खुसखुशीत कापण्या (kapnya recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

#ashr
आषाढ महिन्याला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे.
या महिन्याला मनोकामना पूर्ण करणारा महिना असेही म्हटले जाते.
या महिन्यात मूळ नक्षत्री चंद्र असतो त्या दिवशी बेंदूर, पौर्णिमेस व्यासपूजा, अमावास्येस दीपपूजा, तसेच अधिक आषाढात कोकिळाव्रत इत्यादींमुळे आषाढाचे महत्त्व आहे.
या महिन्यात खूप सारे पदार्थ तळले जातात त्यालाच आखाड तळणे असं बोलतात.
त्यातलाच एक पदार्थ मी आज केला आहे...गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4-5 जणांसाठी
  1. 2 कपगव्हाचे पीठ
  2. 2 टेबलस्पूनबेसन
  3. 1 कपकिसलेला गुल
  4. 1 कपपाणी
  5. 2 टेबलस्पूनगरम तेल
  6. 1 टीस्पूनबडीशेप
  7. 1 टीस्पूनखसखस
  8. चिमूटभरमीठ
  9. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    पॅनमध्ये पाणी आणि किसलेला गूळ घेऊन त्याची गुळवणी करा. फक्त गुल वितळेपर्यंत उकळी काढायची. गुळवणी थंड करा.

  2. 2

    गव्हाचे पीठ, बेसन, मीठ, बडीशेप सर्व मिक्स करून त्यात तेलाचे मोहन टाकून पुन्हा सर्व मिक्स करून गुळवणी टाकून गोळा मळून घ्या.

  3. 3

    आता जाडसर पोळी लाटून डायमंड शेप मध्ये कापून घ्या. कढईत तेल गरम करत ठेवा तेल थोडं तापलं की गॅस मिडीयम करून कापण्या तळून घ्या.
    गॅस फास्ट ठेवू नये त्यामुळे ते छान तळले जातील.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes