चम-चम (cham cham recipe in marathi)

Pooja Kale Ranade
Pooja Kale Ranade @Pet_Po0ja

#rbr
रक्षाबंधनाच्या दिवशी भावासाठी काहीतरी गोड आणि वेगळे करायचे म्हणून ही एक बंगाली मिठाई आपल्यासोबत share करत आहे.

चम-चम (cham cham recipe in marathi)

#rbr
रक्षाबंधनाच्या दिवशी भावासाठी काहीतरी गोड आणि वेगळे करायचे म्हणून ही एक बंगाली मिठाई आपल्यासोबत share करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास 30 मिनिटे
  1. 1.5 लिटरगायीचे दुध
  2. 2लिंबु रस
  3. 1.5 कपसाखर
  4. 15-20केसर काड्या
  5. 4.5 कपपाणी
  6. 2 चमचेमैदा
  7. 2पिठीसाखर
  8. 1/4 कपमिल्क पावडर
  9. 2तुप
  10. 2वेलची आणि वेलची पावडर
  11. 1/4 कपदुध
  12. 2क्रिम
  13. टुटी-फ्रुटी
  14. 1 कपडेसिनेटेड कोकोनट

कुकिंग सूचना

1 तास 30 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी एका भांड्यात दिड लिटर दुध काढून ते तापत ठेवावे. दुध तापले की गॅस मंद करून त्यात लिंबु रस घालावा आणि दुध फाटून त्याचा चोथा आणि पाणी वेगळे होइपर्यंत ढवळावे आणि गॅस बंद करावा आता एका चाळणीत एक स्वच्छ सुती कपडे ठेवून त्यात ते फाटलेले दूध ओतून पाणी व चोथा वेगळा करावा हा चोथा परत साध्या पाण्याने धुवून काढावा फडके पिळून त्यातील पाणी काढून टाकावे.

  2. 2

    आता पाणी काढलेला चोथा एका bowl अथवा भांड्यात घेऊन त्यात मैदा घालून एकजीव मळून घ्यावे. साधारण 10 मिनिटे नीट मळले की हातावर वळून त्याचे लंबगोलाकार असे गोळे करून घ्यावेत.

  3. 3

    आता एका कढईत साखर आणि पाणी घेऊन ते गॅसवर उकळण्यासाठी ठेवावे त्यावेळी त्यात अख्खी वेलची घालावी आणि या मिश्रणाला उकळी फुटली की त्यात तयार केलेले गोळे सोडावेत आणि झाकून साधारण 15 ते 20 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवावे जेणेकरून गोळ्यांमध्ये पाणी जाऊन ते फुलतील.
    त्यानंतर ते गोळे पाण्यातून काढून एका जाळीवर काढुन गार करण्यासाठी ठेवावे आणि गार झाल्यावर फोटोत दाखवल्याप्रमाणे त्यांना एका बाजूला अर्धवट सुरीने कापावे.

  4. 4

    आता एक कढई गॅसवर गरम करत ठेवून त्यात तूप घालावे तूप वितळले की त्यात दूध, क्रिम आणि नंतर मिल्क पावडर घालून एकसारखे ढवळावे, ढवळत असताना त्यात चिमूटभर वेलची पूड आणि थोड्याशा गरम दुधात केशर घालून ते या मिश्रणात घालावे, जेणेकरुन त्याला केशराचा रंग येईल. हे मिश्रण खव्याप्रमाणे घट्ट होईपर्यत ढवळत राहावे. (ढवळत असताना त्यात गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी). मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करावा.

  5. 5

    आता तयार केलेले गोळे घेऊन त्यांना जिथे कापले आहे तिथून त्यामध्ये तयार केलेला खवा भरावा आणि तो गोळा डेसिनेटेड कोकोनट मध्ये घोळवावा.
    वरून टुटी-फ्रुटी लावून सजवावे आणि एका डब्यात ठेवून तासभर फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यावे.
    ही झाली आपली रक्षाबंधन स्पेशल "चम-चम" मिठाई तयार.
    टीप- खवा उरला तर त्याचे पेढे करू शकता.
    केशर नसेल तर थोडासा खायचा रंग वापरावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Kale Ranade
Pooja Kale Ranade @Pet_Po0ja
रोजी
cooking हा माझा एक आवडता छंद आहे, वेगवेगळ्या रेसिपी try करायला मला खूपच आवडते माझे स्वयंपाकघर ही माझी प्रयोगशाळा आहे म्हणायला हरकत नाही. फक्त मी हाडाची vegetarian असल्याने veg रेसिपीच try करते. वेगवेगळ्या रेसिपी साठी लागणारी वेगवेगळी भांडी आणि त्या सर्व्ह करण्यासाठी आकर्षक अशी भांडी खरेदी करायला ही मला खुप आवडते
पुढे वाचा

Similar Recipes