व्हेज फ्रँकी

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

खास मुलांच्या आग्रहास्तव
#ckps #shr #rbr

व्हेज फ्रँकी

खास मुलांच्या आग्रहास्तव
#ckps #shr #rbr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
२ जणांसाठी
  1. १ वाटी कणिक, १/२ वाटी मैदा
  2. ४ चमचे तेल, मोहरी, हिंग, १/२ चमचा हळद,
  3. ३ उकडलेले बटाटे, १ शिमला मिरची, १ गाजर बारीक चिरून,
  4. १/४ वाटी वाफवलेले मटार, १/४ वाटी पनीर
  5. २ कांदे (१ बारीक चिरून व १ लांबट कापून) २हिरव्या मिरच्या चिरून
  6. २टे.स्पूनआलं लसणाची पेस्ट, २ चमचे व्हिनीगर, २ क्यूब्ज अमूल चिज
  7. २ टे.स्पून फ्रँकी मसाला (घरी बनवलेला) चवीपुरते मीठ
  8. हिरव्या चटणीसाठी ४ हिरव्या मिरच्या, १वाटी कोथिंबीर
  9. १/४ वाटी पुदीन्याची पाने, १/२ चमचा आमचूर पावडर,१/२ चमचा साखर,
  10. चवीपुरते मीठ सर्व एकत्र करून चटणी करून घ्यावी

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम कणिक, मैदा,चविपुरते मीठ व २ चमचे तेल घालून मळून घ्यावी व त्याच्या चपाती बनवून घ्याव्या व दोनही बाजूनी कोवळ्या भाजून घ्याव्या.

  2. 2

    एका कढईत २ चमचे तेल तापवून त्यांत हिंग, मेाहरी हळद व मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालून परतवून घेणे. नंतर त्यांत कुस्करलेला बटीटा,वआलं लसणाची पेस्ट घालून सर्व मिश्ण एकजीव करणे.

  3. 3

    नंतर हे मिष्रण थंड झाल्यावर त्याचे रोल्स करून शँलो फ्राय करून घ्यावे.

  4. 4

    नंतर चपातीवर प्रथम हिरवी चटणी पसरवावी, त्यावर रेाल ठेवावा व त्यावर शिमला मिरची, गाजर, १ चनचा पनीर कुस्करून, लांबट चिरलेला कांदा व वाफवलेला मटार घालावा

  5. 5

    नंतर त्यावर थोडेसे व्हिनीगर व फ्रँकी मसाला भुरभुरवावा. शेवटी त्यावर चीज स्प्रेड करावे व चपातीचा रोल बनवावा.

  6. 6

    नंतर ही तयार झालेली फ्रँकी थोडेसे तेल सोडून शँलो फ्राय करावी व गरमागरम सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes