बटाट्याचा ठेचा (batatyacha thecha recipe in marathi)

# बटाटा सर्वांच्याच आवडीचा. तो आपल्या कडे नेहमी असतोच. आयत्या वेळी पटकन भाजी करता येते.माझी आई शिक्षिका हॊती. ती आणि आम्ही भावंडे एकाच वेळी शाळेतून यायचो. आम्हाला भूक लागलेली असायची, मग आई एका गॅसवर कुकर लावायची आणि कुकर होई पर्यंत असा मस्त बटाट्याचा ठेचा करायची. बघूया कसा करायची ते.
बटाट्याचा ठेचा (batatyacha thecha recipe in marathi)
# बटाटा सर्वांच्याच आवडीचा. तो आपल्या कडे नेहमी असतोच. आयत्या वेळी पटकन भाजी करता येते.माझी आई शिक्षिका हॊती. ती आणि आम्ही भावंडे एकाच वेळी शाळेतून यायचो. आम्हाला भूक लागलेली असायची, मग आई एका गॅसवर कुकर लावायची आणि कुकर होई पर्यंत असा मस्त बटाट्याचा ठेचा करायची. बघूया कसा करायची ते.
कुकिंग सूचना
- 1
बटाटे स्वच्छ धुऊन कापून घ्यावेत. लसूणही सोलून घ्यावा
- 2
बटाटे व लसूण ठेचून घ्यावेत किंवा मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे.पाणी अजीबात घालू नये.
- 3
ठेचलेला बटाटा लसूण तिखट मीठ सर्व एकत्र करून घ्यावे.
- 4
गॅसवर मध्यम आचेवर एका पॅन मध्ये तेल घेऊन तेल तापल्यावर त्यात तिखट मीठ घालून मिक्स केलेला बटाटा घालून परतुन घ्यावे. मंद गॅसवर झाकण ठेवून पाच मिनिटांनी झाकण काढून परत ढवळून घ्यावे. ठेचा तयार
- 5
ह्या ठेच्यात फक्त्त लाल तिखट आणि मीठ घालावे. फोडणी सुद्धा तेलावरच टाकावी कोणतेही मसाले वगैरे न घालताच हा ठेचा मस्त लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिरची चा ठेचा.. (mirchicha thecha recipe in marathi)
#रेसिपीबुक गावरान थीम दिली तेव्हा पासून विचार करत आहे की लिहू ...माझे गाव सांगली ..म्हणजे घाटा वरची आहे मी ...मी जास्त गावाला जात नाही..लहान असताना जायची कधी कधी ...आणि आम्ही सगळे खूप मजा करायचो..आणि मग आई सकाळी नाश्ता ल आम्हाला गरम गरम चपाती आणि मिरची चा ठेचा द्यायची...आणि चहा...काय मस्त लागायचे. अजुन पण कधी आठवण आली की मी इथे करते...नाश्ता ला ..माझ्या मुलीला खूप आवडते..चला मग करूया मिरची चा ठेचा ... Kavita basutkar -
खान्देशी मिरची ठेचा (mirchi thecha recipe in marathi)
#KS4#खान्देशी झणझणीत मिरची ठेचा. बघा कसा करायचा तो. Hema Wane -
बटाट्याचा कीस (Batatyacha Kees Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK झटपट आणि पटकन होणारा बटाट्याचा कीस नवरात्रीच्या उपवासात चेंज म्हणून खायला छान लागतो. Shama Mangale -
बटाट्याचा उपवासाचा खिस (batatayacha upwasacha khis recipe in marathi)
#pe #बटाटा कीस उपवासाचा बटाटा ही परदेशी भाजी असून सुद्धा आपल्या व्रतवैकल्यांमध्ये, उपवासाच्या पदार्थांमध्ये बटाट्याचा असा काही समावेश झालाय की त्यामुळे ही भारतीय भाजी आहे असेच आपल्याला कायम वाटत असते..इतकी आपल्या खाद्यसंस्कृती मध्ये मिसळून गेलीये.. आपली खाद्यसंस्कृती आहेच महान..सगळ्यांना सामावून घेत असते.. सर्वसमावेशक..तर आज आपण उपवासाच्या पदार्थांमधला महत्वाचा आणि नेहमी केला जाणारा सर्वांच्याच आवडीचा बटाट्याचा कीस कसा करायचा ते पाहू या.. Bhagyashree Lele -
