कोहळ्याची बाकर भाजी (kohalyachi bhakar wadi recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#रेसीपीबुक week7
#सात्विक रेसिपीज आमच्या नागपूर कडे लाल भोपळा कोहळा म्हणतात व ही भाजी श्रावण मासा मध्ये व चातुर्मासाचा मध्ये हमखास बनवली जाते. श्रावण सोमवारी पोळा नागपंचमी गौरी गणपती मधे ही भाजी बनवल्या जाते. यात कांदा लसूण वापरल्यामुळे ही सणावारी हमखास बनवली जाते. व सर्व आनंदाने खातात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
चार व्यक्ती करिता
  1. 250 ग्रॅमकोहळ्याचे तुकडे (लाल भोपळा)
  2. 25कढीपत्त्याची पाने
  3. तुकडेचांद हिरव्या मिरचीचे
  4. 1/2 टीस्पूनमोहरी
  5. 1/2 टी स्पूनहळद
  6. 1टिस्पून तिखट
  7. 1 टीस्पूनकाळा मसाला
  8. 1/4 टी स्पूनहिंग
  9. 1/2 टीस्पूनमेथीदाणे
  10. 1/2 टी स्पूनखसखस
  11. 2 टेबलस्पूनकाजू
  12. 2 टेबलस्पूनचारोळी
  13. 3 टेबल स्पूनखोबर्‍याचा किस
  14. 2 टेबल स्पूनचिंचेचा कोळ
  15. 2 टेबलस्पूनगूळ
  16. 3 टेबलस्पूनतेल
  17. मीठ स्वादानुसार

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम कोहल्याच्या सालीसकट फोडी करून घ्याव्या. व हिरव्या मिरचीचे तुकडे करून घ्यावे. आता गॅसवर पॅनमध्ये तेल टाकून त्यात मोहरी मेथीचे दाणे व हिंग घालावा. नंतर त्यात मिरचीचे तुकडे व कढीपत्ता घालावा.

  2. 2

    आता यात हळद घालावी. नंतर त्यात कोहळ्याचे तुकडे घालावे. वरून तिखट काळा मसाला व मीठ घालावे. पाच मिनिटा करिता व झाकून ठेवावे.

  3. 3

    आता यात खसखस चारोळी व थोडा खोबऱ्याचा कीस घालावा. व थोडे पाणी घालावे. कोहळ्याच्या फोडी शिजल्यावर त्यात गुळ व चिंचेचा कोळ घालावा द्यावी व थोडी वाफ येऊ द्यावी.

  4. 4

    गरम गरम भाजी पोळी सोबत अथवा भातासोबत सर्व्ह करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes