उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#cpm6
उपवासाचे थालीपीठ हे भाजणी मुळे खूपच हेल्दी होतात. थालीपीठ सर्वांचाच आवडीचा विषय आहे. आणि त्यातही बटाटा काकडी रताळे अशा पौष्टिक गोष्टी टाकल्या तर मग काय विचारायलाच नको चला तर मग पाहूया या थालिपीठाची रेसिपी

उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)

#cpm6
उपवासाचे थालीपीठ हे भाजणी मुळे खूपच हेल्दी होतात. थालीपीठ सर्वांचाच आवडीचा विषय आहे. आणि त्यातही बटाटा काकडी रताळे अशा पौष्टिक गोष्टी टाकल्या तर मग काय विचारायलाच नको चला तर मग पाहूया या थालिपीठाची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
दोन जणांसाठी
  1. 1 वाटीउपवासाची भाजणी
  2. 1बटाटा
  3. 4-5 हिरव्या मिरच्या
  4. 1/4 वाटीशेंगदाणा कूट
  5. 1/2 चमचाजीरे
  6. 1 चमचामीठ
  7. 4 चमचेतूप

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    सर्वात अगोदर लागणारे साहित्य एकत्र जमवून घेऊ.

  2. 2

    आता पराती मध्ये भाजणी, उकडलेला बटाटा किसून,हिरवी मिरची आले मिक्सरला बारीक करून, शेंगदाणा कूट व जीरे घालून पीठ घट्ट मळून घेणे. अर्धा तास पीठ रेस्ट होण्यास ठेवून देणे.

  3. 3

    अर्ध्या तासाने पिठाचा गोळा घेऊन,तापलेल्या तव्यावर तूप सोडून,पाण्याच्या हाताने थालीपीठ हातावर थापून घेणे. दोन मिनिट थालीपीठ वर झाकण ठेवणे. दोन मिनिटाने दुसऱ्या बाजूने उलटवणे.

  4. 4

    तयार आहे आपली उपवासाचे खमंग थालीपीठ हे तुम्ही दह्या बरोबर लिंबूच्या लोणच्याबरोबर किंवा तसे सुद्धा खाऊ शकता.

  5. 5

    टीप- उपवासाची भाजणी करण्यासाठी मी एक किलो भगर त्याला पाव किलो साबुदाणा असे प्रमाण घेतले आहे. भगर कढईत छान भाजून घेणे त्याच कढईत साबुदाणा सुद्धा थोडा भाजून घेणे जीरे किंचित गरम करणे. आणि मग हे सर्व मिक्सरला किंवा घर घंटी वर छान दळून घेणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

Similar Recipes