खानदेशी मिरचीचा ठेचा (khandeshi mirchicha thecha recipe in marathi)
#KS4 खानदेश विशेष मध्ये खानदेशी ठेचा कसा करायचा ते मी शेयर करत आहे,खानदेशी ठेच्यामध्ये सालीसहित शेंगदाणे वापरतात तर मग बघूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
बटाट्याचा काचरा
#लॉकडाऊन बटाट्याचा काचरा एकदम सोपी व सर्वाना आवडणारी भाजी आहे. कमी खर्चात बनणारी भाजी #lockdown Swayampak by Tanaya -
पारंपारिक गावरान पद्धतीने मिरची चा ठेचा (mirchicha thecha recipe in marathi)
"पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा" आजारातून उठलं की तोंडाला चव नसते, खुप तिखट, चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात.. म्हणून मी कमी तिखट मिरचीचा ठेचा बनवला आहे.. आमच्या गावाकडे हिरव्यागार तिखट मिरच्यांचा तव्यावर रगडून ठेचा बनवतात आणि एका जेवणामध्ये च संपूनही जातो,एवढा मस्त चविष्ट लागतो. लता धानापुने -
मिरचीचा ठेचा/ दगडीत कुटलेला (mirchicha thecha recipe in marathi)
आमचे कुटुंब प्रचंड मिरच्या खाऊ! आम्हाला मिरची शिवाय जेवण ही कल्पनाच करवत नाही अर्थात हिरवी मिरची आणि ती ही तिखट हिरवी कंच दिसणारी! लोणचे, खमंग मिरची, ठेचा,खर्डा,भरली मिरची,दही मिरची काही तरी सोबतीला हवंच!मी हे करण्यात एकदम एक्सपर्ट! आज मी आपणास मी ज्या पद्धतीने ठेचा करते ते दाखवतेय.सर्वांना तो नक्कीच आवडेल. Pragati Hakim (English) -
भेंडीचा ठेचा (bhendicha thecha recipe in marathi)
खूप चविष्ट आणि रूचकर. पिठले, भाकरी आणि भेंडीचा ठेचा. मस्त असा मेनू. Cook with Gauri -
ओल्या लाल मिरचीचा ठेचा (olya laal mirchicha thecha recipe in marathi)
#KS3#लाल मिरचीचा ठेचाआमच्या विदर्भाची सवय आहे जो पर्यंत झणझणीत ठसका लागत नाही तो पर्यंत चव जिभेवर टिकत नाही.....कितीही उष्ण वातावरण असले तरीही झणझणीत जेवण ही विदर्भाची ओळख आहे....ओल्या लाल मिरच्या बाजारात आल्या की घरोघरी वर्षभर टिकणारा ठेचा केल्या जातो....आणि बरणीत भरून ठवल्या जातो....जेव्हा हवा तेव्हा काढून त्यावर हिंगाच मोहरीची फोडणी घालून सर्व्ह करतात....भाकरी सोबत तर लईच भारी....😋 Shweta Khode Thengadi -
-
-
लाल मिरचीचा ठेचा (Lal mirchicha thecha recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज चॅलेजगुढीपाडवाला घुगर्या सोबत खायला लाल मिरची ठेचा लागतो#लालमिरचीचा ठेचा 😋😋😋 Madhuri Watekar -
मराठमोळा हिरवी मिरची ठेचा (mirchi thecha recipe in marathi)
हिरवी मिरची ठेचा अतिशय लोकप्रिय आपल्या महाराष्ट्रात आहे....आणि हा आपल्या सगळ्यांच्या घराघरात पसंत केला जातो...घरी जर अवेळी भूक लागली असेल तर, भाजीच नसेल तर पोळी सोबत हा ठेचा अतिशय सुंदर लागतो,,,मला तर हा खूप जास्त आवडतो...मी नेहमी हा ठेचा करून ठेवते, जेवणामध्ये जर असला की जेवण छान होते... Sonal Isal Kolhe -
ओल्या शेंगदाण्याचा ठेचा (olya shengdanyacha thecha recipe in marathi)
