कॉफी ओरिओ चॉकलेट आईस्क्रीम (Coffee Oreo Chocolate Icecream recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

Mangal Shah यांची "चोको ओरिओ कुल्फी" आणि Rajashri Deodhar यांची "काॅफी आईस्क्रीम" या २ रेसिपींचं fusion करत मी Coffee Oreo Chocolate Icecream बनवलंय :) यावेळी मी बाइंडिंग मटेरियल म्हणून कॉर्न फ्लोर / तांदळाचं पीठ / फ्रेश क्रीम यातील कशाचाच वापर केलेला नाहीये. तरीही मस्त real milk icecream तयार झालं :)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ दिवस (पूर्ण प्रोसेस साठी)
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 लिटरदूध
  2. 1 चमचासाखर (जास्त गॉड आवडत असल्यास प्रमाण वाढवावे)
  3. २-३ चमचेचॉकोलेट स्प्रेड
  4. 6ओरिओ बिस्किट्स
  5. चोकोलेट्स / जेम्स (सजावटीसाठी)
  6. 1/2 -1 चमचाकॉफी पावडर

कुकिंग सूचना

२ दिवस (पूर्ण प्रोसेस साठी)
  1. 1

    अर्धा लिटर दूध उकळवत ठेवलं. बऱ्यापैकी आटल्यावर एक चमचा साखर घातली, विरघळवू दिली.

  2. 2

    साखर विरघळल्यावर कॉफी पावडर ऍड केलं केली आणि थोडा वेळ दुःख उकळू दिलं. गॅस बंद करून दूध थंड होऊ दिलं.

  3. 3

    एक चमचा चॉकोलेट स्प्रेड किंचित दुधात वितळवून, २ ओरिओ बिस्कीट सोबत ऍड करून मिक्सर ला भरडसर पूड करून घेतली.

  4. 4

    थंड झालेलं दूध आणि ओरिओ बिस्कीट ची पूड एकदा मिक्सर ला फिरवून घेतली आणि एका डब्यात मिश्रण ओतून फ्रीझर ला ५-६ तासांसाठी ठेवून दिलं.

  5. 5

    चोकोलेट्स आणि ४ ओरिओ बिस्किटांचे तुकडे करून घेतले.

  6. 6

    ६ तासांनी फ्रीजर मधून मिश्रण काढून पुन्हा एकदा फ्रीजर ला फिरवून घ्यायचं. मिश्रणाला थोडं घट्ट होतं. आता यात ओरिओ बिस्कीट चे तुकडे तयाचे. वितळलेलं चॉकोलेट स्प्रेड वरून पसरायचं.

  7. 7

    ७-८ तास फ्रीजर मध्ये मॅक्स कूलिंग वर ठेवून द्यायचं. बाहेर काढलं कि चॉकोलेट च्या तुकड्यानी सजवून सर्व करायचं. :)
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

Similar Recipes