तांदूळ पोहे वेज पॅनकेक (tandul pohe veg pancake recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#bfr #रोज सकाळी काय करावे न्याहारीसाठी, हा प्रश्न पडला की काहीतरी वेगळे करण्याची ऊर्मी येते, Cookpad मुळे... म्हणून आज केले आहे तांदूळ आणि पोहे , मिक्स, वेज पॅनकेक.. आवडेल त्या भाज्या घालून केले, की लहान मोठे सगळ्यांनाच आवडतात.. तेव्हा नक्की करून पहा...

तांदूळ पोहे वेज पॅनकेक (tandul pohe veg pancake recipe in marathi)

#bfr #रोज सकाळी काय करावे न्याहारीसाठी, हा प्रश्न पडला की काहीतरी वेगळे करण्याची ऊर्मी येते, Cookpad मुळे... म्हणून आज केले आहे तांदूळ आणि पोहे , मिक्स, वेज पॅनकेक.. आवडेल त्या भाज्या घालून केले, की लहान मोठे सगळ्यांनाच आवडतात.. तेव्हा नक्की करून पहा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतांदूळ
  2. 1/2 कपपोहे
  3. 1गाजर किसून
  4. 1कांदा बारीक चिरून
  5. 10-12पाने पालक बारीक चिरून
  6. 1सिमला मिरची बारीक चिरून
  7. कोथिंबीर बारीक चिरून
  8. चवीनुसारमीठ
  9. 2हिरव्या
  10. 2 लाल मिरच्या
  11. 1 इंच आले
  12. 1 टीस्पून जीरे जाडसर बारीक
  13. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  14. तेल, मोहरी आणि तीळ

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    तांदूळ आणि पोहे निवडून, स्वच्छ धुवून, चार तास भिजत घालावे.

  2. 2

    चार तासांनी, एका मिक्सर जार मध्ये पाणी काढलेले, तांदूळ, पोहे आणि चवीनुसार मीठ टाकावे.

  3. 3

    आणि छान बारीक वाटून घ्यावे. सर्व मिश्रण एका भांड्यात काढून, आठ तास झाकून ठेवावे.

  4. 4

    आता पॅन केक करण्यासाठी, कांदा, पालक, सिमला मिरची, कोथिंबीर बारीक चिरून आणि गाजर किसून घ्यावे. या ऐवजी आपण दुसऱ्या भाज्या सुद्धा वापरू शकतो. हिरवी आणि लाल मिरची, आले, आणि जीरे जाडसर वाटून घ्यावे. आता तांदुळाच्या मिश्रणात, मिरची पेस्ट आणि लिंबाचा रस टाकावा.

  5. 5

    चिरलेल्या भाज्या आणि चवीपुरते मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. आता गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे तेल टाकावे. त्यावर मोहरी आणि तीळ पसरावे आणि वरून पॅन केकचे मिश्रण टाकावे. पुन्हा वरून थोडे तीळ टाकावे.

  6. 6

    आता झाकण ठेवून दोनतीन मिनिट शिजू द्यावे. आणि नंतर परतून घ्यावे. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावे. आता हे तयार झालेले पॅन केक मस्त गरमागरम खाण्यासाठी तयार आहे चटणी सोबत..😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes