वसंत पंचमी विशेष- केशरी गोड भात (kesari god bhat recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

वसंत पंचमी ला सरस्वती मातेचा जन्मदिवस साजरा केला जातो. हा सण सगळीकडे साजरा करतात.
या दिवसापासून वसंत ऋतू सुरू होतो.
सरस्वती मातेला केशरी रंग आवडतो म्हणून निवेद्या साठी केशरी गोड भात.:-)
🍚🍚🍚

वसंत पंचमी विशेष- केशरी गोड भात (kesari god bhat recipe in marathi)

वसंत पंचमी ला सरस्वती मातेचा जन्मदिवस साजरा केला जातो. हा सण सगळीकडे साजरा करतात.
या दिवसापासून वसंत ऋतू सुरू होतो.
सरस्वती मातेला केशरी रंग आवडतो म्हणून निवेद्या साठी केशरी गोड भात.:-)
🍚🍚🍚

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
३-४ जण
  1. दीड वाटी बासमती तांदूळ
  2. 1 वाटीसाखर
  3. ४-५ लवंग
  4. 1 मोठा चमचासाजूक तूप
  5. चिमूट भरकेशरी रंग
  6. आवडेल तेवढी काजू
  7. विलयाचि पावडर

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.निथळून घ्यावे.भांड्यात १/२ चमचा तूप गरम करायला ठेवावे.लवंग टाकावी.

  2. 2

    लवंगी च रंग बदलला की त्यात तांदुळाच्या दुप्पट पाणी घालावे.केशरी रंग घालावा.

  3. 3

    त्यात तांदूळ घाला.केशरी भात शिजवून घ्यावा.१० मीं. भात शिजेल.
    भात कोमट असताना त्यातील पाणी निथळून घ्यावे.(चाळणीत ओतून घ्या.)
    दुसऱ्या भांड्यात जे तूप उरले होते ते घालावे.गरम करायला ठेवावे.ड्राय फ्रूट काप घालावे.

  4. 4

    काजू बदाम काप सोनेरी रंगाचा झाला की केशरी भात घालावा.वरून साखर घालावी. मंद असिवर साखरेचं पाक होऊ द्यावा.अलगद पर्टववे.छान मिक्स करावे.

  5. 5

    साखर घालून भात ३,५ मीं. शिजवावा.घरभर या भाताचा मस्त सुवास सुटतो.वरून पाहिजे तर पुन्हा dryfruit काप घालावे.
    खूप मोकळा चविष्ट केशरी गोड भात nivadya साठी तयार.😍🍚💞

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes