कोडी वेपुडू किंवा आंध्रप्रदेशी चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#cpm4 आंध्रप्रदेश मधील ही एक प्रसिद्ध डिश आहे - Kodi Vepudu. Kodi म्हणजे चिकन आणि Vepudu म्हणजे फ्राय. 🙂😊🍗🐔

कोडी वेपुडू किंवा आंध्रप्रदेशी चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)

#cpm4 आंध्रप्रदेश मधील ही एक प्रसिद्ध डिश आहे - Kodi Vepudu. Kodi म्हणजे चिकन आणि Vepudu म्हणजे फ्राय. 🙂😊🍗🐔

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
३ व्यक्तींसाठी
  1. चिकन मुरवण्यासाठी
  2. १०-१२ लसूण पाकळ्या
  3. 2 इंचआलं
  4. 1 वाटीपुदिना पाने (किंवा कोथिंबीर)
  5. 2हिरव्या तिखट मिरच्या
  6. 1लिंबू
  7. 1/4 चमचालाल तिखट मसाला
  8. 1/4 चमचाहळद
  9. मीठ चवीनुसार
  10. कोडी वेपुडू मसाला
  11. 8-9काजू
  12. 1 चमचाबडीशेप
  13. 1 चमचाकाळं दगडफुल
  14. 2चक्री दगडफुल
  15. 2दांडे जावित्री
  16. १०-१२ काळीमिरी
  17. 2 इंचदालचिनी
  18. 1काळी मसाला वेलची
  19. 4हिरवी वेलची
  20. 2लाल सुक्या बेडगी मिरच्या
  21. 2 चमचेधणे
  22. 1/2 चमचाशहाजीरे
  23. 2तिरफळ (ऐच्छिक)
  24. 2 चमचेसुकं किसलेलं खोबरं
  25. 1/4 चमचाखसखस
  26. मीठ चवीनुसार
  27. 1 चमचातेल
  28. इतर घटक
  29. 3-4 चमचेतेल (चिकन फ्राय करण्यासाठी)
  30. 1 चमचापांढरे तीळ
  31. 4-5कढीपत्त्याची पाने
  32. 1कांदा (बारीक चिरलेला)
  33. मीठ चवीनुसार
  34. 1 वाटीपाणी (चिकन शिजवण्यासाठी)

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    चिकन मुरवण्यासाठी : लसूण, आलं, पुदिना मिरच्या यांची एकत्रित पेस्ट केली. चिकन ला लाल तिखट मसाला, हळद, वरील बनवलेली पेस्ट आणि मीठ चोपडून लिंबाचा रस पिळला. हे चिकन चांगलं २-३ तास या मसाल्यात मुरवत ठेवलं.

  2. 2

    कोडी वेपुडू मसाला : कढईत तेल गरम करून सर्व खडे मसाले घालून तेलात परतून घ्यायचे. मसाल्यांचा सुगंध सुटला की खोबरं घालून परतायचं आणि गॅस बंद करून थंड व्हायला द्यायचं. थंड झाल्यावर मिक्सर ला मसाले बारीक वाटून घ्यायचे. कोडी वेपुडू मसाला तयार.

  3. 3

    चिकन शिजवण्यासाठी : कढईत मुरवलेलं चिकन घेऊन एखादं वाटी पाणी घालायचं आणि झाकण ठेवून सर्व पाणी आटेपर्यंत चिकन शिजवून घ्यायचं.

  4. 4

    कोडी वेपुडू किंवा चिकन फ्राय : कढईत ३-४ चमचे तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची पाने आणि पांढरे तीळ घालून तडतडू द्यायचे. चिरलेला कांदा घालून पारदर्शक / गुलाबीसर होईपर्यंत तळायचा. मिक्सर मध्ये वाटलेला कोडी वेपुडू मसाला घालायचा आणि तेल सुटेपर्यंत परतायचा. मीठ टाकून ढवळून घ्यायचं. मीठ बेताचंच टाकायचं कारण याआधी सगळ्यात मीठ वापरलेलं आहे.

  5. 5

    आता यात शिजवलेलं चिकन घालून (मसाला चिकन मध्ये मुरेपर्यंत) झाकण ठेवून शिजवायचं. झाकणावर पाणी ठेवायचं. मध्ये मध्ये ढवळत राहायचं जेणेकरून मसाला बुडाला लागू नये. साधारण १५ मिनिटांनी मसाला चिकन ला व्यवस्थित लागून चिकन फ्राय झालेलं असेल. एकदा मीठ बरोबर असल्याचं चाखूनघ्यायचं आणि गॅस बंद करून ठेवायचा. पाच मिनिटात आतल्या आत वाफेवर कोडी वेपुडू मसाला मुरून मस्त चिकन फ्राय खायला तयार झालेलं असेल. 🍗🐔
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

Similar Recipes