इन्स्टंट संदेश बर्फी रेसिपी (barfi recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#tri
#श्रावण शेफ चॅलेंज
#week1
75व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा
पंधरा ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे.
74 वर्षापूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला म्हणूनच 15 ऑगस्ट ला संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो,हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे
या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज🇮🇳 फडकवला जातो
देशभरात ही सर्व ठिकाणी ध्वजारोहण सांस्कृतिक कार्यक्रम करून हा दिवस साजरा करतात.
तर मग भारताच्या स्वातंत्र्यदिनी तोंड गोड करूया
आज स्वातंत्र्य दिन पण आहे व माझी 150 वी रेसिपी पण आहे तर मग बघू या तिरंगी संदेश बर्फी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
दोन
  1. 250 ग्रॅमपनीर
  2. 125 ग्रॅमपिठी साखर
  3. हिरवा व केशरी रंग

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे

  2. 2

    नंतर पनीर मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घ्यावे एका भांड्यात काढून घ्यावे व त्यात पिठीसाखर मिक्स करावे

  3. 3

    पिठीसाखर व पनीरचे मिश्रण हाताने चांगले मळून घ्यावे एकजीव करुन घ्यावे

  4. 4

    नंतर एक नॉन स्टिक पॅन घेऊन त्यात हे मिश्रण घालावे व एक सारखे मिडीयम गॅसवर ढवळत राहावे गोळा होईपर्यंत सारखे हलवत राहावे नंतर याचे तीन भाग करून घ्यावे एकामध्ये केशरी रंग एकामध्ये हिरवा रंग टाकावा व एक तसाच कलर ठेवावा पांढरा

  5. 5

    आता एक ताटली घेवून ग्रीस करून घ्यावी व त्यावर हे एकावर एक थर देऊन सेट करून घ्यावे थोडावेळ ठेवावे व आपल्याला पाहिजे त्या आकारात कट करून घ्यावे

  6. 6

    तिरंगी संदेश बर्फी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

Similar Recipes