कापण्या (kapnya recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#KS7 थीम ७ : लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र पूर्वी दळणवळणाची साधने कमी असल्यामुळे प्रत्येक गोष्टी करायला, वापरायला मर्यादा होत्या. पण आजच्या आधुनिक तंत्रज्ञानात जग फास्ट झाले. डीलक्स लाईफ, पाश्चिमात्य खाणपिणं याला महत्व आले. आणि धकाधकीच्या या जीवनात आपले पूर्वापारचे रितिरिवाज, खाणपिणं कधी मागे पडले कळलंच नाही.
तरीही या "कूकपॅड" सारख्या प्लॅटफॉर्मने आपल्या घरगुती, सणावारांच्या निमित्ताने इतर पदार्थ बनविण्यासाठी, सुगरणींना सदैव तत्पर, प्रोत्साहित केले आहे. त्यानिमित्ताने मी
"कापण्या" ही रेसिपी केली आहे. सध्याच्या काळात कापण्यांची ची जागा शंकरपाळी, कुकीज ने घेतलेली असावी.
आषाढी - कार्तिकी एकादशीला लोक पूर्वापार पंढरपूरला जात आहेत. पूर्वी लोक पायी जायचे. अजूनही जातात. तर हया दिंडी बरोबर निघताना बरोबर काही खाणपिण्याचे सामान, काही घरगुती पदार्थ घेऊन जात. त्यातलाच हा "कापण्या " हा पदार्थ. शक्यतो आषाढ महिन्यात केला जाणारा हा पदार्थ म्हणून .. गावाला त्याला "आकाड तळणे" असेही म्हटले जाते. तर बघुया..."कापण्या" रेसिपी 🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीचण्याच्या डाळीचे पीठ
  2. 1/2 वाटीगव्हाचे पीठ
  3. 1 वाटीचिरलेला गूळ (गुळाचे प्रमाण कमी-जास्त आवडीनुसार)
  4. 1/2 टीस्पून वेलची पावडर
  5. 1 टेबलस्पूनखसखस
  6. चिमूटभरमीठ,
  7. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम गूळ चिरून, अर्ध्या वाटी पाण्यामध्ये विरघळून घ्यावा. त्यानंतर ते पाणी गाळून घ्यावे. गाळलेल्या पाण्यात वेलची पावडर व चिमूटभर मीठ घालून, दोन्ही पीठे चाळून घ्यावे. दोन्ही पिठे एकत्र मिक्स करून गुळाच्या पाण्यात मळून घ्यावे. व तासभर तॊ गोळा मळून ठेवावा.

  2. 2

    गोळा व्यवस्थित मळून मध्यम आकाराचे गोळे करावेत. एक गोळा घेऊन त्याची दोन्ही बाजूला खसखस लावून पोळी लाटावी. जास्त पातळ न लाटता थोडी जाडसरच लाटावी. त्यानंतर कटर ने कापण्या कापून घ्याव्यात.

  3. 3

    त्यानंतर पॅन मध्ये तेल गरम करून कापलेल्या कापण्या तळून घ्याव्यात. ह्या "कापण्या" बरेच दिवस टिकतात. त्यामुळे लांबच्या प्रवासात न्ह्यायला उपयोगी पडतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

Similar Recipes