावे. व ती कढई गॅस वर गरम करण्यास ठेवणे. तूप गरम झाले कि त्यात थोडा थोडा डिंकघालून तो फुले पर्यंत त्या तुपामध्ये तळून घेणे.अशाप्रकारे सगळा डिंक तळून घेणे.

  3. 3

    नंतर त्याच कढई मध्ये थोडे तूप घालून काजू, बदाम, पिस्ते 2 - 3 मिनिटे तुपातून थोडे फ्राय करून घेणे.हे सगळे फ्राय झाले कि वेगवेगळे काढून घेणे.

  4. 4

    नंतर खजुराचे आतील बी काढून त्याचे तुकङे करून ते ही तुपा मध्ये थोडे परतून घेणे. किसलेले खोबरे ही सोनेरी रंगावर भाजून ते एका प्लेट मध्ये काढून घेणे.अशाप्रकारे सगळे घटक तुपामध्ये फ्राय करून घेणे

  5. 5

    नंतर फ्राय केलेले हे घटक एक एक करून मिक्सर मधून बारीक करून घेणे. बदाम, काजू, पिस्ते, अंजीर आणि खजूर, काळा मनुका सगळे बारीक करून घेणे. व ते सगळे एका खोलगट मोठया बाउल किंवा पातेले मध्ये काढून घेणे.

  6. 6

    नंतर तळून घेतलेला डिंक ही मिक्सर मधून बारीक करून घेणे. व तो ही त्या पातेले मध्ये घालावा. व भाजलेले खोबरे हाताने बारीक करून तो ही त्या पातेले मध्ये घालावा. वरून वेलदोडा पूड आणि जायफळ पूड, भाजलेली खसखस पूड घालून ते सर्व घटक हाताने एकत्र करून घेणे.

  7. 7

    नंतर हे मिक्स केलेले घटक पुन्हा एकदा थोडे थोडे करून मिक्सर मधून काढून घेणे.मनुके आणि खजूर या मुळे पुन्हा साखर घालायची गरज पडत नाही.जर मिश्रण कोरडे वाटत असेल किंवा त्याचे लाडू करता येत नसेल तर अंदाज घेऊन गरम तूप त्या मध्ये घालावे.नंतर थोडे थोडे मिश्रण हातात घेऊन आपल्या आवडीनुसार लाडू बनवून घेणे.व ते एका प्लेट मध्ये बनवून ठेवावेत.

  8. 8

    अशाप्रकारे मस्त पौष्टिक आणि शुगर फ्री लाडू तयार झाले.35 ते 40 मध्यम आकाराचे लाडू तयार होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes