दलिया खीर (daliya kheer recipe in marathi)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

#tri दलिया खीर ही अत्यंत हेल्दी व टेस्टी लागते यात गुळातून बी कॉम्प्लेक्स दुधातून कॅल्शिअम व गव्हात भरपूर प्रमाणात ग्लूटीन असते त्यामुळे ही खीर खूपच हेल्दी आहे. ड्रायफ्रूट्स वेलची पावडर ,जायफळ व नारळामुळे चविष्ट खीर तयार होते. लहान व मोठ्यांना ही खीर खूप आवडते..... पाहुयात कशी करायच ती ....

दलिया खीर (daliya kheer recipe in marathi)

#tri दलिया खीर ही अत्यंत हेल्दी व टेस्टी लागते यात गुळातून बी कॉम्प्लेक्स दुधातून कॅल्शिअम व गव्हात भरपूर प्रमाणात ग्लूटीन असते त्यामुळे ही खीर खूपच हेल्दी आहे. ड्रायफ्रूट्स वेलची पावडर ,जायफळ व नारळामुळे चविष्ट खीर तयार होते. लहान व मोठ्यांना ही खीर खूप आवडते..... पाहुयात कशी करायच ती ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमगव्हाचा दलिया
  2. 1/2 लिटरदुध
  3. 100 ग्रॅमगूळ पावडर व 50ग्रॅम साखर
  4. 1 टेबलस्पूननारळाचा चव
  5. 1/4 टीस्पूनप्रमाणे सुंठ,जायफळ
  6. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  7. 8-10केशराच्या काड्या
  8. 4प्रमाणे काजू, पिस्ता बदाम

कुकिंग सूचना

60 मिनिटे
  1. 1

    प्रथम दलिया स्वच्छ धुऊन त्यात उकळते पाणी त्याच्या दुप्पट टाकून एक तास भिजत ठेवावे.

  2. 2

    एका तासानंतर हे प्रेशर कुकरला लावून चार शिट्या कराव्यात व गॅस बंद करावा. कुकर थंड होईपर्यंत एका छोट्या वाटीत दोन टीस्पून एकदम कडक दूध घेऊन त्यात केशर भिजत ठेवावे. सुरेख केशरी रंग येतो.

  3. 3

    कुकर गार झाल्यावर शिजलेला दलिया एका मोठ्या भांड्यात काढून घ्यावा.थोडासा घोटावा.नंतर त्यात दूध, साखर व गूळ टाकून गॅसवर शिजायला ठेवावे.

  4. 4

    थोडेसे शिजल्यावर त्यात क्रमाक्रमाने सुंठ, जायफळ, वेलची पावडर, नारळाचा चव व मीठ टाकून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे व मिडीयम गॅसवर दहा पंधरा मिनिटे ठेवून दणदणीत उकळून घ्यावे. नंतर त्यात थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यावे व थोडेसे गार्निशिंगसाठी वापरावेत.

  5. 5

    नंतर गॅस बंद करावा. अतिशय हेल्दी टेस्टी खीर तयार होते. व सर्व्ह करताना एका काचेच्या बाऊलमध्ये गरम-गरम खीर त्यावर ड्रायफ्रूट्स काजू, बदाम, पिस्ता यांचे काप वरतून केशर दूध व तूप टाकून सर्व्ह करावे. या खिरीत भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह,व ग्लुटीन मिळते.त्यामुळे लहान व मोठ्यांना अत्यंत हेल्दी अशी खीर आहे.

  6. 6

    स्वातंत्र्यदिनानिमित्त दिलेली रेसिपी दलिया खीर तयार केली. तुम्हीही नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangal Shah
Mangal Shah @mangal51
रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

Similar Recipes