वर्षभराचे कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)

#lonche
#Kairilonche
#कैरीलोनचे
भारतात एकही घर असे मिळणार नाही ज्या घरात लोणचे तुम्हाला मिळणार नाही ते कोणत्याही प्रकारचे असो पण लोणचे घरात असतेच ही भारतीय होण्याची एक ओळखच आहे लोणचे आणि भारतीय होणे हे समीकरण जुळलेले आहे .
आता सीजन आला आहे लोणचे टाकण्याचा आता झटपट लोणचे तयार करून संपवतात बऱ्याचदा वर्षभर लोणचे टिकत नाहीत याची खूप बारीक अशी कारणे असतात हा सीजन कैरीचे वर्षभर लोणचे टाकण्याचा आहे लोणचे बनवण्याची कला मला माझ्या सासूबाईंनी कडून मिळालेली आईकडे लोणच्या चे लहने नाही आहे दुसऱ्याच्या हातून टाकून घ्यावे लागते पण लहानपणापासूनच लोणच्याची तयारी खूप पाहिली आहे दोन ते तीन दिवस तयारीत लागते पूर्ण घर सुगंधाने दरवळते लोणच्याच्या. आईला मदतही करण्यात आल्यामुळे लोणचे टाकण्याची आता सवय झाली आहे
मागच्या दोन-तीन वर्षापासून मी लोणचे तयार करत आहे अन ते व्यवस्थित रित्या होत आहे म्हणजे खराब होत नाही. दमट वातावरण असल्यामुळे बऱ्याचदा लोणचे खराब होन्याची भीती म्हणून फ्रीजमध्ये ठेवावा लागतो.लोणचे तयार करताना बऱ्याच गोष्टींचा बारीक-सारीक लक्ष दिले तर लोणचे खराब होणार नाही लोणचे तयार करण्यासाठी वापरात घेतलेले मसाले सर्व पॅक फुड असावे म्हणजे आपण ज्या दिवशी लोणचे मसाला तयार करू तेव्हा त्यांचे पॅकेट उघडावे म्हणजे फ्रेश मसाले ,मीठ वापरावे मीठही नवीन पाकीट वापरावे. लोणचे तयार करताना पाण्या पासून लांब रहावे लोणच्यात पाणी गेल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते ज्या ठिकाणी लोणच्याची बरणी ठेवायची, त्या ठिकाणी कधीही उन्हाची तिरीप येऊ देऊ नये.लोणचे घातल्यावर 2-3 दिवसांनी डावेने लोणचे वरखाली हलवावे. बऱ्याच काही बारीकसारीक गोष्टीत हे लक्ष देऊन केल्या तर लोणचे वर्षभर टिकते माझ्या रेसिपीत टिप्सही दिलेले आहे

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बाजारातून आणलेल्या कैर्या पाण्याने धुऊन स्वच्छ करून वाळून घेऊन मग त्यांना फोडून घेऊ
फोडल्यानंतर आपल्याला कळेल कैरी कशी आहे मग त्यातला काही पिवळ्या निघतात त्या वेगळ्या करायच्या - 2
आपल्याला लोणच्यासाठी वापरायच्या त्या फोडी वेगळ्या करायच्या
एकदम पांढरा गराच्या आणि आंबट कैर्या लोणच्यासाठी हव्या - 3
आता फोडलेल्या कैरयाना मीठ आणि हळद लावून ठेवून द्यायचे हळूहळू पाणी सुटत जाईल मग कडाई आडवी करून ठेवायची म्हणजे पाणी वेगळे होत राहील आपण
दोन-तीन तास मीठ हळदी लावून झाल्यावर कैऱ्या पंख्याखाली कापडावर सुकून घ्यायच्या - 4
कैऱ्या आता पंख्याखाली कापडावर सुकून घ्यायच्या
7/8 तास कैऱ्या सुकून घ्यायच्या
सुकल्यानंतर कापडाने पुसून घ्यायचं - 5
आता आपल्या कैऱ्या तयार आहे मग यावेळेस मसाला तयार करायला घ्यायचा
आता दिल्याप्रमाणे सगळे साहित्य मसाला तेल एकत्र एका ठिकाणावर आणून ठेवायचे
मी लवंग आणि काळी मिरी कुटून घेतली आहे
माझ्याकडे खड्याची हिंग होती त्याची ही पावडर करून घेतली - 6
ईथे मी शेंगदाण्याचे तेल वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल वापरू शकतात
एका मोठ्या पातेल्यात दिलेल्या प्रमाणा प्रमाणे तेल टाकून गरम करून घेऊ - 7
तेलात धूर येईल असा तेल गरम करून घेऊ
वरून हात ठेवून चेक करायचे धूर येत असेल तेव्हा गॅस बंद करून द्यायचा पातेले खाली उतरवून घ्यायचे - 8
आता हलके कोमट तेल झाल्यावर त्यात थोडेसे मोहरी टाकून बघायचे मोहरी टाकल्यावर तळून वरती आली अशा वेळेस मसाला टाकण्यासाठी तेल तयार आहे असे समजायचे
पातेले खाली उतरवून घ्यायचे - 9
आता एकएक करून मसाले तेलात टाकून घेऊ मोहरीची डाळ, लाल सुक्या मिरच्या,मेथीची डाळ, हळद,लाल मिरची,
कुठलेले लवंग मिरे, हिंग,बडीशोप सगळे मसाले टाकुन तेलात तळून घ्यायचे झार्याने सारखे हलवत राहायचे म्हणजे मसाला तळून निघतो - 10
सगळ्यात शेवटी मीठ टाकायचे मीठ टाकून झाल्यावर थोडा मसाला टेस्ट करून बघायचा कमी जास्त वाढले तर मीठ टाकून घ्यायचे
मला थोडा कमी वाटला तर मी अजून मीठ टाकले - 11
आता मसाला थोडा थंड झाल्यावर आपली वाळलेली कैरी टाकून मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊ
- 12
पातेले दोन तीन दिवस कापड बांधून वरुण ताठ ठेवून हलवत राहायचे लोणचे
- 13
लोणच्याच्या बरणीला एका तव्यावर हिंग टाकून वरून थोड्या वरती पकडून काचेची बरणी ठेवून हिंगाची धुंगारी द्यायची म्हणजे बरणी किटाणू रहित होते
लोणचे मुरले का काचेच्या बाटलीत भरून घ्यायचे
बाटलीत भरण्याच्या आधी बाटलीत खाली थोडे मीठ टाकून घ्यायचे मग लोणचे भरून घ्यायचे - 14
लोणचे भरून घेऊ, लोणचे भरून झाल्यावर आपल्याला वाटले तेल कमी आहे तर अजुन तेल गरम करून थंड करून टाकू शकतो लोणचं डुबेल त्यावर तेल तरंगेल इतके तेल हवे
- 15
तयार आपले वर्षभराचे कैरीचे लोणचे
सूर्यप्रकाशापासून लांब ठेवायचे पूर्वी आपल्या आजी-आई कडुनिंबाचे पानेही ठेवायचे पण आता आपण ठेवत नाही
लोणच्याचे फोटोसेशन करून घेऊ - 16
सहसा दिवसात लोणचे काढायचे आणि पॅक बॉटल ला झाकण लावायचे
लोणचे वर्षभर टिकते, लोणचे काढतांना वर खालून हलवून घ्यायचे मग काढून परत पॅक करून ठेवायचे - 17
लोणचे तयार करताना हळदी मिठाचे आंबट पाणी उरले होते त्या पाण्यापासून मी डाळ तयार करणार आहे
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)