#GA4 #week12#keyword_peanutतोंडाला चव आणणारा आणि टिकणारा ठेचा.... Monali Garud-Bhoite -
झणझणीत हिरवी मिरची ठेचा (hirvi mirchi thecha recipe in marathi)
#cooksnap#ठेचा#WdSupriya Thengadi आपल्या ऑथर ची झणझणीत मिरचीचा ठेचा रेसिपी बघून मलाही तोंडाला पाणी आले आणि ठेचा खाण्याची इच्छा झाली. आणि ठेचा बघून लगेच करायला घेतला सगळे साहित्य घरात अवेलेबल होते मिरची फक्त तिखट होती त्यासाठी रेसिपीत थोडा बदल केला ज्यामुळे तिखट लागणार नाही आणि रेसिपी तयार केली एक घटक माझ्याकडे नव्हता तर तो मी नंतर टाकला रेसिपी तयार करताना तो माझ्याकडे अवेलेबल नव्हता. खरंच झणझणीत असा ठेचा मस्त तयार झाला आहे धन्यवाद सुप्रिया मस्त रेसिपी दिल्याबद्दल हा ठेचा माझी बेस्ट फ्रेंड ज्योती वसानी प्रत्येक वस्तु शेअर करून खातो हा ठेचा ही तिच्यासाठी. स्पेशल वुमन्स डे वीक मध्ये ही रेसिपी ज्योती वसानी साठी.ठेचा मला नेहमीच आवडतो भाकरीबरोबर ठेचा हवाच थंडी भाकरी आणि ठेचा माझा आवडीचा असा पदार्थ आहे. माझ्याकडे मिरच्या तिखट असल्यामुळे कोथंबीर चे प्रमाण जास्त वाढवले. जेणेकरून पोटाला त्रास नको व्हायला म्हणून परत एकदा तेलात टाकून फ्राय करून घेतला. Chetana Bhojak -
लाल मिरचीचा ठेचा (lal mirchi thecha recipe in marathi)
#GA 4#week4# chutanyविदर्भात भाकरीसोबत लाल किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा, त्यावर तेल आणि सोबत फोडलेला कांदा, हे असल्याशिवाय खेड्या मध्ये जेवण जात नाही... पूर्वीच्या काळी भाज्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे लाल किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा याचा जास्त वापर होत होता! परंतु आता तोंडी लावणे म्हणून हा ठेचा ...खूप चविष्ट होतो हा ठेचा..तर बघूया... चटणीचा प्रकार... Varsha Ingole Bele -
उपवासाचा बटाट्याचा कीस
उपवासाचे किती वेगवेगळे पदार्थ आपण करतो.त्यापैकी माझ्या आवडीचा एक पदार्थ म्हणजे उपवासाचा बटाट्याचा कीस... Preeti V. Salvi -
क्रिस्पी भेंडी
आम्ही नागपूरला जात असताना एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो होतो तिथे आम्ही भाजी खाल्ली सर्वांना आवडले भाजी कशी केली म्हणून आम्ही विचारले हॉटेल च्या कुकला# आई Rekha Pande -
गवार ठेचा (gavar thecha recipe in marathi)
#मकर -काहीतरी वेगळे केले कि, सर्वांना मनापासून आवडते.तेव्हा मी हटके-झटके गवारचा पाट्यावरचा ठेचा केला आहे,भाता बरोबर, भाकरी, पोळी बरोबर खाता येतो. Shital Patil -
भेंडीचा ठेचा (bhendicha thecha recipe in marathi)
कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे आपण भेंडी करतो .आज मी भेंडीचा ठेचा करून पाहिला .एकदम मस्त झणझणीत ठेचा भाकरीसोबत मस्त लागला. Preeti V. Salvi -
-
ठेचा (thecha recipe in marathi)
ठेचा ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. ताटातील डावीकडचा पदार्थ (साईड डिश)आहे. हिरव्या मिरच्या , लसुण पासून बनवला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. झणझणीत पण तितकाच चविष्ट . ज्वारीच्या, बाजरीच्याभाकरी सोबत खूप छान लागतो. Ranjana Balaji mali -
