मोडाच्या मुगाचे थालीपीठ (moongache thalipeeth recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#cpm5
मोड आलेले मूग खूपच पौष्टिक असतात याच्यामध्ये विटामिन ए बी सी आणि अधिक प्रमाणात असते याच्या सेवनामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते मोडाच्या मुगाचा मुळे शरीरातील टॉक्सिक बाहेर पडण्यास मदत होते त्वचेवर ग्लो येतो याच्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे शरीरातील ग्लुकोज लेवल कंट्रोलमध्ये राहते. केसांच्या निकोप वाढीसाठी सुद्धा मूग फायदेशीर आहे अशा या मोडाच्या मुगाचे थालीपीठ खूपच खमंग आणि पौष्टिक होते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
दोन जणांसाठी
  1. 1 कपज्वारीचे पीठ
  2. 1/2 कपगव्हाचे पीठ
  3. 1 कपमोड आलेले मूग
  4. 1 चमचालसूण
  5. 1 चमचाजीरे
  6. 1 चमचालाल तिखट
  7. 1 चमचा धणे पावडर
  8. 1कांदा
  9. 1 कपकोथिंबीर
  10. 4 चमचेतेल
  11. 1 चमचामीठ
  12. 1/2 चमचाहळद

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    सर्वात अगोदर लागणारे साहित्य जमवून घेणे

  2. 2

    आता मोडाचे मूग मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणे.

  3. 3

    आता सर्व पीठे मुगाची पेस्ट आणि सर्व मसाले व बारीक चिरलेला कांदा,कोथंबीर टाकून पीठ घट्ट मळून घेणे.

  4. 4

    दहा ते पंधरा मिनिटांनी पिठाचा गोळा घेऊन आपल्या आवडीनुसार डायरेक्ट तव्यावर थापावा किंवा पोळपाटावर ओला कपडा घेऊन थालिपीठ कापून घेणे व फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे छिद्र पाडणे. व कपडा अलगद उचलून तव्यावर टाकणे. थालीपीठ याच्या सर्व बाजूंनी आणि छिद्रांमध्ये तेल सोडणे.

  5. 5

    थालीपीठ दोन ते तीन मिनिट झाकण लावून ठेवणे व नंतर उलटून दुसऱ्या बाजूनेही खरपूस भाजून घेणे.

  6. 6

    गरमागरम थालीपीठ घरच्या ताज्या लोण्याबरोबर, दही,लोणचे,चटणीबरोबर किंवा नुसते सुद्धा खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

Similar Recipes