पनीर मखनी दम बिर्याणी (paneer makhani dum biryani recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#बिर्याणी
आज शुक्रवार असला तरी वटपौर्णिमा असल्याने शाकाहारी मेनू बनविण्याचे ठरले. ताजे पनीर घरात आणलेले होते त्याची पनीर बिर्याणी करायचे असे ठरवले. या रेसिपीला सुरुवात करणार इतक्यात cookpad वर बिर्याणीची थीम आली. बिर्याणी हा मुख्यतः मटण अथवा चिकन सोबत केला जाणारा पदार्थ आहे. परंतु या मोगलाई डिशला अस्सल भारतीय टच देऊन अतिशय चविष्ट अशी शाकाहारी बिर्याणी सुद्धा आपण करू शकतो.
पनीर मखनी दम बिर्याणीची रेसिपी आपल्या समोर माझ्या पद्धतीने सादर करीत आहे.

पनीर मखनी दम बिर्याणी (paneer makhani dum biryani recipe in marathi)

#बिर्याणी
आज शुक्रवार असला तरी वटपौर्णिमा असल्याने शाकाहारी मेनू बनविण्याचे ठरले. ताजे पनीर घरात आणलेले होते त्याची पनीर बिर्याणी करायचे असे ठरवले. या रेसिपीला सुरुवात करणार इतक्यात cookpad वर बिर्याणीची थीम आली. बिर्याणी हा मुख्यतः मटण अथवा चिकन सोबत केला जाणारा पदार्थ आहे. परंतु या मोगलाई डिशला अस्सल भारतीय टच देऊन अतिशय चविष्ट अशी शाकाहारी बिर्याणी सुद्धा आपण करू शकतो.
पनीर मखनी दम बिर्याणीची रेसिपी आपल्या समोर माझ्या पद्धतीने सादर करीत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५० मिनिटे ते १ तास
५  माणसांसाठी
  1. भात बनविण्यासाठी
  2. 3 वाट्यातांदूळ
  3. 1तमालपत्र
  4. 2-3दालचिनी
  5. 3-4लवंग
  6. 2-3वेलची
  7. 5-6काळीमिरी
  8. 1चक्रफुल
  9. 1 टेबल स्पूनतूप
  10. 6 वाट्यापाणी
  11. 1 टीस्पूनमीठ
  12. पनीर मखनी बनविण्यासाठी -
  13. २०० ग्रॅम पनीर
  14. 1 वाटीदही
  15. 1/4 वाटीफ्रेश क्रिम
  16. 1 टी स्पूनजिरे
  17. 1तमालपत्र
  18. 2-3लवंग
  19. 2-3दालचिनी
  20. 4-5काळीमिरी
  21. ८-१० काजू
  22. 5-6लसूण पाकळ्या
  23. 1 इंचआल्याचा तुकडा
  24. 2मध्यम आकाराचे कांदे
  25. 3मध्यम आकाराचे टोमॅटो
  26. 1 टी स्पूनहळद
  27. 2 टी स्पूनलाल मिरची पूड
  28. 1 टी स्पूनगरम मसाला
  29. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  30. चवीनुसारमीठ
  31. 1 टेबलस्पूनबटर व तेल
  32. दम देण्यासाठी:
  33. 2कोळशाचे निखारे
  34. 1 चमचातूप
  35. सजावटीसाठी:
  36. 1तळून घेतलेले कांदे
  37. 5काजू
  38. फ्रेश पुदिन्याची पाने

कुकिंग सूचना

५० मिनिटे ते १ तास
  1. 1

    छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे.
    प्रथम तांदूळ धुवून पंधरा मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावेत. नंतर पाणी वेळून काढावे.एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात १ तमालपत्र, २-३ दालचिनी, ३-४ लवंग, २-३ वेलची, ५-६ काळीमिरी, १ टेबल स्पून तूप आणि १ टीस्पून मीठ घालावे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात धुतलेले तांदूळ घालून भात 90% शिजवून घ्यावा नंतर एका मोठ्या परातीत मोकळा करून बाजूला ठेवावा.

  2. 2

    आता एका कढईत अर्धा एक चमचा बटर आणि एक चमचा तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात जिरे घालावे. नंतर त्यात तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळीमिरी आणि काजू घालावे. नंतर त्यात कांदा आणि टोमॅटो घालावा. आता त्यात लाल मिरची पूड, हळद, गरम मसाला, धने पूड आणि मीठ घालून चांगले परतवून घ्यावे.त्यात दही घालून चांगले एकत्रित करून घ्यावे. थोडे पाणी घालावे आणि झाकण ठेवून चांगले आठ ते दहा मिनिटे शिजवून घ्यावे.मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी.

  3. 3

    आता एका पॅन मध्ये एक चमचा तेल घालून त्यात अर्धा टीस्पून लाल मिरची पूड घालावी आणि त्यात मिक्सर मध्ये वाटलेले मिश्रण घालावे. थोडी उकळी आल्यावर त्यात कसुरी मेथी घालून एकत्रित केल्यानंतर पनीरचे तुकडे घालावेत आणि दोन मिनिटे शिजवून घ्यावे सर्वात शेवटी त्यामध्ये फ्रेश क्रीम घालून गॅस बंद करावा.
    एका कढईमध्ये तेल टाकण्यासाठी ठेवून त्यात उभा चिरलेला कांदा आणि थोडे काजू खरपूस तळून घ्यावे.

  4. 4

    आता बिर्याणीचे थर लावूया.
    सर्वात खाली भाजीचा थर लावावा. त्यावर मोकळा करुन ठेवलेला भात पसरवावा. त्यावर तळलेला कांदा आणि काजू घालून परत त्यावर भाजीचा थर लावावा. आता उरलेला भात त्यावर पसरवून घ्यावा आणि त्यावर कांदा,काजू पसरवावा. पुदिन्याची पाने सजावटीसाठी टाकावी.
    भांड्यावर झाकण ठेवून बिर्याणी दहा मिनिटे शिजवून घ्यावी.
    हे करीत असताना भांड्यातील वाफ बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी.

  5. 5

    आता दोन कोळशांचे चांगले लाल निखारे एका वाटीत घ्यावे. ती वाटी बिर्याणीच्या भांड्यात ठेवून निखाऱ्यांवर तूप सोडावे. तुपाचा धूर येऊ लागताच पुन्हा पाच मिनिटांसाठी झाकण बंद ठेवावे अशा पद्धतीने दम दिल्यामुळे बिर्याणीला एक स्मोकी फ्लेवर येतो. आपण सर्व जाणतोच बिर्याणी सर्व्ह करताना कालथा उभा धरून बिर्याणीचे सर्व थर त्यात येतील अशा पद्धतीने सर्व्ह करावे.कांदा लिंबू आणि रायत्यासोबत बिर्याणी गरमागरम सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

टिप्पण्या

Similar Recipes