गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#आषाढ स्पेशल रेसिपीज चॅलेज 😋
#ASR
आषाढ महिन्यात गोड कापन्या करण्याचा असतो पण आमच्या कडे साद्याची पोळी करतात 😋😋

गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)

#आषाढ स्पेशल रेसिपीज चॅलेज 😋
#ASR
आषाढ महिन्यात गोड कापन्या करण्याचा असतो पण आमच्या कडे साद्याची पोळी करतात 😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
  1. 2 मेजरींग कप गव्हाचे पीठ
  2. 1/2 मेजरींग कप बेसन
  3. 1/2 मेजरींग कप तांदूळाचे पिठ
  4. 1 मेजरींग कप गुळ
  5. 2 टीस्पूनबडीशेप पावडर
  6. 2 टीस्पूनविलायची पुड
  7. 3-4 टीस्पूनखाकस
  8. 2 टीस्पूनतिळ
  9. चिमुटभरमीठ
  10. मोहना साठी तेल
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम गोड गुळाच्या कापण्या चे साहित्य काढून घेतले.

  2. 2

    नंतर एका पातेल्यात एक वाटी गुळ त्यात १/२ वाटी पाणी घालून गुळ विरघळून घेतला.

  3. 3

    नंतर एका परातीत गव्हाचे पीठ, बेसन, तांदळाची पिठी, बडीशेप पावडर,विलायची पुड, चिमुटभर मीठ,तिळ घालून मोहन घालून घेतले.

  4. 4

    नंतर एका चाळणीने गुळाचे पाणी गाळून पिठ भिजवून गोळा तयार करून घेतला.

  5. 5

    नंतर पिठाचे सम प्रमाणात गोळे करून लाटुन त्यावर खाकस टाकुन दोन्ही बाजूंनी लाटुन घेतले.

  6. 6

    नंतर त्याचे आवडीनुसार काप करून घेतले.

  7. 7

    नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात मंद आचेवर खमंग तळून घेतले.

  8. 8

    गोड गुळाच्या कापण्या तयार झाल्यावर खायला तयार झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes