लोणचे (lonche recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#ट्रेंडिंग
#खानदेशी लोणचे
लोणचं म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं लोणचं हे वर्षभरासाठी आत्ताच म्हणजे पावसाळ्याच्या आधीच भरून ठेवल्या जाते

लोणचे (lonche recipe in marathi)

#ट्रेंडिंग
#खानदेशी लोणचे
लोणचं म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं लोणचं हे वर्षभरासाठी आत्ताच म्हणजे पावसाळ्याच्या आधीच भरून ठेवल्या जाते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 किलोकैरीच्या फोडी
  2. 25 ग्रॅममोहरी डाळ
  3. 1 चमचाहळद
  4. 2 चमचेलाल तिखट
  5. 1 चमचाकश्मीरी लाल तिखट
  6. 1 ग्रॅमहिंग
  7. 1 चमचाधने,
  8. 1 चमचाबडी सोफ,
  9. 1 चमचामेथी दाना
  10. १५० ग्रॅम-200 ग्रॅम मीठ किंवा आपल्या अंदाजानुसार
  11. २५० मि.ली.तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम कैरीच्या फोडी घेऊन त्याला मीठ व हळद लावून घेणे

  2. 2

    मीठ व हळद लावून रात्रभर ठेवणे नंतर दुसऱ्या दिवशी त्यातले पाणी काढून घेणे व थोडे फॅन च्या हवे खाली किंवा उन्हात सुकवावे म्हणजे त्यातले पाणी निघून जाते. पाणी काढून फोडी कोरड्या करून घ्याव्यात

  3. 3

    नंतर धने मेथी व सोफ एक भांडे घेऊन त्यात भाजून घेणे व त्याची मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर पूड काढून घेणे

  4. 4

    नंतर मोहरीची डाळ मीठ पण एका भांड्यात टाकून भाजून घेणे

  5. 5

    नंतर सर्व साहित्य एका परातीत किंवा ताटलीत काढून घेणे

  6. 6

    एका भांड्यात तेल तापवून घेणे तेल कोमट झाले की त्यात हिंग टाकावा व परातीत हे मिश्रण सगळे मिक्स करून त्यात तेल ओतून घ्यावे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे हा झाला आपला लोणच्याचा खार तयार

  7. 7

    नंतर आंब्याच्या फोडी त्यात मिक्स करून घेणे व सर्व छान हलवून घेणे

  8. 8

    सर्व मिश्रण एकत्र मिक्स केल्यानंतर झाले आपली लोणचे तयार एखाद्या बरणीत भरून ठेवणे

  9. 9

    छान मस्त चटपटीत लोणचे तयार हे लोणचं वर्षभर टिकते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes