मेथी मटर मलाई भाजी (Methi Matar Malai Bhaji Recipe In Marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

मेथी मटर मलाई भाजी (Methi Matar Malai Bhaji Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५-३० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. 2 कपमेथीच्या भाजीची पाने
  2. 1 कपओल्या मटारचे दाणे
  3. 1मोठ्या टोमॅटोची प्युरी
  4. 1मोठा कांदा
  5. 2-3हिरव्या मिरच्या
  6. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. 1-2तमालपत्र,२लवंग, २हिरवी वेलची,1/2 इंच दालचिनी तुकडे
  9. 1 टीस्पूनजीरे
  10. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  11. 1.1/2 टीस्पून धने पावडर
  12. 1/2 टीस्पूनकसुरी मेथी (ऐच्छिक)
  13. 1/2 वाटीमलई (साय)
  14. चवीप्रमाणे मीठ
  15. थोडीशी चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

२५-३० मिनिटे
  1. 1

    मेथीच्या भाजीची नुसती पाने घेणे. स्वच्छ धुऊन, चिरून घेणे. एका टोमॅटोची प्युरी तयार करून घेणे.

  2. 2

    कांदा,कोथिंबीर बारीक चिरून घेणे. हिरव्या मिरचीचे उभे तुकडे करणे.खडे मसाले घेणे.गॅसवर कढईत तेल तापत ठेवणे.

  3. 3

    तेल तापले की, त्यात खडे मसाले घालून परतणे. नंतर आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या घालून परतणे. चिरलेला कांदा घालून सोनेरी रंगावर भाजून घेणे.

  4. 4

    कांदा भाजून झाला की टोमॅटो प्युरी घालून घेणे. भांड्यात थोडेसे पाणी घालून,ते पाणी त्यात घालून घेणे.२-३ मिनिटे परतणे.

  5. 5

    लाल तिखट, हळद,धने पावडर,मीठ घालून मिक्स करावे. तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेणे. मटार दाणे घालून परतावे.

  6. 6

    थोडेसे पाणी घालावे. मटार दाणे शिजवून घेणे. ८-१०मिनिटांनी मटार दाणे शिजल्यावर, चिरलेली मेथी घालून ४-५ मिनिटे शिजू द्यावे.

  7. 7

    नंतर त्यात गरम मसाला व कसुरी मेथी कुस्करून घालावी.२-३ मिनिटांनी मलई म्हणजेच साय घालून घेणे.
    *अमूलचे फ्रेश क्रीम ही तुम्ही वापरू शकतात.

  8. 8

    मलई व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेणे.२-३ मिनिटे ठेवून,गॅस बंद करावा. वरून चिरलेली कोथिंबीर घालून घेणे.

  9. 9

    खाण्यासाठी तयार मेथी,मटर, मलाई भाजी!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

Similar Recipes