लाल मिरची ठेचा (laal mirchi thecha recipe in marathi)
#26चवीला अप्रतिम लागणारा आणि जेवणाची लज्जत वाढवणारा.. खवय्यांना आवडणारा... पारंपरिक लाल मिरची ठेचा.. Shital Ingale Pardhe -
मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi)
#MR मटार रेसिपीओला हिरवा गार मटार खाण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ या हिवाळ्याच्या सीझनमध्ये करतो. मटार घातल्यामुळे पदार्थांची चव तर वाढतेच आणि तितकाच पौष्टिकही आहे. मी या मटार रेसिपी मध्ये 'मटार ठेचा' हा वेगळा पदार्थ केला आहे चला तर बघुयात कसा बनवायचा. आशा मानोजी -
कोल्हापुरी मिरचीचा ठेचा (mirchicha thecha recipe in marathi)
#KS2कोल्हापुरी मिरची ठेचा हा अगदी कमी साहित्यात बनतो. झणझनीत असा हा ठेचा पहिला कि तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही, जेव्हा घरात भाजी नसेल तेव्हा तोंडी लावण्यासाठी हा झटपट होणारा ठेचा बनवायला काहीही हरकत नाही, चला तर मग पाहुयात कोल्हापूर स्पेशल कोल्हापरी मिरची ठेचा. Shilpa Wani -
नागपुरी ठेचा (nagpuri thecha recipe in marathi)
#हिरवा ठेचा, हा माझ्या मिस्टरांचा विक पॉइंट .आज ठेचा भाकरी पिठलं आहे म्हटले तर स्वारी जाम खुश.पण त्यांच्या पद्धतीनेच हवा असतो मग काय ,बनवला की. Rohini Deshkar -
बटाटा 65 / बटाट्याचा तिखट असा चटपटीत असा नास्ता (batata 65 recipe in marathi)
रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की बटाट्याचा हा प्रकार करून पहा सर्वांना खूप आवडेल.#pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
मिरचीचा ठेचा (कुचला) (mirachicha thecha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण आज मी बनवला मिरचीचा ठेचा. घरी जेव्हा भाजीच काही नसेल तर झटपट होणारे आणि टेस्टिं अशी चटणी, ठेचा किंवा कुचला मी लहान होती तेव्हा आजी बनवायची मला ठेचा खूप आवडतो त्यामुळे आता पण केव्हा पण आठवण आली की बनवते आणि माझ्या घरचे सगळ्यांनाच आवडतो. शेतामध्ये माझ्या हिवाळ्यामध्ये मिरची राहते मिरची तोडायला मजूर जाते तेव्हा घरून बाया फक्त पोळी मीठ घेऊन जातात आणि मग तिथे हातांनी मिरची बारीक करून कूचला तयार करून पोळी सोबत खाते. चला तर मग आपण बनवूया झटपट होणारा ठेचा. Jaishri hate -
बटाट्याचा कीस
उन्हाळा आला की वाळवण पदार्थ करण्याचे वेध लागतात मग कुरडई काय पापड्या,सांडगे,बटाट्याचे वेफर्स,बटाट्याचा कीस काय हे सगळ आमचा लहानपणी आई करयची मग ते अंगणात सुकायला ठेवायची आणि आम्हा भावंडांना काठी घेवून राखण करायला बसवायची मग आम्ही थोडी ओलसर असलेली कुरडई ,साबुदाणाचा पापड,बटाट्याचा कीसआईला चोरून खायचो. पण कही म्हणा ओलसर असताना ह्याची जी काय भारी चव लागायची ती अजूनही जीभेवर आहे.पण अता अस खायला होत नाही कारण करून एवढे थकतो की खायला विसरतो .दरवर्षी हे सगळ करताना नकळत बालपणीचा आठवणी एखाद्या चित्रपटा प्रमाणे दिसू लागतात. Rohini's Recipe marathi
More Recipes
टिप्पण्या