रसमलई (rasmalai recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#gp
#🥀🥀गुढीपाडव्याच्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा.🥀🥀
#बंगाली मिठाई आता सगळ्यां राज्यात आवडणारी अर्थात मलाही आवडते. खास म्हणजे माझी मुलगी खुप छान करते .

रसमलई (rasmalai recipe in marathi)

#gp
#🥀🥀गुढीपाडव्याच्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा.🥀🥀
#बंगाली मिठाई आता सगळ्यां राज्यात आवडणारी अर्थात मलाही आवडते. खास म्हणजे माझी मुलगी खुप छान करते .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
2/3 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटर दुध आटवण्यासाठी
  2. 1 लिटरदुध गाईचे रसमलाई बनवण्यासाठी
  3. 1 कपसाखर
  4. 10पिस्ते
  5. 10काजू
  6. 10बदाम
  7. 1/2 टीस्पूनवेलचीपुड
  8. 10/12काड्या केसर
  9. 1लिंबू

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    म्हशीचे दुध आटवायला एका गॅस वर ठेवणे मधे मधे ढवळत रहावे.काजू,पिस्ता,बदाम पातळ काप करून घेणे.

  2. 2

    गाईचे दुध तापवायला ठेवावे उकळले कि त्यात लिंबाचे पाणी घाला दुध फाटून पनीर तयार होईल गाळून घ्या ताबडतोब त्यावर थंड पाणी घाला म्हणजे पनीर चांगले होते.

  3. 3

    आता पनीर एकदम स्मुथ होईस्तो मळून घ्या.मळलेल्या पनीरचे छोटे छोटे चपट गोळे करा स्मुथ व्हायला हवेत म्हणजे फुटणार नाहीत.

  4. 4

    एका भांड्यात तिन कप पाणी घालून त्यात 3/4कप साखर घाला नि पाणी उकळू द्या.ह्या पाण्यात आता केलेले गोळे घाला नि 10/15 मिनीटे शिजवून घ्या.

  5. 5

    दुध आटले असेल त्यात 1/2कप साखर घाला वेलचीपुड घाला,केसर सिरप असेल तर घाला.

  6. 6

    रसमलाई चे गोळे पाण्यातून बाहेर काढून त्यातील पाणी बाहेर काढा.

  7. 7

    रसमलाई आणि दुध नाॅरमल टेमपरेचरला येऊ द्या व नंतर हे गोळे आता आटलेल्या दुधात घाला

  8. 8

    रसमलाई तयार आहे त्यावर केसर टाका. सुका मेव्याने सजवा नि थंड करायला ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या (2)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
तुमची रसमलईची रेसिपी करून पाहीली खूप छान झाली. खूप खूप धन्यवाद.

Similar Recipes