तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास 10 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपतांदुळ
  2. 1/2साखर
  3. 1-1/4 लिटर दूध. (5 & 1/2 कप दूध)
  4. 2 टेबलस्पूनसाजुक तूप
  5. 1 कपपाणी
  6. 5काजू
  7. 10बेदाणे
  8. 7-8पिस्ते
  9. 1/4 टेबलस्पूनवेलची पावडर
  10. केसर

कुकिंग सूचना

1तास 10 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम तांदूळ एक कप पाणी घालून वीस मिनिटे भिजत ठेवावे. मी इथे तुकडा बासमती तांदूळ वापरला. आता पंधरा मिनिटांनी 3/4 दूध एका कढई मध्ये गरम करायला ठेवावे.

  2. 2

    एकीकडे दोन टेबलस्पून तूप पॅन मध्ये घालून काजू, बदाम आणि बेदाणे थोडे परतून घ्यावे मंद गॅसवर. दुध गरम करायला ठेवलेले सारखे आपण ढवळत राहायचे. दूध चांगले गरम झाल्यावर, आता भिजवलेला तांदूळ घालावा.

  3. 3

    तांडुळ गरम दुधात घातल्या नंतर मंद गॅसवर दूध सारखे ढवळत रहायचे. 30 मिनिटे लागतात तांदूळ शिजायला. आता आपण येथे तांदुळ शिजला का पहावे आणि इथे आता आपले दूध चांगले घट्ट होते. तांदूळ शिजला नंतर साखर घालावी आणि चांगले ढवळत रहायचे जेणेकरून साखर पूर्ण विरघळते. त्यानंतर वेलची पावडर घालावी.

  4. 4

    आता यामध्ये परतलेले ड्रायफ्रुट घालावे आणि केसर घालावे. त्यानंतर एक कप गरम दूध घालावे आणि 2-3 मिनिटे पुन्हा एकदा ढवळावे. आता गॅस बंद करावा.( आपण आपल्या आवडीनुसार दूध जास्ती घालू शकता पातळ करण्यासाठी.

  5. 5

    आता आपली खीर तयार झाली. सर्व्ह करताना वरून पिस्त्याचे काप घालावे आणि थोडे केसर घालावे आपल्या आवडीनुसार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes