अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#श्रावण_स्पेशल_भाजी_cooksnap_challenge
#अळूची_भाजी
श्रावण महिन्यात सगळीकडे छान हिरवाई पसरुन निसर्गाचे सुंदर रुप आपल्याला बघायला मिळते. या महिन्यात खूप सणवार साजरे केले जातात. यातीलच एक सण म्हणजे नागपंचमी. यादिवशी नागोबाची पूजा करुन आपल्या मुलाबाळांना सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करतात. काही ठिकाणी चिरणे, कातणे तसेच फोडणी न देणे यासारख्या प्रथा पाळल्या जातात. ज्यांना जमेल तशी प्रथा पाळून नागपंचमी साजरी करतात. यादिवशी आमच्या कडे नागोबाला दुध लाह्या प्रसाद म्हणून दाखवतात. त्याच बरोबर अळूची भाजी आणि हळदीच्या पानातल्या पातोळ्यांचा पण नैवेद्य दाखवला जातो. पारंपारिक पध्दतीने बनवलेली अळूची भाजी यालाच अळूचे फदफदे असेही म्हणतात. याची रेसिपी देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. २५ आळूची पाने
  2. १०० ग्राम गूळ
  3. 1/4 वाटीओलं खोबरं
  4. 1/4 वाटीचिंचेचा कोळ
  5. 1/4 वाटीभिजवलेले शेंगदाणे
  6. 2कणसांचे तुकडे
  7. 2 टीस्पूनतिखट पूड
  8. 2 टीस्पूनगोडा मसाला
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनधणे जीरे पावडर
  11. 1 टीस्पूनगरम मसाला पावडर
  12. 4 टीस्पूनमीठ
  13. 2 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    अळूची पाने स्वच्छ धुवून त्याचे देठ कापून, देठाची सालं काढून टाकावी. देठ आणि आळूची पाने बारीक चिरून घ्यावी. ही भाजी चिरताना हाताला चिंचेचा कोळ लावावा त्यामुळे जर आळूची पाने जर खाजरी असतील तर हाताला खाज येत नाही.

  2. 2

    कुकर मधे तेल घालून त्यात बारीक चिरलेली अळूची पाने आणि देठं घालावी. दोन शिट्या होईपर्यंत शिजवून घेऊन रवीने किंवा डावलाने भाजी चांगली एकदम बारीक घोटून घ्यावी. मग त्यात ओलं खोबरं बारीक वाटून घालून ढवळून घ्यावे.

  3. 3

    मग त्यात बारीक चिरलेला गुळ आणि चिंचेचा कोळ घालावा. चिंच घातल्याने भाजीला खाज सुटत नाही. नंतर या भाजी मधे तिखट पूड, हळद, गोडा मसाला, धने जीरे पूड, गरम मसाला आणि मीठ घालून मिक्स करुन भाजी ढवळून घ्यावी.

  4. 4

    अळूची भाजी उकळल्यानंतर यामध्ये उकडलेले कणसाचे तुकडे आणि शेंगदाणे घालावे मग भाजी परत एकदा चांगली उकडून घ्यावी. आमच्या कडे नागपंचमीच्या दिवशी या भाजीला फोडणी देत नाही तरीही या दिवशी अळूची भाजी खूपच चवदार चविष्ट बनते.

  5. 5

    नागोबाला अळूच्या भाजीचा नैवेद्य दाखवावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes