मटकीची उसळ(ब्राह्मणी पद्धत) (matkichi usal recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#cpm3
कडधान्य प्रकारातील मटकी ही अनेकाना आवडणारी आहे. ही भाजी प्रोटीन युक्त तर असतेच पण चवीलाही खूप छान लागते. कांदा, टोमॅटो, आले- लसूण मसाला वापरून बरेच वेळा ही भाजी केली जाते. पण आज मी खास ब्राह्मणी पद्धतीची मटकीची उसळ दाखवणार आहे ज्यामध्ये फक्त ओला नारळ, गोडा मसाला, तिखट याचा वापर केला गेला आहे पण तरीही याची चव अप्रतिम लागते. तसेच यामध्ये गूळही घातला आहे त्यामुळे उसळीची चव अजूनच वाढते. श्रावणात येणाऱ्या मंगळागौरीच्या सणांमध्ये मटकीची उसळ, मसालेभात ,वडे असा खास बेत केला जातो तेव्हा याच प्रकारे उसळ केली जाते. मिसळ करतानाही या मटकी चा वापर केला जातो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1-1.5 कप मोड आलेली मटकी
  2. 1बटाटा
  3. 1/4 कपओल्या नारळ
  4. 1 टेबलस्पूनगोडा मसाला
  5. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 1/2 टीस्पून हळद
  7. कढीपत्त्याची सात-आठ पाने
  8. मोठ्या लिंबाएवढा गूळ
  9. चवीनुसारमीठ
  10. कोथिंबीर
  11. 2 टेबल्स्पूनतेल, मोहरी, जीरे , हिंग फोडणीसाठी

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    मटकी एक दिवस आधी सकाळी भिजवून,दुपारी त्यातील पाणी उपसून फडक्यात बांधून ठेवा म्हणजे त्याला चांगले मोड येतील. कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, जीरे, हिंग यांची फोडणी करा त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घाला. बटाट्याची साले काढून त्याच्या छोट्या फोडी करून घ्या.

  2. 2

    फोडणी चांगली तडतडली की त्यामध्ये हळद घालून मग भिजवलेली मटकी आणि बटाटा घाला. मटकी तीन ते चार मिनिट चांगली तेलात परतून घ्या. नंतर त्यामध्ये गोडा मसाला, तिखट, ओला नारळ घालून नीट मिक्स करून घ्या व या मिश्रणामध्ये साधारण अर्धा ते पाऊण कप पाणी घाला. सर्व व्यवस्थित मिक्स करून कढईवर झाकण ठेवून पाणी ओता, वाफेवर ही भाजी मंद आचेवर पंधरा ते वीस मिनिटं शिजू द्या.

  3. 3

    मोड आलेली मटकी असल्यामुळे ती शिजण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो पंधरा-वीस मिनिटांनी मटकीचा दाणा हातात घेऊन बोटाने चेपून बघा ती व्यवस्थित शिजली असल्यास त्यामध्ये मीठ व गूळ घालून नीट मिक्स करा. आता झाकण न ठेवता भाजी तीन ते चार मिनिटे तशीच शिजवा. गरज असेल तर तुम्हाला हवे त्याप्रमाणे उसळी मध्ये पाणी घाला. बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर वरतून घालून गॅस बंद करा आणि झाकण ठेवून द्या. झाली आपली मटकीची उसळ तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

Similar Recipes