मेथी मलई मटार (methi malai matar recipe in marathi)

Aadhya masurkar
Aadhya masurkar @Aayu143
Borivali (mumbai)

मेथी मलई मटार (methi malai matar recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. 1 कपमटार
  2. 1 कपमेथी
  3. 1कांदा
  4. 2टोमॅटो
  5. 7काजू
  6. 3हिरव्या मिरच्या
  7. तेल आवश्यकतेनुसार
  8. 1 टेबलस्पूनजीरं
  9. 1मसाला वेलची
  10. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  11. 1/2 टेबलस्पूनधने जिरं पावडर
  12. 1/2 टेबलस्पूनहळद
  13. 1 टीस्पूनआमचुर पावडर
  14. 1 टीस्पूनगरम मसाला
  15. 1 टेबलस्पूनकसुरी मेथी
  16. मीठ चवीनुसार
  17. पाणी आवश्यकतेनुसार
  18. 1/3 कपदुध
  19. 4 टेबलस्पूनमलई

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण एक पॅन घेऊन त्यामध्ये तेल गरम करून घ्या.तेल गरम झाल्यावर त्यामध्ये काजू घालून परतून घ्या.बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो हिरव्या मिरच्या, घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.मग सर्व मसाले, मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावे.हे सर्व मिश्रण थंड करून घ्यावे आणि त्याची पेस्ट बनवून घ्या.
    दुसऱ्या पातेल्यामध्ये मटार वाफवून घ्या.

  2. 2

    बारीक चिरलेली मेथी तेल घालून परतून घ्या.

  3. 3

    आता एक पॅन घेऊन त्यामध्ये तेल गरम करून त्यात जिरं आणि एक मसाला वेलची घालावी.मग बनवून घेतलेली पेस्ट घालून एक उकळी आल्यावर वाफवलेले मटार आणि मेथी घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या.

  4. 4

    आता ५ मिनिटे शिजवुन घ्या.मग त्यामध्ये ३/४ कप दूध घालून घ्या.दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.मग. वरून 1 टीस्पून गरम मसाला आणि १ टेबलस्पून कसुरी मेथी घालावी.छान मिक्स करून त्यामध्ये ४ टेबलस्पून मलई घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
    अशा प्रकारे मेथी मलई मटार तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aadhya masurkar
रोजी
Borivali (mumbai)

टिप्पण्या

Similar Recipes