कडवे वाल अळूची भाजी (kadve vaal aluche bhaji recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#shr
#श्रावण शेफ week 3
# अळू ही एक रानभाजी आहे .श्रावणात भाजीचा अळू रानात वाडीत आपोआप उगवत असतो. अतिशय पोष्टीक भाजी.अळू मधे ऐ,बी,सीजीवनसत्वे,कॅल्शियम,
पोटॅन्शियम नि अॅन्टीऑक्सिडंट खुप प्रमाणात असते त्यामुळे हिच्या सेवनाने शरीराला खुप फायदा होतो म्हणून ही भाजी वारंवार खावी .मग वेगवेगळे प्रकार केले की आणखीन खायला मजा येते .वाल पण प्रोटीनयुक्त शिवाय मोड आलेले . ही भाजी अत्यंत चवीला छान लागते अगदी अवश्य करून बघा आवडेल सर्वाना. 🎉एक सांगायचे राहिलेच ही भाजी नागपंचमीला नैवेद्य म्हणून जर शेंगा ( वाफवलेल्या करंज्या)केल्या तर ही बिरडे घातलेली अळूची भाजी आवर्जून केली जाते.🎉

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
3/4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमोड आलेले सोललेले कडवे वाल
  2. 2 कपचिरलेला अळू
  3. 1/2 कपकांदा
  4. 1/2 कपटोमॅटो
  5. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 1 टीस्पूनगोडा मसाला
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 2 टेबलस्पूनगुळ
  9. 2 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  10. 2 टेबलस्पूनओला नारळ
  11. 5-6लसूण पाकळ्या
  12. 1 टीस्पूनमोहरी
  13. 1 टीस्पूनजीरे
  14. 3-4कढीपत्ता
  15. 1/4 टीस्पूनहिंग
  16. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    प्रथम खालील प्रमाणे तयारी करावी.वाल,टोमॅटो,कांदा चिरून घ्या.

  2. 2

    अळू धुवून,देठ सोलून खालील प्रमाणे बारीक चिरा.

  3. 3

    आता कढईत तेल गरम करत ठेवावे गरम झाले कि त्यात मोहरी घाला तडतडल्यावर लसूण घाला लसूण लालसर झाला कि जीरे,कढीपत्ता,हिंग घाला नि मग कांदा घालून छान परता.कांदा परतला कि टोमॅटो घाला नी परता.आता लाल तिखट,हळद,गोडा मसाला,मीठ,आललसूण कोथिंबीर मिरची पेस्ट घाला सर्व परतून त्यात चिरलेला अळू घाला.

  4. 4

    अळू घाला चिंचेचा कोळ घाला नि अळू झाकण ठेऊन दहा मिनिटे शिजवा नंतर त्यात वाल घालून छान परता.

  5. 5

    भाजीमधे गुळ,खोबरे घाला नि कुकरमधे 2शिट्या घेऊन भाजी शिजवा

  6. 6

    कडवे वाल अळूची भाजी तयार आहे. भाताबरोबर मस्त लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes