मिश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#cpm8

#week8

#मिश्र_डाळीचा_ढोकळा...😋😋

ढोकळ्याचा अजून एक पौष्टिक,protein packed ,चविष्ट रुचकर असा प्रकार..अतिशय खमंग,पोटभरीचा हा breakfastकिंवा snacks साठी हमखास केला जाणारा पदार्थ..😍😋...सर्व वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त असा..सहज पचणारा हा ढोकळ्याचा प्रकार आपण आज करु या..

मिश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)

#cpm8

#week8

#मिश्र_डाळीचा_ढोकळा...😋😋

ढोकळ्याचा अजून एक पौष्टिक,protein packed ,चविष्ट रुचकर असा प्रकार..अतिशय खमंग,पोटभरीचा हा breakfastकिंवा snacks साठी हमखास केला जाणारा पदार्थ..😍😋...सर्व वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त असा..सहज पचणारा हा ढोकळ्याचा प्रकार आपण आज करु या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 -50 मिनीटे
5 जणांना
  1. 1/4 कपतांदूळ
  2. 2 टेबलस्पूनचणाडाळ
  3. 3 टेबलस्पूनमुगडाळ
  4. 2 टेबलस्पूनउडीद डाळ
  5. 1/4 कपपोहे
  6. 1 टेबलस्पूनआलं मिरची लसूण पेस्ट
  7. मीठ चवीनुसार
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. 1इनो फ्रुट सॉल्ट
  10. 1 टेबलस्पूनपांढरे तीळ
  11. 3-4उभ्या चिरलेल्या मिरच्या
  12. फोडणीचे साहित्य तेल मोहरी जीरे हिंग
  13. 7-8 कडीपत्त्याची पाने
  14. 1/2 टीस्पूनसाखर
  15. पाणी
  16. 1/2 टीस्पूनहळद
  17. बारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

40 -50 मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्व डाळी तांदूळ स्वच्छ धुऊन घ्याव्यात.नंतर त्या सात ते आठ तास पाण्यात भिजत ठेवाव्यात.नंतर एका चाळणीत निथळून घ्याव्यात.

  2. 2

    आता पोहे भिजवून घ्यावेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वरील डाळ व तांदूळ पोहे थोडेसे पाणी घालून मिश्रण बारीक दळून घ्यावे.आणि हे मिश्रण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा..

  3. 3

    ढोकळ्याचे इतर साहित्य जमा करून घ्या.

  4. 4

    दुसर्या दिवशी ढोकळा वाफवण्यासाठी कुकर मध्ये किंवा पँन मध्ये पाणी उकळायला ठेवा.नंतर वरील आंबवलेल्या पीठामध्ये एक टीस्पून तेल,साखर, हळद,आलं मिरची लसूण पेस्ट घालून ढोकळ्याचे मिश्रण एकजीव करावे आणि यात थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करा आणि यामध्ये आता मीठ घाला नंतर इनो फ्रूट सॉल्ट घालून मिश्रण एका बाजूने चांगले ढवळून घ्या.

  5. 5

    एका ताटाला तेल लावून यामध्ये हे मिश्रण ओता आणि ताट चांगले व्यवस्थित तीन-चार वेळा tap करून घ्या आणि हे ताट कुकरमध्ये किंवा पॅनमध्ये ठेवून वर झाकण ठेवा आणि 30 मिनिटे ढोकळा वाफवून घ्या नंतर सुरी घालून चेक करा जर ढोकळा शिजला नसेल तर अजून एक दहा मिनिटे ढोकळा शिजवून घ्या.एकीकडे एका कढल्यात तेल तापत ठेवा. तेल तापले की त्यात मोहरी जीरे हिंग हिरव्या मिरच्यांचे उभे तुकडे आणि पांढरे तीळ घालून कढीपत्ता घाला आणि खमंग फोडणी करून घ्या.

  6. 6

    नंतर ढोकळा शिजला कि गार करून घ्या आणि त्यावर ही फोडणी सर्व बाजूने एक सारखी घाला. तयार झाला ढोकळा.. आणि आपल्या हव्या त्या आकारात ढोकळा कापून घ्या.आपला मऊ लुसलुशीत खमंग असा मिश्र डाळीचा ढोकळा खायला तैय्यार..😋

  7. 7

    एका प्लेटमध्ये ढोकळा घालून त्यावर कोथिंबीर खोबरं पेरून खमंग चमचमीत ढोकळा सर्व्ह करा..

  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes