शेवयांची खीर (sevyanchi kheer recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#rbr
श्रावण महिना म्हणजे हिरवागार बहरलेला निसर्ग आणि नानाविध सणांची रेलचेल. सोमवारी शिवामूठ, मंगळवारी मंगळागौर, शुक्रवारी जिवतीची पूजा, शनिवारी उपवास, पोळा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी अशा सणात तर श्रावणात रंगत चढत जाते. महिना केव्हा संपतो कळतही नाही. सण आणि गोड पदार्थ यांच घट्ट नाते आहे. आज मी घेऊन आले आहे सर्वांचीच आवडती रेसीपी शेवयांची खीर. याची कृती पुढीलप्रमाणे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपशेवया
  2. 4 कपदूध
  3. 1/4 कपसाखर
  4. 2 टीस्पूनसाजूक तूप
  5. 1/2 टीस्पूनवेलचीची पूड
  6. 2 टेबलस्पूनबदामाचे काप

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    कढई मंद आचेवर गरम करून त्यात तूप घालावे. तूप पातळ झाले कि त्यात शेवया घालून अगदी मंद आचेवर शेवया छान गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजाव्यात.

  2. 2

    पातेल्यात दूध गरम करावे. उकळी आल्यावर भाजलेल्या शेवयांच्या कढईत घालावे. मध्यम आचेवर शेवया शिजू द्याव्यात. मधेमधे ढवळत राहावे. त्यात साखर, वेलचीपूड घालून पुन्हा ढवळावे.

  3. 3

    दूध चांगले आटले आणि शेवया व्यवस्थित शिजल्यावर गॅसवरून पातेले उतरवावे. बदामाचे काप घालून सजवावे.

  4. 4

    गरम किंवा थंड करून सर्व्ह करावे.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

Similar Recipes